
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
अरे किती भारी, व्हिडियो पोस्ट
अरे किती भारी, व्हिडियो पोस्ट करा ओडीनचा
मांजरांना अश्या हाका मारून
मांजरांना अश्या हाका मारून बघा, ढिम्म दाद देत नाहीत. अगदीच उपकार केले तर शेपूट हलवून नाही तर कान टवकारून त्यांना त्यांचं नाव समजतं याचा पुरावा देतात.
सिंडरेला खरंय!
सिंडरेला
खरंय!
तरी लाडाने नावं ठेवतोच आपण
काय चाललंय इथे शांतता का?
काय चाललंय इथे शांतता का?
समीर चं भुभू आलं का घरी?
इथे आता स्नो वितळत चालला आहे. आधी पूर्ण शुभ्र झालेल्या बॅकयार्ड मधे आता मधे मधे गवत दिसायला लागलंय. माव्या चॅप्टर आहे. त्याला स्नो चं भयंकर वेड. अगदी अर्धा त्यात बुडला तरी त्यातच जायचं असतं. पहिल्या, दुसर्या स्नो च्या वेळेला त्याच्या साठी फावड्याने आम्ही एका पॅच मधला स्नो काढला मुद्दाम, तर उलट त्या ग्रीन पॅच ला एखादे तळे असावे असे अव्हॉइड करून उडी मारून मुद्दाम फक्त स्नो वर चालतो! त्यावर लोळतो, घसरतो , तोंड घालतो. आता स्नो पूर्ण गेला की मजा येणार आहे त्याची.
मध्यंतरी एकदा गाढवाने मुलीच्या टेबलावर मिन्ट ची डबी उघडी पाहून त्यातल्या साताठ गोळ्या मटकावून अन मग उलटी करून आमच्या तोंडाला फेस आणला होता. शुगर फ्री गम, मिन्ट गोळ्या, चॉकोलेट यात Xylitol असते, कुत्र्यांसाठी अगदी विषारी. मग व्हेट ला कॉल, तपासायला जा, खबरदारी म्हणून औषधे घ्या असे सगळे सोपस्कार झाले. सांगायचा मुद्दा काय तर लक्ष द्या. वस्तूंची लेबलं वाचा, असल्या शुगर फ्री वस्तू उंच ठेवून द्या
शनीवारी २७ येणार आहे
शनीवारी २७ येणार आहे
बापरे, माउइ एकदम उपद्व्यापी आहे. खूप काळजी घेतली पाहिजे
हो ना
हो ना
माऊई लैच उद्योगी बाळ दिसतंय
आणि असला गोंडस असल्यामुळे फावत असेल त्याचं चांगलं
तोंड भरून हसल्यावर काय ओरडणार
ओड्या असले उद्योग करत नाही घरात
पण बाहेर दिसेल ते चरत असतो, मध्ये तर शेळी बकरी सारखा पाला चरत होता आणि येऊन ओकत होता
मला एक जण म्हणाला पोटात गडबड असेल तर करतात असं
पण हा म्हणजे झाडाच्या फांद्या पण चावून चावून खायचा
आता कमी झालं पण सारखं लक्ष ठेवावं लागतं
सध्या तो बाकी भुभिज चा
सध्या तो बाकी भुभिज चा स्विमिंग ट्रेनर झाला आहे
त्याला पोहताना बघून बाकीचे विचारतात की काय केलं तुम्ही, कसं शिकवलं
म्हणलं अहो शिकवावं लागत नाही, बेसिकलीच तो स्वीमर आहे आणि त्याला पाण्यापासून लांब ठेवावं लागतं
मग आमचं जेव्हा स्विमिंग असेल तेव्हा आवर्जून घेऊन येतात
त्याच्या नादाने अजून तीन भुभु जे वयाने बरेच मोठे आहेत पण कधी पाण्यात उतरले नाहीत असे आता हळुहळु पोहायला लागले आहेत
आणि हा म्हणजे दणादण उड्या मारून लांबवर पोहत असतो
अविर्भाव असा असतो तुम्ही अजुन लहान आहात
त्याची एक गर्लफ्रेंड पण आहे, ती तिच्या मालकाने खूप प्रयत्न करूनही पाण्यात पाय ठेवायची नाही
केवळ मग ओडीन घुसला पाण्यात तर मग गेली त्याच्या पाठोपाठ
त्यांची मस्त जोडी जमलीय, मस्त खेळत असतात पाण्यात
मध्ये तर शेळी बकरी सारखा पाला
मध्ये तर शेळी बकरी सारखा पाला चरत होता आणि येऊन ओकत होता>> हो हे बरोबर आहे. एक पर्टिक्युलर झाड असते त्याचा पाला खातात व ते सर्व ओकून बाहेर काढतात. पोट खराब असले की असे करतात. असे असले तर त्यांना अगदी जितक्यास तितकेच अन्न चारा जास्ती लाडाचे खाउ देउ नका ते एक दोन दिवस.
आमच्या कडे बिग बास्केट डिलिव्हरी आली की लेग पीस चा डबा येतो त्यातले एक ताजे काढून देइ परेन्त भुंकत बसते. ते त्या माणसा समोर ऑकवर्ड होते. मग ते चिरुटा सारखे तोंडात घेउन जागेवर जाउन बसायचे गपचुप.
अमृताक्षर, सशाला फ्लॉवरची
अमृताक्षर, सशाला फ्लॉवरची पाने,कोवळे देठ,कोथिंबीर देत चला.
आमच्याकडे २०-२२ दिवस सशी होती.एका नातलगाला कोणीतरी ससा दिला होता.तिला आवड नव्हती.सशी आपली वाळली कोथिंबीर खात असताना आईने तिला विचारले की मी नेऊ का थोड्या दिवसांसाठी? अशा प्रकारे सशी, आमच्या उन्हाळी सुटीच्या घरी आली.तिच्यासाठी वरचा रतीब लावला .आंब्याची सालेही आवडीने खायची.दुपारी मात्र वरच्या खोलीत पलंगाच्या एकदम टोकाला जाऊन झोपायची की तिला जवळ घ्यायला मिळायचेही नाही.तिच्या गळ्यात दोरी बांधून घराच्या आसपास गवत चरायला न्यायचे.भूक लागली की आईच्या अंगावर २ पाय ठेऊन लक्ष वेधायची.मुंबईला येईपर्यंत छान गुटगुटीत झाली होती की नातलगाने आश्चर्याने विचारलेही की आमच्याकडचा ससा का?त्यांचा ससा त्यांना दिला,पुढे काय केले त्यांनी आता आठवतही नाही.
भुभिज चा स्विमिंग ट्रेनर >>
भुभिज चा स्विमिंग ट्रेनर >>>
हे फार भारी! काही काही ब्रीड्स जात्याच पोहण्याचे शिक्षण घेऊन आलेली असतात. लॅब त्यातलेच. पण तरी सगळ्याच लॅब ना लगेच पोहता येते असे नाही हे कसं काय कोण जाणे! ओड्या हुषारच पण. उगीच नाही हाय डिमांड मधे आहे स्थळांच्या 
(No subject)
माउई किती खोडकर आहे.
माउई किती खोडकर आहे.
आणि हा म्हणजे दणादण उड्या मारून लांबवर पोहत असतो>> छान
देवकी आमचं ससुल पण बेड खाली
देवकी आमचं ससुल पण बेड खाली कोपऱ्यात जाऊन बसतो दिवसभर.. खूप कमी वेळ बाहेर येऊन उड्या वगैरे मारून जातो मग परत बेडखाली.. कोथिंबीर पालक मेथी fruits सगळ खातोय आवडीने पण त्याला किती खाऊ घालावं ते काही समजत नाही..
कधी जास्त खाऊन होत तर पूर्ण घरात शी सू करून ठेवतो. त्याला पॉटी ट्रेनिंग कस द्यावं काही समजत नाही
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=KWg-L-NJyzQ&t=191s
किती खाणे द्यावे यासाठी व्हेटला विचारा.
धन्यवाद देवकी..मी प्रयत्न
धन्यवाद देवकी..मी प्रयत्न करून पाहिलं. व्हिडिओ मधे सांगितले तसे
आजच्या लोकसत्तामध्ये
आजच्या लोकसत्तामध्ये कुत्र्यांना कॅनाईन डिस्टेंपर विषाणू संसर्गाचा धोका असल्याची बातमी आहे.
सद्ध्या ठाणे येथे भटक्या कुत्र्यांच्या केसेस आहेत. पण त्यांना हात लावणार्या माणसांमार्फत संसर्ग पसरू शकतो.
०-१ वर्षे व ९+ वर्षे वयोगटाला + लसीकरण केलेले नसल्यास --- जास्त धोका आहे.
आपापली बाळे सांभाळा.
मस्त मजा आली वाचून.
मस्त मजा आली वाचून.
ऑडीनचे ढिस्स व हाक मारणे
मावीचे हिरवे तळे टाळणे
नातलगाने आश्चर्याने विचारलेही की आमच्याकडचा ससा का
>>>> भयंकर हसू आले.
ओडीन चे पेपर्स आले अखेरीस
ओडीन चे पेपर्स आले अखेरीस
आणि सोबत एक मायक्रोचिप सारख पण आलं आहे आणि एक इंजेक्शन आहे
ते बहुदा चिप स्किन मध्ये इन्सर्ट करायला आहे
2024 पर्यंत तो या चिप नुसार कुठल्याही प्रवासाला जाऊ शकतो असं मला ब्रीडर म्हणाली
त्यांनतर ते रिन्यू करावं लागेल
अजून पण तीन चार बार कोड चे स्टिकर आहेत ते काय आहेत ते नीट सांगता आलं नाही तिला
पण पेपर्स भारी आहेत सगळी वंशावळ आहे ओडीन ची
आणि जीच्याकडून घेतला तीच द्यायला अली होती
ओड्याला बघून जाम खुश झाली आणि तोही
त्याला ती आठवत नसावी पण त्याच्या आईच्या गंधाला ओळखत असावा किंवा ओव्हराल लॅब भुभी चा वास येत असावा
इतका गळ्यात पडून चाटून झालं की त्याला आवरता आवरता पुरेवाट झाली आमची
कसातरी त्याला पकडून ठेवला तर भुंकून भुंकून घर डोक्यावर घेतले
त्याला त्यांच्याशी खेळायचं होतं पेक्षा गळ्यात पडून लाड करून घ्यायचे होते
त्या म्हणाल्या आईपेक्षा बाबांचे रूप घेतलं आहे
स्मार्ट आणि हँडसम झालाय, मसल्स वगैरे पण अगदी
पोट सपाट आहे, फर एकदम सॉफ्ट आणि शाईन असलेली
खूप छान मेंटेन केलं आहे तुम्ही त्याला
ऐकून अंगावर मूठभर मांस चढला
म्हणलं चला भुभु पालकत्वाची पहिली परीक्षा तर पास झालो छान मार्कानी
अरे वा कसला क्यूट. ओडीन ने
अरे वा
कसला क्यूट. ओडीन ने तिला ओळखायची शक्यता कमी वाटते पण आई च्या वासाचे काय सांगता येत नाही, असेलही लक्षात. त्याची आई/ बाबा तिच्याकडेच आहेत का अजून? कुत्रे एखाद्या पाहुण्या/ पाहुणीच्या लगेच प्रेमात येतात आणि एखाद्याला जाम खुन्नस देतात ते कसं ठरवतात कुणास ठाऊक 
आईपेक्षा बाबांचे रूप घेतलं आहे. स्मार्ट आणि हँडसम झालाय >>> आणि फोटोजेनिक पण आहे ओडीन, त्याचे स्विंमिंग चे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिले मी. फारच हँडसम दिसलाय त्यात.
आमचा माउई मातॄमुखी आहे. सगळे स्वभावगुण पण आईचेच आहेत त्याच्यात.
बाकी इथे शांतता का? नव पालक समीर, पराग , अजुन कोणी रोमात असतील त्यांनी काही गमती जमती लिहा की.
खूप छान मेंटेन केलं आहे
खूप छान मेंटेन केलं आहे तुम्ही त्याला...किती भारी वाटले असेल ना!odin खरंच छान हसरा आहे. काही लॅब वेगळे दिसतात.पण बाबांवर गेलाय हे वाचून मजा वाटली.
धन्यवाद मैत्रेयी, देवकी
धन्यवाद मैत्रेयी, देवकी
कुत्रे एखाद्या पाहुण्या/ पाहुणीच्या लगेच प्रेमात येतात आणि एखाद्याला जाम खुन्नस देतात ते कसं ठरवतात कुणास ठाऊक>>>
माझं निरीक्षण असे की ज्यांच्याकडे भुभु असतं तो वास त्यांना येतो आणि त्यांच्याशी लगेच लाडात येतात ते
ओडीन ज्या ज्या अनोळखी लोकांच्या लाडात आला पहिल्याच भेटीत त्या सगळ्यांना मी विचारले की त्यांच्याकडे भुभिज आहेत का
तर अलमोस्ट सगळ्यांकडे होती, पण फक्त वासच असे नाही
काही जण पूर्वी पालक होते आणि आता नाहीयेत (भुभिज देवाघरी गेलयाने) ते सुद्धा ओडीन शी खेळायला आले तर त्यांच्याही लाडात येतो
त्यांना बहुदा कोणाला आपण आवडतो हे ओळखण्याचे इंट्युशन असते
ओडीन खुन्नस तर कोणालाच देत नाही
त्याला उलट म्हणतो बाबा रे निदान एका तरी व्यक्तीला भीती वाटू देत तुझी, जरा तरी अग्रेसिव्ह वाट
पण नाहीच, कोणीही आलं की हे येड हॅ हॅ करत, तोंड पघळत जातं शेपटी हलवत
जे बेसिकलीच भुभुज ना प्रचंड घाबरतात तेच फक्त ओडीन ला घाबरतात, बाकी ग्राउंड वरची अनोळखी बारकी पोरे पण खुशाल त्याला येऊन थोपटतात, मानेवर हात फिरवतत्
कुणाला नाराज करत नाही सहसा
त्याच्या तंद्रीत असेल आणि खेळण्याच्या मूड मध्ये असेल तर मग पळत असतो कानात वारा गेल्यासारखास पण एरवी अत्यंत निरुपद्रवी
गार्ड डॉग म्हणून तर शून्य मार्क आहेत त्याला
कुरियर वाल्या पासून कोणीही आलं तरी कुतूहलाने बघत बसतो निवांत
कोणावर म्हणजे कोणावर भुंकत नही
भुंकतो फक्त आमच्यवर, त्याला खेळायचं असताना खेळलो नही, दुर्लक्ष केलं तरच
गार्ड डॉग म्हणून तर शून्य
गार्ड डॉग म्हणून तर शून्य मार्क आहेत त्याला
कुरियर वाल्या पासून कोणीही आलं तरी कुतूहलाने बघत बसतो निवांत
कोणावर म्हणजे कोणावर भुंकत नही
भुंकतो फक्त आमच्यवर, त्याला खेळायचं असताना खेळलो नही, दुर्लक्ष केलं तरच>>>>
हे वाचून एकटीच हसत बसले आहे मी..
त्यांना बहुदा कोणाला आपण
त्यांना बहुदा कोणाला आपण आवडतो हे ओळखण्याचे इंट्युशन असते>>>> +१.
एका नातलगाकडे आई गेली असता, ते बोलले ,वहिनी तशाच कूल रहा.त्यांच्या कुत्र्याने,मागून येऊन तिच्या हाताला छान चाटले.चांगला वासराएवढा दांडगा आणि भीतिदायक कुत्रा होता.
मला खूप आवडेल ओडू गोडू ला
मला खूप आवडेल ओडू गोडू ला भेटायला. . आणि माऊईला पण.. फक्त त्या साठी विसा रिन्यू करावा लागेल हा एक छोटासा अडथळा
गार्ड डॉग म्हणून तर शून्य
गार्ड डॉग म्हणून तर शून्य मार्क आहेत त्याला
अगदी डोळ्यासमोर आलं.
मुलाचे मित्र सगळे दांडगे, ६ फूट उंच, त्यात मोठे म्यूझिक लावून आवाज करणार्या गाड्यांमधून येणार. माउई सगळेच चोर दरवडेखोर असल्यासारखे जोरजोराने भुंकत बसतो त्यांच्यावर. त्याला शांत केलं गोंजारलं तरी ते लोक घरात आहेत तोवर तिरसट म्हातार्यांसारखं स्वतःशीच गुरगुर करत बसतो थोड्या थोड्या वेळाने. 
चावट आहे माव्या.
कुरियर वाल्या पासून कोणीही आलं तरी कुतूहलाने बघत बसतो निवांत >>> मला पण फार मजा वाटली
कोणीही आलं की हे येड हॅ हॅ करत, तोंड पघळत जातं शेपटी हलवत >>>
माउई ची कुणाला भिती वाटण्याची शक्यता नसतेच जवळपास. उलट लोक ऑऑऑ सो क्यूट करत जवळ येण्याची शक्यता जास्त. नविन येणार्यांवर तर भुंकतोच पण त्याला ज्यांच्यापासून समहाऊ भिती/थ्रेट वाटते त्यांच्यावर भुंकतो डीफेन्स म्हणून असे आम्हाला वाटते. बहुतेक पुरुष माणसांकडे सहसा संशयाने पहातो.
याउलट मुलीच्या मैत्रिणी. त्या आल्या की मात्र लाडात येऊन त्यांच्या मधे जाऊन बसणार. कुणाच्या मांडीवर बसायलाही कमी करत नाही
या ग्रुप मध्ये मी कधी लिहले
या ग्रुप मध्ये मी कधी लिहले नाही. कारण आमच्या कडे नाहीये पेट कोणताही. पण आज ओडिन चे वाचुन माझ्या ताई च्या पेट ची आठवण झाली. मी तिच्या कडे काही महिने होते.तिच्या कडे ही labrador आहे. white कलर चा. आता 7 वर्षा चा आहे. Jack नाव आहे त्याचे.तो ही कोणी आले की लगेच शेपूट हलवत जातो. कोणिही अनोळखी लोक आले तरिही. आम्ही गमतीने बोलतो हा जरी चोर आले तरी त्याना काही करणार नाही सगळे चोरुन जातील ते आरामात.

सगळे lab nature ने सॉफ़्ट च असतात बहुतेक.
हा धागा स्ट्रेसबस्टर तर आहेच
हा धागा स्ट्रेसबस्टर तर आहेच पण एकदम असा .... इमोशनल, क्युट आहे. फार आवडला हा धागा.
आशुचॅम्प , तुमच्याकडे कधी आलो
ओडीन , माऊई भारी आहेत.
अमुपरी , तुमचा लॅब क्यूट आहे अगदीच
याउलट मुलीच्या मैत्रिणी. त्या
याउलट मुलीच्या मैत्रिणी. त्या आल्या की मात्र लाडात येऊन त्यांच्या मधे जाऊन बसणार. ......
इथले ही सर्व भुभू माऊ गोड
इथले ही सर्व भुभू माऊ गोड आहेत. माऊई खुपच क्यूट वाटतो मला. आणी उद्योगी.
मला इथे विचारायचे होते की dog's चे केस खुप गळतात तर त्याचा त्रास होत नाही का कुणाला? कारण मला होतो. केस माझ्या घशात गेला की माझा घसा खवखवतो. तर हे सवयी ने बंद होते का असे होणे.
Pages