बांद्रा वेस्ट -८

Submitted by मिलिंद महांगडे on 3 November, 2020 - 09:26

बांद्रा वेस्ट -८

‘ ऑडी …. कि मर्सीडीज….? नायतर लिमोझीनच घेतो . नको पार्किंगचा प्रॉब्लेम येईल. त्यापेक्षा बिटल घेतो यलो कलरची ! एलिनाला फार आवडते., आधी हा फडतुस मोबाईल बदलीन, कोणता घेऊ? ऍपल 10 कि नोट 11 …?, पण हे सगळं त्या दहाच्या नोटवर अवलंबुन आहे. ती दहाची नोट मिळाली तर काय बहार येईल ? रॉड्रीक अस्लम रिक्षावाल्याच्या मागे चालता चालता मनातल्या मनात हवेत इमले बांधु लागला नव्हेतर त्यात गाड्याही पार्क करु लागला . ते तिघे बांद्रा स्टेशन आणि बांद्रा टर्मिनंसच्या मधे जी झोपडपट्टी आहे त्यात शिरले. रेलवेच्या ट्रॅकवरच बांधलेल्या त्या झोपडपट्टीत आत शिरता शिरताच एक प्रकारचा दर्प आला. केवळ एखादाच माणुस जाऊ शकेल इतकी चिंचोळी जागा ! दोन्ही बाजुंनी अंगावर येणाऱ्या तीन तीन, चार चार मजल्यांच्या झोपड्या नक्की कशाच्या आधारावर उभ्या आहेत हे दोघांनाही कळत नव्हतं. मधे मधे झोपड्यापुढे बकऱ्या बांधलेल्या, काही टवाळ पोरं उगाचच टाईमपास करत बसली होती. टिव्हीवर रात्रीचे डेलीसोपस् लागलेले. बाहेर त्या चिंचोळ्या जागेत बायका जेवणानंतरची भांडी बाहेर घासत बसलेल्या… काही झोपड्यांतुन एसी चे पार्श्वभाग बाहेर आलेले दिसत होते. त्या सर्वांतुन वाट काढत अस्लम रिक्षावाला मात्र सराईतपणे त्या गल्लीबोळातुन पुढे चालला होता. तो कधी उजवीकडच्या गल्लीत शिरायचा तर कधी डावीकडच्या , असं बरंच आत आत गेला.

” त्याच्यावर नीट लक्ष ठेवुन चाल तो जर नजरेआड झाला तर आपण या भुलभुलैयात अडकुन पडायचो ! ” मॉन्ट्या रॉड्रीकला म्हणाला.

” या मॅन , सिरीयसली. , अरे बॉस और कितना अंदर है ? ” रॉड्रीक आजुबाजुला बघत म्हणाला.

” अबी तो पासमेही है. । ” अस्लम म्हणाला, ” भाय, अपुन जा तो रहेले है लेकीन तुम कैसे पैचानेगा की ये वही नोट है करके….? ”

” उसमे वो गांधीजीका चश्मा लाल कलरका किया है…. ” मॉन्ट्या म्हणाला.

” ओह…. मतलब गांधीजी को गॉगल पैनाएलाय….! ” अस्लम गमतीने म्हणाला.

” हं…. ऐसाही कुछ है. तुमने देखा है क्या वो नोट….? ” रॉड्रीकने विचारलं

” कुछ याद नहीं भाय, आपही देख लो । ” म्हणत अस्लम आत आत चालला होता. असं बरंच लेफ्ट राईट करत ते तिघे एका घरासमोर आले.

” ये आ गया अपना गरीबखाना ! आओ उपर… ” म्हणत तो त्या झोपडीच्या एका बाजुला लावलेल्या अगदी चिंचोळ्या शिडीवरुन वर चढु लागला. ती शिडी डुगडुग हलत होती. तो वर जाउन उभा राहीला.

” अब आजाओ… लोकिन पैर संभालके. ” अस्लम त्यांना सुचना देत होता. ते दोघे कसेबसे वर चढुन आले. वर पाहतात तर त्यांच्या जरा बाजुला आणखी तशीच एक शिडी त्यांची वाट बघत होती. तीसुद्धा चिंचोळी आणि एकदम सरळ, जरा पाय घसरला तर शिडीसकट डायरेक्ट खाली ! हे म्हणजे खरंच अवघड प्रकरण होतं. अस्लम मात्र डोंबाऱ्याच्या चलाखीने चढुन वर पोहोचला देखील ! रॉड्रीक आणि मॉन्ट्या एकमेकांकडे पाहु लागले. पहिलं कोण चढणार…? शेवटी मॉन्ट्याच पुढे झाला . रॉड्रीक त्याच्या मागोमाग चढु लागला , ” व्हॉट द हेल वी आर डुईंग… ट्रेकींग…? ऑर सम काईंड ऑफ मिलीटरी ट्रेनिंग…? ” रॉड्रीक त्या लपलपत्या शिडीवरुन चढता चढता म्हणाला.

” नोट घालवली ना , मग भोगा आता ! ” मॉन्ट्या हसुन म्हणाला. धडपडत दोघे वर पोहोचले. अस्लम झोपड्याच्या दुसऱ्या मजल्यावर रहात होता. त्याच्याही वर आणखी एक मजला होता. स्थापत्यकलेचे सगळे नियम मोडीत काढणारी ही रचना पाहुन दोघेही थक्क झाले.

” आयला, लोक उगाचच ते इटलीला जाऊन तो लिनींग टॉवर ऑफ पिसा बघायला जातात, आपल्या इकडे येऊन बघा म्हणावं. ” रॉड्रीक उपहासाने म्हणाला.

” नाय त काय .. एंचोद काय प्रकार काय आहे हा…! ” मॉन्ट्याही चकीत होऊन आजुबाजुची झोपडपट्टी न्याहाळु लागला. तोपर्यंत अस्लम त्या झोपड्याच्या दाराची कडी काढुन आत गेला. त्याच्या मागोमाग दोघेही आत शिरले.

आत बघीतलं दहा बाय दहा ची एकच रुम, त्यात सामान्य घरात असणाऱ्या सगळ्या वस्तु होत्या तर एक टिव्ही, एक बारीकसा फ्रिज, आणि विशेष म्हणजे एसी सुद्धा …! झोपडपट्टीत राहतात म्हणजे सगळेच काही गरीब नसतात, याचा साक्षात्कार त्या दोघांनाही झाला. अस्लम एका कोपऱ्यात गेला. तिथं एक डबा ठेवला होता. ” ये है मेरा बँक… म्हणत त्याने तो डबा उघडला. बघतो तर त्यात एकही रुपया नाही ! अस्लमचे डोळे उघडेचे उघडेच राहीले …

” अरे ..! मेरा पैसा किदर गया. ..? ” भयमिश्रीत चिंतेने तो स्वःलाच विचारु लागला. आणखी दोन चार ठिकाणी त्याने पैसे शोधले . तांदळाच्या डब्यात … पँटच्या खिशात… मडक्याखाली …. पण व्यर्थ….!

” बँक लुटा क्या किसीने ? ” मॉन्ट्या गमतीने विचारत होता.

“लगता तो ऐसेही है । ” म्हणत तो आणखी दोन तीन ठिकाणी शोधु लागला .

” लगता है मतलब….? क्या बोल रहा है तु….? ” रॉड्रीक वैतागुन विचारु लागला.

” इदरही रखा था, साला गया किदर ? ”

” कोई और भी रहता है क्या इधर ? ” मॉन्ट्याने मनातली शंका बोलुन दाखवली.

” बराबर है … साला हरामखोर शौकत…! ” तो काहीतरी विचार करुन बोलला..

” कौन शौकत…? ” दोघांनाही कळेना.

” भोसडीका मेरा भाई. ! साला वोही ले गया रहेगा मेरा पैसा… ” अस्लम रागाने लाल झाला होता.

” पैसा ले गया मतलब…? किदर ले गया …? ” रॉड्रीकला समजेना काय बोलायचं ते.

” रुको हरामी को फोन लगाता …. ” रागाने त्याने खिशातुन फोन काढला. नंबर डायल केला बराच वेळ फोन वाजत राहीला परंतु समोरच्याने काही तो उचलला नाही. अस्लमने चिडुन आणखी एक शिवी घातली आणि पुन्हा फोन लावला. ह्यावेळी मात्र दिलेल्या शिवीचा परीणाम झालेला दिसला, समोरचा तो शौकत की कोण त्याने फोन उचलला असावा.

” साले किदर है तु…..? क्या हुआ मतलब ? …मेरे डिब्बेमेसे पैसा ले गया ना तु ….? कौनसी रंडी पे उडा रहा है हरामी ….? तु उधरही रुक साले . मै आ रहा हुं वहा. साले मेरा एक भी रुपया गया ना तो देख… ” अस्लमने भडकुन फोन बंद केला.

” अब क्या हुआ भाई …? ” मॉन्ट्याने कंटाळुन विचारलं.

” कुछ नही, वो मेरा भाई है शौकत , वो अभी गया है साला बार में , अपुनको उधर जाना पडेगा । इसके सिवाय दुसरा कोई चारा नहीं । ” अस्लम कसनुसं तोंड करीत म्हणाला.

” अरे अब क्या नया नाटक है यार…? तु बोल रहा है वो बार मे है , कोनसे बार में…? कैसे ढुंडेंगे उसको ? उसको इधर बुला । ” मॉन्ट्या वैतागुन म्हणाला.

” देखो भाय… वो मेरा भाई है । मै अच्छी तरह पैचानता है उसको । वो साला नहीं आएगा । और तो और अगर उसने पैसा उडाया रहेगा तो…? ” कुछ बोल नही सकते । ” अस्लमने नवीनच शंका उपस्थीत करुन दोघांनाही चिंतेच्या गर्तेत ढकलुन दिलं. रॉड्रीक डोक्याला हात लावुन मटकन खालीच बसला. पण लगेच त्याच्या दुसऱ्या मनाने विचार केला, लवकरात लवकर तो बार गाठला पाहीजे .

” किदर है वो बार…. ? चल जल्दी ” क्षणाचाही विलंब न लावता रॉड्रीक उठला.

” मेरेको मालुम है । सालेका एकही बार है , करीष्मा बार….! “

क्रमशः

https://kathakadambari.com

लडाखचे प्रवासवर्णन

Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users