मार्टिन आउअर : दोन कविता
भाषा
त्यांच्या भाषेत प्रेमाला एकही शब्द नव्हता.
त्यांना भक्तिची सप्तपदी अवगत होती
आदराचे अकरा स्तर ते जाणून होते अन्
जाणून होते ते परिचयाच्या वीस पातळ्या...
ते म्हणायचे,
परस्परसंबंधांच्या असतात सतरा छटा अन्
परस्परावलंबित्वाचे असतात प्रकार आठ...
लग्नासारख्या घटनेलाही त्यांच्या भाषेत एक वाक्प्रयोग होता...
आणि परस्परलाभ सुचवण्याची मात्र त्यांच्याकडे बत्तीस आडवळणे होती.
(तसे म्हटले तर त्यांना भक्तीचे सात टप्पे माहिती होते,
आदराचे अकरा स्तर ते जाणून होते अन्
जाणून होते ते एकमेकांशी ओळखीच्या वीस पातळ्या...
ते म्हणायचे,
माणसांतले संबंध सतरा अवस्थांमधून जातात अन्
माणसं एकमेकांवर आठ प्रकारे अवलंबून असतात.
एकमेकांचा फायदा ? बत्तीस शब्द होते त्यांच्या भाषेत ! आणि हो,
लग्नासारख्या घटनेलाही त्यांच्या भाषेत एक वाक्प्रयोग होता...
फक्त
त्यांच्या भाषेत प्रेमाला एकही शब्द नव्हता.)
वरील कविता आउअरच्या जर्मन काव्ययंत्रात वाचली पण टिपून ठेवण्याचे लक्षात आले नाही. ती नंतर इंग्रजी यंत्रात सापडल्याने तीच आवृत्ती देतो. कोणाला जर मूळ जर्मन कविता सापडली व इथे ती दिली तर आभारी राहीन. कवितेचे नाव मी दिलेले आहे. इंग्रजी आवृत्ती देणे काही कारणाने आवश्यक वाटते -
In their language they had no word for love.
They knew seven degrees of devotion,
eleven grades of respect,
twenty levels of acquaintance,
seventeen stages of alliance,
eight variants of dependence,
one expression for marriage
and thirtythree terms for mutual advantage.
-- Martin Auer
मूळ जर्मन कविता (रैना, आभार) -
In dieser Sprache gab es kein Wort für Liebe.
Sie kannten sieben Abstufungen von Ehrfurcht
und elf Grade des Respekts,
zwanzig Stufen der Bekanntschaft
und siebzehn Nuancen von Zugehörigkeit,
acht Varianten von Abhängigkeit,
einen Ausdruck für Ehe,
und zweiunddreißig Umschreibungen für gegenseitigen Nutzen.
-- Martin Auer
-------------------------------------------------------
मुलांना देण्याच्या भेटवस्तूंची कविता
पक्ष्याच्या अंड्यासारखा दगड एक
तर एखादा दगड जणू हाडूक एक
एखादं गोगलगायीचं घर पाठीचं
आतून लिंपण ज्याला मातीचं
कधी एखादा दगड सुरीसारखा
तर कधी एखादा किडाच वाटेल
कधी फांदीला फुटलेली फांदी
न जाणो, कुठे खजिना भेटेल ! *
एखादा दगड अगदी शुभ्रधवल द्यावा
कधी एखादा काळा कुळकुळीत न्यावा
(पण त्याच्यावर थुंकून तो छान चकचकीत करायचा बरं का !)
मूळ कविता -
Kindergeschenke
Ein Stein wie ein Vogelei,
ein Stein wie ein Knochen.
Ein Schneckenhaus,
aber mit Erde innen.
Ein Stein wie ein Messer,
ein Stein wie ein Käfer.
Eine Astgabel
um Schätze zu finden.
Ein ganz weißer Stein
und ein ganz schwarzer.
(Aber man muß darauf spucken, damit er glänzt.)
-- Martin Auer
* फांदीला फुटलेली फांदी म्हणजे साधारण गलोलीसारखी. याचा माती उकरण्यासाठी वापर करून खजिने शोधता येतील.
सर्व सूचनांचे हार्दिक स्वागत.
. चा अर्थ-
. चा अर्थ- पोस्ट एडिट केली.

काय बी राव इच्चारता तुमी!
--
कसा चंद्र! कसं वय! कशी तुझी चांदणसय..!
कसा निघेल इथून पाय! वेड लागेल, नाहीतर काय!
ते मला
ते मला कळलं. मला घाबरुन पोष्ट एडिट तर केली नाही ना असे मला वाटले. मन उघड करुन बोललं तर काही बिघडतं का...
मी ते का
मी ते का केलं ते वर लिहिलं आहे! तुला घाबरायला तू नरभक्षक वाघ आहेस का ?
तसं नाही..
तसं नाही.. पण नव्हाळी माणसं एकमेकांशी बोलताना चाचरतात.. घाबरतात म्हणून तसे वाटले. विसूतील लिंक बद्दल धन्यवाद. मला माहित आहे बहिनाबाईंबद्दल. सोपानरावांनी भित भित अत्र्यांना बहिनाबाईंच्या कविता सुपुर्त केल्यात. एकतर खुद्द सोपानरावांनी शुद्ध शब्द योजले असतील किंवा कदाचित अत्र्यांनी किंवा प्रकाशकांनी त्यत बदल केले असतील असे मला वाटते. कदाचित हे मी खूपच धाडशी विधान करतो आहे. कविवर्य विठ्ठल वाघ यांच्या कविताही मी वाचल्या आहेत. (काया मातित मातित - विठ्ठल वाघ). त्यांच्या कवितेत देखील मधेच शुद्ध शब्द आढळत नाही.
बी, खरंच ही
बी, खरंच ही चर्चा इथे योग्य नाही.
सायोनारा,
सायोनारा, चर्चा कोण करत आहे. मी फक्त भाषा या निमित्ताने बहिनाबाईंच्या एका कवितेचा इथे उल्लेख केला म्हणून पुढील पोष्ट्स इथे लिहिलेत. कधीकधी पोष्टच्या अनुषंगाने बीबीशी सुसंगत नसणारे पोष्ट येतात.
बी, कविता
बी, कविता कळून घेण्यासाठी हा अनुवाद एक प्रयत्न आहे असेही बघता येईल. फक्त जर्मन कविताच असे नाही, तर कुठलीही कविता.
आपण बोलताना म्हणतो ना 'ही राजकारण्यांची भाषा आहे' किंवा 'इथे असली गुंडांची भाषा चालणार नाही', इथेही तसाच अर्थ आहे. ते पटत नसेल तर 'अशी भाषा आणि असे लोक ही एक कवीकल्पना आहे' असा विचार करता येईल.
भाषा हे नाव आणि माबोवरचे वाद यांचा माझ्या मनात काही संबंध नाही. ते नाव दिले कारण ती कविता. तिला लहान मुलांशी निगडित काही नाव कसे देता येईल ते कळले नाही.
कवी 'मराठी' 'जर्मन' अशा कोणत्याच विशिष्ट भाषांबद्दल बोलत नाहीये
दुसरी कविता खरेच दुर्लक्षित राहते आहे का ?
***
Finagle's Second Law : No matter what the anticipated result, there will always be someone eager to (a) misinterpret it, (b) fake it, or (c) believe it happened to his own pet theory.
स्लार्टी,
स्लार्टी, दोन्ही कविता उत्तम आहेत.
मला एका अर्थाने बघता पहिली आवडली. तर दुसर्या अर्थाने बघता दुसरी
लहान मुलाना जे जे काही द्यायचे आहे, ते इतक्या सुंदर आणि अर्थपूर्ण शब्दात मांडले आहे.. खास करून तो फांदीची (गलोल सारखे?) ओळ! थोडक्यात काय तर आयुष्यात पुढे लागणार्या गोष्टी मुलाना भेट द्याव्यात. असाच अर्थ आहे ना??
--------------
नंदिनी
--------------
या कविता
या कविता (unlike समीर आणि बाळ) कोणत्याही संदर्भाशिवाय पोचल्या म्हणून आवडल्या.>>>> स्वाती मोदक.
मला पहिली कळल्यासारखी वाटली (आकडे १७६० सारखे). पुढची चर्चा वाचल्यावर मात्र कळली नाही असं वाटतय. आणखी पुढे येणार्या चर्चेत कुणी स्पष्ट केले तर कळेल.
दुसरी पूर्ण कळली त्यामुळे खूप आवडली. कन्याकुमारीला, कोकणात गेले असतांना मी पिशवीभर दगड गोळा केले होते. आईबाबांनी १० च नेता येतील असं सांगितल्यामुळे टाकुन द्यावे लागले. निवड खूप कठीण होती. मी ते सगळे दगड ३ ते ४ वर्ष जपून ठेवले होते.
स्लार्टी तुम्ही इथे या कविता दिल्या नसत्या तर मला ह्या कधीच कळल्या नसत्या त्यामुळे धन्यवाद.
!!! काही नाही असेच. धागा वर
!!!
काही नाही असेच. धागा वर काढायला.
आठवण आली कवितांची आणि स्लार्टीचीही.
धन्यवाद रैना, हे निसटलंच होतं
धन्यवाद रैना, हे निसटलंच होतं माझं..
Transcreation ला शब्द मिळालाच नाही अजून? भावानुवाद?
दोन्ही कविता आवडल्या. गलोलीची तळटीप दिली म्हणून खजिन्याचा शोध लागला. दुसरी तर किती गोड!
(No subject)
मला पहिली कविता खूप आवडली
मला पहिली कविता खूप आवडली .कितीही काही डिटेल्स ,अनलाय्झींग स्ट्रेन्थ भाषेत असली तरी तिच्यातन प्रेमाचा संदेश पोहोचत नसेल तर ती भाषा रुक्ष होय .असा काहिसा फील आला .धन्यवाद स्लार्टी.
दुसरी कविता तर सुरेख
दुसरी कविता तर सुरेख आहेच.
पहिली दोन तीन वेळा वाचली. मला लागलेला अर्थ असा :
दोन व्यक्तींमधील सहवास नक्की कोणत्या गोष्टींवर अवलंबून असावा? तर परस्पर (गाढ) परिचय, एकमेकांबदल आदर, भक्ती (आदराचीच पुढची पातळी) यांवर.
पण हे झालं आदर्शवादी. मग व्यवहारात काय बघितलं जाईल? तर एकमेकांना तो सहवास लाभदायक आहे ना (परस्परलाभ)? एकमेकांची गरज पूरक आहे ना (परस्परावलंबित्व)? आणि दोघंही त्या नात्यात 'फिट' होताहेत ना (परस्परसंबंध)?
ते आकडे हे महत्त्वाचे आहेत आणि नाहीतही. कवीला त्या आकड्यांच्या अॅबसोल्युट व्हॅल्यूपेक्षाही त्यांची रिलेटिव्ह व्हॅल्यू कदाचित अधोरेखित करायची असेल. हे आकडे म्हणजे जणू या नातेसंबंधातील विविध घटकांना दिलेलं वेटेज. नातेसंबंध घट्ट बांधून ठेवायला कोणता घट्क जास्त भुमिका बजावतो हे लक्षात घेण्यासाठी आकड्यांचा उपयोग केला आहे.
त्यामुळे नात्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे परिचय. एकमेकांना जाणून घेणे. त्यानंतर एकमेकांचा आदर करणं आणि मग त्या आदराची अजून वरची पातळी - भक्ती - गाठणं. भक्ती म्हणजे विश्वास म्हणजेच एकमेकांचा पूर्ण स्वीकार. त्यात प्रश्न, शंका नाहीत.
पण केवळ हे घटक ते नातं घट्ट धरून ठेवतील का? तर नाही. त्याकरता अजून काही मूळ घटक गरजेचे आहेत. हे तुम्ही मान्य करा अथवा नका करू पण कोणत्याही नात्यात हे घटक अध्याहृत असतात किंबहुना असावेत. ते घटक आहेत परस्परलाभ (सर्वात महत्त्वाचा), कंपॅटिबिलिटी (दुसर्या क्रमांकावर) आणि मग एकमेकांची गरज पूर्ण करण्याची क्षमता (तिसर्या क्रमांकावर).
या अटी पूर्ण होत असतील तर लग्नाचा उपचार पार पाडला जावा. लग्न म्हणजे विधी नव्हे तर नात्याची सुरवात या अर्थी हा शब्द आला आहे. ही सुरवात हे ऑबसोल्युट सत्य आहे त्यामुळे त्याला एकच शब्द आहे. जसा बायनरी कोड असतो तसा - सुरवात आहे किंवा सुरवात नाही. १ किंवा ०.
आणि मग प्रेमाला शब्दच नाही कारण या इतक्या भक्कम पायावर उभं असलेलं / सुरू झालेलं नातं त्याच कळसाला पोहोचणार. पण त्या कळसाला शब्द नाही कारण ती एक दीर्घ वाटचाल आहे. ती एक अनुभूती आहे. ती केवळ एक क्षणिक भावना नाही तर दोन योग्य व्यक्तींनी केलेला एकत्रित प्रवास आहे जो सतत सुरू असणार आहे ..... प्रेमाच्या शोधात. तरीही साध्य महत्त्वाचं नाहीच इथे.
Pages