बांद्रा वेस्ट -६

Submitted by मिलिंद महांगडे on 28 October, 2020 - 04:33

बांद्रा वेस्ट -६

” हाऊ बिऊटीफुल अँड रोमँटीक… इजन्ट इट…? ” एलिना समोरचा अस्ताला जाणारा लालबुंद सुर्य पहात म्हणाली. ते दोघे बँडस्टँडवरच्या एका कठड्यावर पाय खाली सोडुन बसले होते. ते त्यांचं नेहमीचं भेटण्याचं ठिकाण होतं. ओहोटी असल्याने समुद्र लांब आत गेला होता. समोर काळे कुळकुळीत , ओबडधोबड खडक संध्याकाळच्या गरम उबदार वातावरणात आरामात पहुडल्यासारखे वाटत होते. जणूकाही ते समोरच्या सूर्याला तात्पुरता निरोप देत होते . बरेच लोक संध्याकाळी बँडस्टँडवर फिरायला आले होते . सूर्यास्त पाहायला चांगलीच गर्दी जमली होती . चना , भेल विकणारे आजूबाजूने फिरत होते . चित्र विचित्र आवाज काढत ते आपला माल खपवण्याचा प्रयत्न करत होते . एलिना खुशीत दिसत होती. आणि का नसावी ! आज तिच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस होता . त्याला इंप्रेस करण्यासाठी तिने डेनिम ब्लु जीन्स आणि पींक कलरचा टॉप घातला होता. आणि बराच मेकपही…! आज ती अतिशय सुंदर दिसत होती . अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा पिवळसर सोनेरी प्रकाश सर्वत्र पसरला होता . रॉड्रीकही सारं काही विसरुन तिच्याकडे पाहत बसला होता. शांतपणे…

” व्हॉट हॅपन्ड रॉडी …? यु लुक सो स्ड्रेसड… ” त्याचं काहीतरी बिनसलंय असं वाटुन तिने काळजीने विचारलं.

” नो … नथिंग… काही नाही. ”

” देन व्हाय आर यु सो क्वाएट…? “ तिने विचारलं

” नथिंग हॅज हॅपन्ड हनी . आय ऍम ओके… ” रॉड्रीकने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी त्याचा चेहरा बोलका होता. त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय हे एलिनाने ओळखलं.

” डोंट वरी… यु विल गेट अ गुड जॉब व्हेरी सून… ” कदाचीत त्याचा हा प्रॉब्लेम असावा असा विचार करुन ती म्हणाली. रॉड्रीक नुसतंच हसला. ‘ आपल्याकडे नाईन्टी नाईन क्रोरस्चा सोन्याचा खजिना आहेत हे तिला माहीत नाही … ते मिळाले तर त्या फडतुस जॉबची कुणाला गरज आहे ? पण ती नोट सापडल्याशिवाय त्यांचा काय उपयोग…? तिला आता सांगुनही काही फायदा नाही. ‘ रॉड्रीक विचार करु लागला. त्याच्या समोर वाजणाऱ्या चुटक्यांनी तो भानावर आला …

” आज तुझा मुड दिसत नाही. यु कॅन टेल मी … ” ती त्याला विचारत होती.

” एलिना, डु यु लव मी …? ” रॉड्रीक तिच्या डोळ्यात पहात म्हणाला.

” ऑफकोर्स आय डु . बट व्हाय आर यु आस्कींग सच अ स्टुपीड क्वेश्चन…? “ ती लटक्या रागात म्हणाली. रॉड्रीक त्यावर काहीच बोलला नाही. तो नुसता समोर बुडणाऱ्या सुर्य़ाकडे पहात राहीला. जवळजवळ पुर्ण सुर्य पाण्यात गेला होता. समोरचं आकाश केशरी – लाल रंगांनी भरुन गेलं होतं. लाल ते निळ्या रंगाच्या विविध छटा बेमालुमपणे एकमेकांत मिसळलेल्या होत्या . खरंच … निसर्गासारखा दुसरा चित्रकार कोणी नसेल. रॉड्रीक हा विचार करत असतानाच ,

” रॉडी, प्लीज… व्हॉटस् दी प्रॉब्लम…? ” एलिना कळवळुन त्याला विचारु लागली….

” आय हॅव द एन्टायर ओशन फॉर मायसेल्फ …. बट कान्ट इव्हन टेक अ सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर आउट ऑफ इट … ” रॉड्रीक हरवल्यासारखा बोलु लागला .

” व्हॉट….? व्हॉट आर यु सेईंग….? आर यु ओके…? आर यु थस्टी …? ” म्हणत एलिनाने त्याच्या कपाळाचं तापमान तपासलं. त्याच्या ह्या बोलण्याचा नेमका अर्थ काही तिला कळेना.

” या… आय ऍम ओके… ”

इतक्यात त्याला मागुन फट् फट्… टाळ्यांचा आवाज आला. ” ए राजु , चल निकाल… ” मागे एक छक्का रॉड्रीकच्या केसांवर बोटं फिरवतच म्हणाला . त्याला एकदम कसंतरीच झालं .

” डोंट टच मी. चलो जाओ … छुट्टा नही है… ” तो तुसडेपणाने त्या छक्क्याला म्हणाला. एखादं कपल दिसलं की हे लोक मागेच लागतात , हा नेहमीचाच अनुभव होता . जोपर्यंत त्यांना काही देत नाही तोपर्यंत ते काही पाठ सोडत नाहीत . काही वेळा तर अमुक अमुक एवढेच पैसे द्या म्हणून अडून बसतात .

” ऐसा क्या करताय रे चिकनचिल्ले…? देख ना जरा पाकीट मे रहेंगा …. देख… ए मेरे शारुख…. मेरे सलमान…. देना… . ” छक्का काही पाठ सोडायला तयार नव्हता.

” तुमको बोला ना … आगे जाव… ” रॉड्रीक वैतागला.

” हाऊ रुड यु आर…! गिव सम मनी . ” एलिना मधेच म्हणाली . तिला नेहमीच ह्या लोकांची दया यायची .

” आय डोंट हॅव. यु गीव हिम , हर… व्हॉटेवर… ” तो टाळण्याच्या हेतुने म्हणाला. तिने आपली छोटीशी पर्स तपासली पण तिला सुट्टे काही मिळेनात.

” मेरेपास भी छुट्टा नहीं… ” एलिना कसंतरी तोंड करुन म्हणाली.

” छुट्टा नय है …? मै देती . लाव. ” म्हणत एलिनाच्या हातातली शंभरची नोट त्या छक्क्याने घेतली आणि सुट्टे नव्वद रुपये परत दिले. “ देख रे चिकने , तू नहीं तो बेबीने पैसा दे दिया . ठीक है , भगवान तूम दोनोको खुश रखें … “ आशीर्वाद देऊन आपण ह्यांच्यावर उपकार करत आहोत अशा थाटात तो छक्का म्हणाला आणि निघून गेला .

“ हॅव यु सीन हिज ऍटिट्युड ? “ रॉड्रिक रागात त्याच्याकडे बघत म्हणाला .

“ लिव्ह इट ! “ एलिना म्हणाली .

” हाऊ मच ही हॅज गिव्हन बॅक…?

” नाईंटी रुपीज…. ”

” व्हॉट द ….. यु गेव हिम टेन रुपीज….? ” रॉड्रीक असं आश्चर्याने ओरडला जसं काही एलिनाने आपली सगळी संपत्ती त्या छक्क्याच्या नावावर केली

” चिल… टेन रुपीज ने काही फरक पडत नाही… ” ती म्हणाली

” टेन रुपीज् नेच तर एवढा मोठा मॅटर झालाय… ” रॉड्रीक पुटपुटला.

” व्हॉट…? व्हॉट डिड यु से…? ”

” नथिंग…. कम लेटस् हॅव कॉफी…. ” म्हणत तो उठला. एलिनाही त्याच्या मागोमाग निघाली. ते दोघे चालत चालत बँडस्टँडच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ‘सीब्रिज’ रेस्टॉरंट मधे आले. रेस्टॉरंटची बैठक व्यवस्था अतिशय सुंदर होती . समुद्राच्या दिशेला फक्त दोन – अडीच फुट उंचीचं बांधकाम होतं आणि त्यावरचा सर्व भाग तसाच खुला सोडला होता. त्या भिंतीला लागुनच टेबल आणि समोरासमोर दोन वेताच्या आरामदायी खुर्चा ठेवलेल्या , त्यामुळे रेस्टॉरंटमधे बसुन समोरचा सारा समुद्र पाहता येतो. रेस्टॉरंटमधलं मंद रोमँटीक संगीत वातावरणाला आणखीनच धुंद करी होतं. एलिनाला हे रेस्टॉरंट फारच आवडत असे . समुद्रावरुन येणारा थंडगार वाऱ्यामुळे तिचे केस भुरुभुरु उडत होते. ते दोघे एका ठिकाणी बसले तिथुन अंधारात बुडणारा सबंध समुद्र दिसत होता. एलिनाने कॉफीची ऑर्डर दिली. रॉड्रीकनेच बोलायला सुरुवात केली.,

” एलिना, आय हॅव सम इम्पॉरटंट वर्क टुनाईट.. ”

” आय नो…. ”

” हाऊ …? ”

” यु लुक्ट टेन्स् बिफोर एनी टास्क . आय नो यु सिन्स चाईल्डहुड. अँड यु आर नॉट गोईंग टु टेल मी एनिथींग , बट डोंट वरी, एवरीथिंग विल बी फाईन. ” ती त्याचा हात हातात घेत म्हणाली. तिच्या मुलायम हातांचा स्पर्श झाल्यावर रॉड्रिकला जर बरं वाटलं . ‘ एवरीथिंग विल बी फाईन ‘ किती सुंदर वाटतं ऐकायला ! पण तसं प्रत्येक वेळी घडतंच असं नाही. नाहीतर ती नोट माझ्याकडुन गेलीच नसती. अँड टुडे आय विल बी अ रिच मॅन… ‘ मनातल्या मनात जरी रॉड्रीक हा विचार करीत असला तरी ते त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं.

” आय नो, व्हॉट यु नीड नाऊ. ” म्हणत ती त्याच्या जवळ आली आणि आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. त्या धुंदीतुन बाहेर यायला रॉड्रीकला थोडा वेळ लागला. त्याने डोळे उघडले एलिना अजुनही त्याच्या जवळच होती , खुप जवळ…. ” हॅपी बड्डे डार्लींग….! ” अत्यंत हळुवार आवाजात ती रॉड्रीकला म्हणाली. रॉड्रीक समाधानी चेहऱ्याने तिच्याकडे एकटक पाहु लागला.

” व्हॉट… “, तिने खट्याळपणे त्याला विचारलं.

” थँकस्… ” तो मिश्किलपणे तिच्याकडे पहात म्हणाला. ती छानपैकी लाजली. थोड्या वेळातच कॉफी आली. समुद्रावरुन येणारा गार आर्द्र वाऱ्यात बसुन दोघेही समोरच्या कॉफीचा आनंद घेऊ लागले. रेस्टॉरंटमधे इन्रिक एग्लेसिसचं मंद रोमँटीक गाणं लागलं…

आय कॅन बी यो हीरो….

आय कॅन किस अवे द पेन….

आय विल स्टँड बाय यु फॉरेवर….

यु कॅन टेक माय ब्रेथ अवे….

क्रमशः

माझी वेबसाईट - एक नजर मारा

https://kathakadambari.com

लडाखचे प्रवासवर्णन

Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा..
10 रु आले वाटतं परत..
म्हणजे काखेत कळस नी गावाला वळसा होणार वाटतं?