IPL मालक आणि ROI

Submitted by कटप्पा on 27 October, 2020 - 09:43

आयपील मालक इतके हजारो करोडो पैसे देऊन संघ विकत घेतात, त्यावर आणखी करोडो देऊन खेळाडू मिळवतात.

आता हे सगळे हॉबी म्हणून तर करत नसणार. त्यांना या गुंतवणुकीचा रिटर्न कसा मिळतो?

Group content visibility: 
Use group defaults

छान धागा कटप्पा!

यातला एक मालक शाहरूख आहे. चाहत्यांच्या बाबतीत तो अब्जोपती आहेच पण पैश्याच्या बाबतीतही आजच्या घडीला भारतातील पहिला आणि जगातला दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंता कलाकार आहे,
त्यामुळे मलाही उत्सुकता लागली आहे की या श्रीमंतीत आयपीएलचा किती वाटा आहे?
उगाच नाही तो आपली ईतर सारी महत्वाची कामे सोडून तिथे दर दुसर्‍या सामन्याला मैदानावर दिसतो.

म्हणजे त्यांना प्रॉफिट होत नाहीय.
२० करोड प्रॉफिट वर्षाला म्हणजे काहीच नाही गुंतवणुकीच्या तुलनेत.