संध्याछाया १

Submitted by निखिल मोडक on 26 October, 2020 - 08:54

पश्चिमेचा वारा सुटलासे गार
गंधाळला गुलमोहर नदीकिनारी
संध्येची वेळ ही अशी कातर कातर
तुझ्या माझ्यातले मोहरले अंतर

तुझ्या पदरवांचा मंजुळ स्वर
घुमतसे श्रवणांगणी मधुर
प्रिये ये आता नको दूर राहू
तुझ्या करपाशी घेई मज सत्वर

किती युगे लोटलीसे आता वाटताहे
ह्या युगीचाही अस्त हो भास्कर
मजलागी आता देई अर्घ्य प्रिये
शेवटचा तरी आता ऐकू दे गंधार

©निखिल मोडक

Group content visibility: 
Public - accessible to all site users