बांद्रा वेस्ट – ४

Submitted by मिलिंद महांगडे on 22 October, 2020 - 11:01

बांद्रा वेस्ट –४

” रॉडी, आपल्याला काही माहीती लागेल… ती तु नीट आठवुन सांग. ” मॉन्ट्या एखाद्या इन्व्हेस्टीगेटींग ऑफिसरसारखा बोलु लागला. त्याच्यातला मेकॅनिकची जागा आता डिटेक्टीवने घेतली. ही असली कामं करायला त्याला फार आवडायची . त्याचं पुर्वीपासुनचं गॅरेज नसतं तर तो कुणीतरी प्रायवेट डिटेक्टीव्हच व्हायचा.

” ती दहा रुपयांची नोट जनरली कशी होती …? “

” कशी होती म्हणजे ? नोटेसारखी नोट दुसरं काय…? ” रॉड्रीक त्याला काही सिरीयसली घेत नव्हता, मुळात गेलेली ती नोट परत मिळेल यावर त्याचं व्यवहारी मन विश्वास ठेवायला तयार नव्हतं.

” अरे म्हणजे, नोट जुनी होती की नवीन…? “

” नवीन … “

” ओके , त्यावरचा नंबर वगैरे काही तु बघितला होतास का ? म्हणजे जोसेफअंकलनी सांभाळुन ठेवायला सांगितली होती म्हणजे तु ती नीट बघितली असशील कदाचीत ! ” मॉन्ट्या त्याच्याकडुन माहीती घेण्याच्या प्रयत्नात होता.

” आय डोंट नो यार…. एवढं नंबर वगैरे कोण बघतं ! ” रॉड्रीकला काही आठवेना .

” बंर , ठिक आहे . त्यावर काही लिहीलेलं , किंवा काही खुण केलेली होती का …? एखादा लक्षात रहाण्याजोगा मार्क ? ” मॉंट्याने दुसऱ्या प्रश्नाचा नंबर फिरवला .

” मार्क …? मार्क…. ” रॉड्रीक आठवायचा प्रयत्न करु लागला. ” हां …. येस…. त्यावर जो गांधीजींचा फोटो असतो ना , त्यांचे जे स्पेक्स् आहेत ते रेड कलरचे होते. डॅडने ते रेड कलरचे केले होते. लक्षात रहावं म्हणुन मे बी….. येस… आय रिमेंबर्ड…! येस… मॉंट्या ग्रेट गोइंग… ” रॉड्रीकच्या चेहऱ्यावर प्रथमच हसु आले होते…

” येस … हा चांगला क्लु मिळाला … ” मॉंट्याही खुष झाला…” नोटबद्दल तुला आणखी काय आठवतंय…? “

” अजुन, तसं काही इम्पॉर्टंट नाही. ” रॉड्रीक अजुन काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते आठवत नव्हतं. इतक्यात त्याचा सेलफोन वाजला.

” ओह शिट , एलिनाचा फोन…” रॉड्रीक घाबरत उठला. ” येस हनी …. हाउज लाईफ…. ओह थँकस् डिअर…. सॉरी हनी … आय ङॅव सम इम्पॉरटंट वर्क… नो स्विटी…. प्लिज ट्राय टु अंडस्टँड…. आय विल मीट यु इन दि इव्हीनिंग…. बाय …. लव्ह यु… बाय…. ” म्हणत, सुस्कारा सोडत रॉड्रीकने फोन ठेवला… मॉंन्ट्या त्याच्याकडे वैतागलेल्या नजरेने पाहु लागला.

” सॉरी यार, एलिना होती. ” ओशाळलेपणे रॉड्रीक बोलला.

” ते आलं लक्षात…. पण आपलं इथं काय चाललंय ? “

” सॉरी बोललो ना बाबा…! ”

” ओके , तर कुठे होतो आपण …? हां…. बरं हे झालं नोटबाबत… आता मला सांग तु काल बांद्र्याला किती वाजता पोचला ? “

” शेवटच्या बोरीवली लोकलनी … १.३० च्या आसपास…” रॉड्रीकने अंदाजाने सांगितलं .

” हं…. तो जो रिक्षावाला आहे त्याचा चेहरा तु ओळखु शकशील का ? “

” नो आयडीया… मला जाम चढलेली होती. मी नुसता रिक्षात बसलो आणि झोपेतच घराजवळ उतरलो. आय डिडंट सी हीज फेस. ” रॉड्रीक नकारार्थी मान हलवत म्हणाला.

” बर… त्याच्याबद्दल आणखी काही आठवतंय का ? किंवा त्याच्या रिक्षाबाबत. ” मॉंट्याची प्रश्नांची सरबत्ती सुरुच होती आणि ती रॉड्रीकला विचार करायला भाग पाडत होती.

” नाही रे… व्हाय शुड आय रिमेंबर हीम , ऑर हिज रिक्षॉ…? मला काहीच आठवत नाही. ” डोक्याला बराच ताण देऊनही काही आठवेना तेव्हा रॉड्रीक वैतागला.

” सोड , तो तुला काय बोलला …? ” मॉन्ट्या हार मानायला तयार नव्हता.

” छुट्टा नही है… वगैरे असं काहीतरी . “

” ओके , म्हणजे रिक्षावाला मराठी नसला पाहीजे . ” मॉंट्या मिळेल त्या माहीतीवर नुसते तर्काचे इमले चढवत होता…

” आय डोंट थिंक सो , मुंबईत बरेच मराठी लोक काही कारण नसताना हिंदी बोलतात. आपण असा विचार करु शकत नाही. तो कोणीही असु शकतो. यु कांट से लाइक दॅट. ” आधी नकारघंटा वाजवणारा रॉड्रीकही आता मॉंट्यासारखा विचार करु लागला.

” तसं तु म्हणतो ते पण बरोबर आहे , मग आता त्या रिक्षावाल्याला ओळखायचा कसा…? ” भुलभुलैयात अडकल्यासारखे दोघेही फिरुन फिरुन त्याच ठिकाणी येत होते.

” रिक्षाचा नंबर …? नाही…. तु रिक्षाच नीट बघितली नाही तर नंबर कुठुन बघणार…? ” मॉंन्ट्या स्वतःच विचार करु लागला.

” वेट…! आय डोंट थिंग इट इज युसफुल बट… मी घराजवळ उतरलो तेव्हा त्याने थोडं खाली वाकुन रिक्षाची आतली लाईट लावली. तेव्हा माझ्या डोळ्यांवर एकदम प्रकाश पडला. अँड फॉर अ सेकंड आय ओपन्ड माय आईज… तेव्हा मी पाहीलं की त्या रिक्षावाल्याने ग्रीन कलरची गोल टोपी घातलेली. ” काहीतरी सापडल्यासारखा रॉड्रीक डोळे मोठे करुन सांगु लागला.

” गोल ग्रीन टोपी …? म्हणजे गोल हॅट …? ” मॉंट्याने विचारलं.

” इडियट ! हॅट घालुन कोणी कशाला रिक्षा चालविल ? “

” ओह… तशी गोल टोपी ? म्हणजे तो रिक्षावाला मॉमेडीयन असला पाहीजे , बरोबर….? ” मॉंट्याने तर्काच्या इमारतीवर आणखी एक मजला चढवला.

” येस… देअर यु आर…! “

” पण असे बरेच रिक्षावाले टोप्या घालतात. त्यातला नेमका कसा ओळखायचा …? ” मॉंट्याने योग्य शंका काढली…

” पण मी काय म्हणतो. , त्या रिक्षावाल्याने ग्रीन कलरची टोपी घातली होती. बहुतेक टोप्या ह्या पांढऱ्या रंगाच्या असतात. अशी हिरवी टोपी घालणारे किती जण असतील ? “

” हो रे , जास्त नसतील. ” मॉन्ट्या खुष झाला. पण लगेच त्याने एक शंका काढली. ” पण आणखी एक पंगा आहे , तो रिक्षावाला ती एकच हिरवी टोपी किती दिवस घालेल ? म्हणजे तो टोपी तर बदलुही शकतो ना ? “

” मॉंट्या , साल्या मला नाईंटी नाइन क्रोरस मिळावेत अशी तुझी इच्छा दिसत नाही. किती कन्फ्युज करतोयस ? “

” अरे बाबा सगळ्या शक्यता तपासायला नको का ? आपण राईट डायरेक्शनने जायला पाहीजे असं तुला वाटत नाही का ? “

” या … यु आर राईट पण मला टेन्शन येतंय ना ! “

” हे बघ… ती नोट मिळाल्याशिवाय तर तु काहीच करु शकत नाहीस. असं समज की तुझ्याकडे ते पैसे नाहीतच. ”

” असं कसं समज…? हे म्हणजे चार पाच दिवसाच्या भुकेल्या माणसाच्या पुढे चिकन तंदुरी आणि बिर्यानी ठेवायची आणि त्याला सांगायचं की हे जेवण नाही असं समज… असं सांगण्यासारखं आहे. काय पण बोलतो…! ” रॉड्रीक तुसडेपणाने बोलला.

” आता जर माझ्या मनात जे आलंय ते मी बोल्लो तर तु मला मारशील…! मॉन्ट्या मस्करीच्या मुडमधे दिसत होता.

” काय …? सांग … नाय मारणार. “

” तो माणुस ज्याच्यापुढे चिकन तंदुरी आणि बिर्याणी ठेवलीय तो प्युअर व्हेज असेल तर… हॅ…हॅ….हॅ…. ” करुन मॉन्ट्या जोरजोरात हसायला लागला.

” मॉन्ट्या, एकदम बकवास . व्हेरी बॅड जोक ” रॉड्रीकने त्याला एक फाईट लावुन दिली .

” ओके … ओके… सॉरी , अरे बराच वेळ ही सिरीयस चर्चा केली मग आता जरा हलकं नको वाटायला ? ” मॉन्ट्या हसत हसत म्हणाला. रॉड्रीकच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले. काही का असेना पण मॉन्ट्या आल्यामुळे आपल्याला बरं वाटु लागलंय ही जाणीव रॉड्रीकला झाली. आणि तोही त्याच्या हसण्यात सामील झाला . पैसे मिळतील किंवा मिळणार नाहीत, पण जीवाला जीव देणारा निदान एक मित्र तरी आहे असा विचार करुन तो चांगलाच सुखावला.

” रॉडी, आपल्याला आता चांगले क्लु मिळलेत. सुरुवात तर चांगली झाली. चल, उठ…तयार हो. आपल्याला लगेच निघालं पाहीजे. ” मॉंट्या काहीशा निर्धाराने म्हणाला.

” पण कुठे…? ” रॉड्रीकला कळेना.

” बांद्रा स्टेशन…. बांद्रा वेस्ट…. ”

क्रमशः

माझी वेबसाईट

https://kathakadambari.com

लडाखचे प्रवासवर्णन

Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users