चांगल्या सवयी दीर्घकाळ कशा टिकवाव्यात?

Submitted by केअशु on 20 October, 2020 - 09:03

बर्‍याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही.

असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे?

तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत?
या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol .. म्हणजे दीड तासच असे नाही कुणाला ८० मिनिटांची लागेल कोणाची १०० मिनिटांची असेल... एखादे स्लीप ट्रॅकर लाऊन आठवडा किंवा महिनाभराचा स्लीप पॅटर्नचा अ‍ॅवरेज काढला तर साधारणतः अंदाज येईल झोपण्याच्या आणि ऊठण्याच्या वेळा काय असाव्यात.

बाकी तू रोज तात्याच्या आठवणी घेऊन झोपायला जातोस ..वन ऑफ दीज डेज यू आर गोइंग टु वेक अप वेअरिंग अ मागा हॅट अँड अ गॉल्फ क्लब ईन योर हँड. आय वुडंट बी सरप्राईझ्ड ईफ यू स्टार्ट राइटिंग ईंग्लिश ईन देवनागरी Wink

मी तर गजर न लावताही वेळेत उठू शकते. झोपताना मनात ‘मला सकाळी ५.४५ ला उठायचे आहे‘ असे ठरवले कि बरोबर ५.४५ ला किंवा ५ मिनीट आधी जाग येते. तसेच गजर लावला तर तो वाजायच्या ५ मि. आधीच जाग येते.
चांगल्या सवयी दीर्घकाळ टिकविण्यासाठी त्या आपल्या रोजच्या जगण्याचा भाग कश्या होतील ते बघावे.
उदा. उत्साहाच्या भरात आपण व्यायाम करायचं ठरवतो. मग दुसऱ्या दिवसापासून आपली दिनचर्या बदलून कामालाही लागतो. जर लवकर उठायला जमत नसेल आणि लवकर उठून व्यायाम सुरू केला तर तो उत्साह जास्त वेळ राहत नाही. कारण ही सवय लावण्यासाठी आपण आपली दुसरी सवय मोडत असतो. त्यापेक्षा आधी मनाची तयारी करावी. मी व्यायाम का करायला पाहिजे? त्याने माझ्यात काय बदल होणार? फायदे कोणते? त्यानंतर मग मला कोणत्या वेळेत व्यायाम करता येईल? त्यानंतर रिलॅक्स व्हायला मला वेळ मिळेल का? कोणत्या व्यायामाने सुरूवात करावी? सुरूवातीला किती वेळ व्यायाम करावा? आपल्याला कितपत झेपेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि माहिती मिळवावी मग सुरूवात करावी.
जोपर्यंत आपल्याला व्यायामाची सवय होत नाही तोपर्यंत स्वतःला प्रवृत्त करत रहावे. त्यासाठी त्याबद्दल वाचावे, व्हिडीओ बघावे, ब्लॅाग फॅालो करावे.
स्वतःचे कॅलेंडर करावे. ते सहज नजरेस पडेल असे ठेवावे. त्यात आज काय, किती वेळ व्यायाम केला ते टिपावे किंवा एखादी खून करावी. जेणेकरुन आपली प्रगती किती होते ते पटकन कळेल.
चांगल्या सवयी अंगवळणी पडायला वेळ लागतो. पण त्या पडल्या नाहीत तर मात्र आपण वेगळे काहीतरी करत आहेत, त्यासाठी वेळ काढावा लागतो असे वाटून आपली दमछाक व्हायला होते. मग त्याचे दडपण वाटून तो प्रयत्न मागे पडतो.

माझी दोन आठवड्यांनी 'हक्काच्या करमणुकीवर पाणी सोडायला लागतंय की काय' या विचारानेच झोप उडाली आहे. Wink

मला सुद्धा उठणे अति अवगढ वाटायचे.. अजुनही वाटते, पण प्रगती आहे. व्यायामाच्या बाबतीत एक ठरवले होते की, उठायला उशीर झाला तरी उशीरा का होईना, व्यायाम करायचाच. म्हणजे एका वाइट सवयीमुळे अजुन एक वाईट सवय नको, व्यायाम बुडवायची. यामूळे नक्की मदत झाली.

माझा प्रॉब्लेम हा मेडीटेशनसंबंधी आहे.बर्‍याच वर्षांपूर्वी एका किचकट प्रॉब्लेममधून जाताना मानसिक ताणामुळे येणारे मनातले अनावश्यक किंवा नकारात्मक विचार कमी व्हावेत यासाठी एका स्नेह्यांनी जपमाळेचा उपाय सुचवला होता.दुसरा काही पर्याय त्यावेळी नसल्याने त्यावेळी 'शरणागती पत्करुन' मी तो उपाय केला आणि त्यामुळे कमालीचा फायदा झाला देखील.
आता हे मला परत सुरु करायचं आहे.त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.पूर्वी हे कार्य बिनबोभाट घडून गेलं कारण पर्याय नव्हता,फारच अडचणीत होतो,शरणच गेलो म्हणा!
आता का जमत नाहीये तर 'समस्येची तीव्रता किंवा आवाका पूर्वीइतका मोठा नाहीये.सध्याचा उपक्रम हा आहे त्यापेक्षा अधिक फायदा मिळवण्यासाठी करत आहे.
यात अजून एक लोचा म्हणजे मी जरा चिकित्सक आहे.जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्‍याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते.पुढे पुढे १-२ दिवस खंड पडतो.मग बळजोरीने परत काही दिवस रेटले जाते.हा खंड पडण्याचा कालावधी वाढला तर उत्साह जवळपास संपल्यात जमा होऊन उपक्रम थंडावतो.मी आचरत असलेल्या उपायामुळे मला फायदा होणार आहे हे मला १००% माहित आहे.तसूभरही शंका नाही.
सारांशाने सांगायचे तर उपक्रम बारगळ्याचे कारण हे त्या उपक्रमाच्या प्रक्रियेतला 'एकसुरीपणा' हे आहे.
यावर काय उपाय करता येईल?

सोनाली, माझी मुलगी तुझ्याच सारखी काही प्रमाणात आम्ही दोघंपण आहोत. मुलीने अभ्यासासाठी उठायला कधीही गजर लावला नाही. रात्री वेळ ठरवायची सकाळी त्यावेळेला उठायची. निकड कशी आहे त्यानुसार सवयी लागतात. केअशुचच उदाहरण!
केअशु , जप करताना तोच विचार/चिंतन करा. योग्य व मोनोटोनस नसलेला पर्याय सापडला की त्यावर लक्ष केंद्रित करा.
आम्हा दोघांनाही सकाळी पाचला जाग येतेच रात्री कितीही वाजता झोपलो तरी. घरी असलो की आमचं एक रुटीन असतं पण कुणाकडे गेलं की पंचाईत होते. सवयी मुख्यत: मनावर व वयावरही अवलंबून असतात. २१ दिवस चॅलेंज वर्क करतं .... स्वानुभव!

मला सकाळी अगदी ठराविक वेळेला नक्की जाग येते. रात्री कितीही जागरण झाले असले तरी. स्वतःच्या या सवयीचा कधीकधी फार राग येतो. कारण बऱ्याचदा शरीराला विश्रांती हवी आहे हे कळते परंतु तसे होत नाही. मी कितीही लवकर सकाळी/ पहाटे अगदी चार पासून उठून सर्व कामे करू शकते. रात्री जागायचे म्हटले की अंगावर काटा येतो.
हुकमी झोप असणारे /बसल्याजागी झोपणारे यांचा मला अतिशय हेवा वाटतो.

अजून एक सवय म्हणजे कोणाला कुठलीही वेळ दिली तर मी अगदी जीवाच्या आकांताने पाळते. खूपदा तसे करायची गरज नसते परंतु काय करणार .....सवय! ती वेळ पाळायची म्हणून भयानक - म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टींचे प्लॅनिंग पण करते.

अजून एक म्हणजे प्रत्येक पदार्थ जास्तीत जास्त घरगुती कसा करता येईल याकडे लक्ष देणे. म्हणजे मेयॉनीज, सॉस, चटण्या, लोणची, अनेक प्रकारची पीठे, सत्व, रेडी मिक्स पदार्थ, दळण हे सारं पुण्यासारख्या ठिकाणी खात्रीलायक रित्या चांगले मिळू शकते. परंतु का कोण जाणे ते घरीच करण्याचा सोस आहे. हे सर्व ऑफिस आणि आता मदतीला बायका नसताना घरकाम, लहान मुले, सणवार सांभाळून करताना फार दमछाक होते. हे कळतं पण वळत नाही.

असं ही कधीकधी वाटतं या खरंतर चांगल्या सवयी आहेत त्या न केल्याने तगमग होते हेच चांगलं आहे.

मी व पत्नी गेली २५ वर्षे दर आठवड्यात ५ वेळा दररोज ५० मिनिटे ४ ते ३.७५ किमी चालतो. सवय झाली आहे. याला आम्हाला ३० दिवस लागले... रोजच्या वॉक साठी आम्ही सुरुवा तीस इन्सेन्टिव्ह ठेवले होते व न जाण्यास कठोर डिस इन्सेन्टिव्ह... उदा: गोड नाही..... किंवा ४ दिवस टीव्ही नाही... इत्यादि... मग गरज भासली नाही..... भिंतीवर एक चार्ट पण होता.... त्याने मदत केली

झोप हा विषय येथील लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा असावा.
जवळ जवळ सर्व प्रतिसाद झोपे विषयी च आहेत.
ही अशी मंडळी झोपेतून उठणार कधी छंद आणि उपक्रम ला वेळ देणार कधी.

Pages