डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ३१ - दिसतं तसं नसतं)

Submitted by निमिष_सोनार on 16 October, 2020 - 02:07

भाग ३० ची लिंक: https://www.maayboli.com/node/77024

भाग ३१ - दिसतं तसं नसतं

जेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरले तेव्हा भारत सरकार आणि तिन्ही लष्कर यांच्या वतीने पंतप्रधानांनी देशाच्या नावे सकाळी एक संदेश जारी केला:

"भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या नव्या स्वागत संस्थेवर विश्वास ठेवा. आपण या संकटावर नक्की मात करू. कृपया एकच विनंती जनतेला आणि प्रसार माध्यमांना आहे की त्यांनी स्वागत च्या कार्यात अडथळे येतील असे काही वागू नका! आपण त्या दोघा महत्वाच्या व्यक्तींना केवळ वाचवण्यातच यशस्वी होणार नाही तर मला विश्वास आहे की आपणच जगाचे नेतृत्व करून जगावर घुटमळत असलेले हे संकट परतवून लावू! आणि जनतेला विशेषतः पुणे मुंबई जिल्ह्यातील जनतेला विनंती आहे की येणारे दोन तीन दिवस घराबाहेर पडू नका. अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा!"

आता सर्व प्रसारमाध्यमे मुंबई पुण्यातील त्या चौघा VIP च्या घराच्या जवळपास तसंच पुण्यातील संचेती हॉस्पिटलजवळ केंद्रित झाले होते. मग विविध चॅनेल्सनी वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या. सरकारवर टीका करणाऱ्या तसेच सरकारची प्रशंसा करणाऱ्या विविध हेडलाईन्स ऑनलाईन न्यूजपेपर्समध्ये यायला लागल्या.
“कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सरकार सक्षम!”
"आता सरकार सुपरहिरोसारख्या दिसणाऱ्या लोकांवर अवलंबून राहणार काय?"
"तिन्ही लष्कर कमी पडतात की काय, जेणेकरून सरकारला अशा एका संस्थेवर अवलंबून राहते आहे?"
"आता सरकार लष्कराची कामे पण आऊटसोर्स करायला लागलं आहे"
"आजच्या या युगात माणसे आधीच हिंसक झालीत, पैशांसाठी खून करत आहेत आणि आता तर प्राणी सुद्धा त्यात सामील झालीत, जगाचा अंत जवळ आला आहे का? माणसाने विज्ञानाचा वापर चांगल्या पेक्षा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी केल्याने ही आज जगावर पाळी आली आहे!"

जगभरातील विविध देशांतील प्रसार माध्यमे पण या घटनेकडे लक्ष ठेऊन होती. भारतातून त्यांना वेळोवेळी अपडेट देण्यात येत होते. अनेक देशातील विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा वार्तांकन करत होते.

संचेती हॉस्पिटलमध्ये:
बेशुद्ध पडलेल्या डिटेक्टिव्ह निगेटिव्हला काहीच इजा झालेली नव्हती. खरे तर डिटेक्टिव्हच्या वेशात तो हाडवैरी होता. कितीही उंचावरून पडला तरीही त्याला काही होत नव्हते. शिडीवरून तो पडला तेव्हा त्याने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले होते आणि अग्निशमन गाडीत हाडवैरीच्या वेशात एक साधा स्वागत-फायटर होता. नंतर तो साधा फायटर हॉस्पिटलमध्ये बेडवर डिटेक्टिव्ह म्हणून लोळला.

डिटेक्टिव्हने त्याला तिथेच राहू द्यायला सांगितले. डॉक्टरांना विश्वासात घेऊन हाडवैरीने सगळे सांगितले, तसेच ही गोष्ट गुप्त ठेवायला सांगितली. खात्रीसाठी डॉक्टरांचे फोनवर लष्करी अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले. डॉक्टरांना सूचना देऊन साध्या वेशात हाडवैरी रिक्षेने पुन्हा लोहगाव विमानतळावर गेला. तिथे सुनिल आणि इतर काही स्वागत फायटर्स आणि लष्करी अधिकारी हे एका केबिन मध्ये बसले होते.
सुनिलने आधीच हा प्लॅन बनवला होता, कारण त्याला माहिती होते की भारतात आल्यानंतर प्रसारमाध्यमे हात धुऊन मागे लागतील. त्यांना टाळणे कठीण होऊन बसेल. या मोहिमेबद्दल टीव्हीवर सगळीकडे ते लाईव्ह दाखवतील. ते लाइव्ह प्रक्षेपण दुश्मन बघतील आणि फायदा घेतील आणि त्यानुसार त्यांचा प्लॅन बदलतील. त्यामुळे अचानक जगासमोर ही मोहीम सुरू झाल्याचे खोटे दाखवायचे जेणेकरून प्रसारमाध्यमे याचे लाइव्ह प्रक्षेपण करतील. आणि पुणे-मुंबईतील वाईट टीमचे साथीदार सावध होतील आणि काहीतरी असे पाऊल उचलतील की ज्यामुळे पुणे मुंबई शहरात लपलेले वाईट टीम मेंबर्स चा माग काढता येईल आणि हेही कळेल की त्या व्हीआयपी व्यक्तींवर हल्ला करण्याचा प्लान कसा आणि कुठे शिजतो आहे.

म्हणजे थोडक्यात त्या वाईट टीमच्या मेम्बर्सला बिळाबाहेर काढण्यासाठी हा एक चकवा होता.

आणि या लाईव्ह प्रक्षेपण चा फायदा आपण स्वतः घ्यायचा असे सुनिल ने ठरवले. पण ते इतक्या लवकर हल्ला करतील असे सुनिल ला वाटले नव्हते, पण त्यामुळे स्वागत चे काम सोपे झाले खरे पण एक मात्र नक्की झाले की वाईट ने पुण्या मुंबईत किती जागोजागी आपले माणसं तैनात करून ठेवले होते याचा विचार करवत नव्हता. ही सगळी माणसे बेरोजगार असावीत जी थोड्या पैशांसाठी वाईट टीमला सामील झाली असावी. त्यानुसार जेव्हा विमानतळावरच बसलेल्या सुनिलने टीव्हीवर संगमवाडी ब्रिज खालून रान मांजर पुलावर उडी मारताना पाहिले तेव्हाच त्याला पुलाखाली आणखी एक लाल वर्तुळ असलेला ठिपका वेगाने जातांना दिसला. तो ठिपका म्हणजे रान मांजर हॅण्डल करणारा माणूस होता. सुनिलने बरोबर दिशा पकडून दूरदृष्टीने त्याचा पाठलाग सुरू केला. तो माणूस बाईकने एके ठिकाणी जाऊ लागला त्याचा पाठलाग सुनिल दृष्टीने करू लागला.

जेएम रोडवर येऊन तो बाईकवाला माणूस मंगला मल्टिप्लेक्स कडे वळला. तिथून पुलाखालून तो मनपा भवन जवळच्या एका पीएमटी स्टॉपकडे गेला. तिथे पुलावर चढण्यासाठी असलेल्या पायर्‍यांवर एक माणूस बसलेला होता. त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्याच्या डोक्यावर प्रखर ज्वलंत लाल वर्तुळ सुनिलला दिसत होते.

^^^

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय.
फक्त प्रतिसाद दिला नव्ह्ता.
नेहमीपेक्षा जरा वेगळ्या धाटणीची कथा आहे.
पण वेग सोडू नका.
संपूर्ण झाली की अभिप्राय देऊ असं ठरवलेलं होतं.