नाती... माती..

Submitted by रोहितकुलकर्णी on 15 October, 2020 - 12:28

फसवी होती सगळी नाती
मुळात हलकी होती माती

उजळावे की विझून जावे
प्रश्न विचारत होत्या वाती

पडतच नाही धुके अताशा
सुकी सुनी गवताची पाती

माणुसकी निजली केव्हाची
गावामध्ये जाग्या जाती

खाली प्रवाह पळतो आहे
कसलीच खळबळ नाही वरती

खड्डे खोदून चट्टे आले
काहीच नाही लागत हाती

Group content visibility: 
Public - accessible to all site users