चीज पाव. (ब्राझिलियन आबालवृद्धांचा आवडता पदार्थ )

Submitted by विक्रमसिंह on 13 October, 2020 - 03:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४०० ग्रॅम साबुदाणा पीठ (मका पीठ घेतल तरी चालते)
दीड कप दूध
पाव कप तेल
१ कप पर्मेसान चीज
पाव कप मोझेरेला चीज
चवीप्रमाणे मीठ
१ चमचा बेकिंग पावडर (ऑपशनल)
२ अंडी ( ऑपशनल)

मिरी व लाल तिखट (चिलि फ्लेक्स चालतील). हे ऑपशनल आहे. ब्राझिल मधली लोक घालत नाहीत. नाही घातल तरी चालेल. हिरव्या चटणी किंवा सॉस बरोबर मस्त लागेल.

क्रमवार पाककृती: 

हा पदार्थ आम्ही ब्राझिलला असताना तज्ञांनी करून पाहिला होता. आता खूप वर्षांनी "सॅटरडे होमवर्क" या उपक्रमा अंतर्गत मी केला.

१. प्रथम दूध आणि तेल मिसळून घ्या. त्यातच मीठ टाका व उकळून घ्या.
२. पिठात ऑपशनल पदार्थ टाका . उकळलेले मिश्रण थोड गरम असतानाच पिठामधे थोड थोड करून मिसळून घ्या व व्यवस्थित मळा.
३. आता या गोळ्यात किसलेले चीज मिसळा. पेस्ट टाइप मिश्रण झाले पाहिजे.
४. ओवन २०० डि. ला १० मिनिटे तापवा.
५. बेकिंग ट्रे वर थोडे तेल लाउन मिश्रणाचे पेढ्यापेक्षा मोठे गोळे ठेवा.
६. प्रीहिटेड ओवन मधे १७० डिग्रीवर २५ ते ३० मिनिटे बेक करा.
७. गोल्डन येलो झाल्यावर ओवन मधून काढा. (लागल्यास अजून ५ मिनिटे बेक करा)
ब्राझिलियन लोक तसेच खातात. पण ते एकदम ब्लँड होतात. आपण चवी साठी मिरी , लाल तिखट (थोडेसे) टाकू शकता. चीजची चव मेजर असली पाहिजे.

याच्या अनेक रेसिपी यू ट्युब वर आहेत. (Cheese bread /Pao de quijo सर्च करा). बेकिंग पावडर असलेल्या, नसलेल्या. अंडी असलेल्या नसलेल्या. तुम्हाला पाहिजे तस करा.
बाहेरून क्रिस्पी व आतून सॉफ्ट असे मस्त गोळे तयार होतात. सर्वांना आवडतील.

माझ्या अजून दोन ब्राझिलियन रेसिप्या लेमन मूस आणि व्हेज केक मायबोलीवर आहेत. हे तिन्ही एखाद्या पार्टीला एकदम बेस्ट. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट.

वाढणी/प्रमाण: 
५ जणांसाठी २५-३० नग.
अधिक टिपा: 

डिसक्लेमर : मी थोडा घट्ट गोळा केल्याने नीट फूलून आले नाहीत, जरा कडक झाले होते. मीठ चवी प्रमाणे घ्या. माझे थोडे अळणी झाले होते. (तज्ञांच्या नेहमीच्या सवयी प्रमाणे मीही टाटा नमकवर बील फाडले). पण टोमॅटो सॉस जिंदाबाद.
तुम्ही रेसिपी सुधारून घ्यालच. यू ट्यूब बघा. (इंग्रजीत पण रेसिपी आहेत). वेगवेगळी पिठे आणि प्रमाण. ४०० ग्रॅम पिठा मधे ५० (अंदाजापेक्षा जरा जास्तच) पेढ्याच्या आकाराचे गोळे झाले. (माझे गोळेही छोटे झाले होते, ते तेवढे थोडे मोठे करा)

माहितीचा स्रोत: 
ब्राझिलमधली आमच्या शेजारची आजी सौ. इदीर. (गेली बिचारी)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान दिसतायेत, मला आवडेल हे खायला.
बेक न करता कसे करावे? ओवन शिवाय करायची दुसरी पध्दत सांगावी.

चीज म्हटल की सगळ कस सिल्कीस्मुथ होवुन जातं खाण्यासाठी. मग त्याच्या सोबत काही नसलं तरी चालतं.
एक सांगा, ह्यांना बेकले की ते किंचीत फ्लपी रहात असतील ना टेक्सचरात.

फोटोतल्या पावांवर जे क्रॅक्स आलेत त्यावर परत वितळलेले चीज लावुन खायला कित्ती भारी वाटेल. ( हर्षातिशय झालेली बाहुली)

चीज म्हटल की सगळ कस सिल्कीस्मुथ होवुन जातं खाण्यासाठी.
एक सांगा, ह्यांना बेकले की ते किंचीत फ्लपी रहात असतील ना टेक्सचरात.>> एकदम करेक्तो. Happy