
१. मस्तपैकी ताजे गिलके ३ ते ४,
२. शेंगदाणे भाजलेले १ लहान वाटी,
३. लसुण ४/५ पाकळ्या,
४. जिरे १/२ लहान चमचा (मिश्रणाच्या डब्यातला)
५. मिरची पुड १ टेबल स्पुन (तिखट आवडत असल्यास २ टेस्पु)
६. हळद १/२ लहान चमचा (मि.ड.) ,
७. मीठे चवीपुरतं,
८. तेल (आवडीनुसार).
तसं बघायला गेलं तर कोकणात काय नी खानदेशात काय गिलकी/दोडकी (घोसाळे/शिराळे) हा जरा बनविण्याच्या बाबतीत सोपा आणी रिच प्रकार असतो. सकाळी लवकर जावुन बाजारातुन आणलेले ताजे ताजे गिलके बनवणे हा एक वेगळाच आनंद असतो.
तर सादर आहे, भरल्या गिलक्यांची (घोसाळे) पाककृती.
गिलके स्वच्छ धुवुन त्याचे दोन्ही टोक साधारण अर्धा इंच कापुन टाकवेत. मग त्याच्या तीन तीन इंचाच्या फोडी करुन प्रत्येक फोडीवर उभी चीर द्यावी.
भाजलेले शेंगदाणे सालं काढुन, त्यात लसुण पाकळ्या, जिरे, मिरची पुड व चवीपुरते मीठ टाकुन मिक्सरवर रवाळ ( सौ. मलई बर्फी) वाटुन घ्यावे.
हे रवाळ वाटलेले मिश्रण गिलक्यांच्या चीर दिलेल्या फोडींमधे हलक्या हाताने व्यवस्थितरित्या दाबुन भरावे.
गॅस पेटवावा (ही अत्यंत महत्वाची स्टेप आहे.) मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवुन ह्या मिश्रण भरलेल्या फोडी नीट रचाव्यात. प्रत्येक फोडीवर साधारण एकास अर्धा टे. स्पु. ह्या प्रमाणात तेल सोडावे.
त्यावर झाकण ठेवुन ४ ते ५ मिनीट शिजु द्यावे. नंतर त्या फोडी पलटवुन पुन्हा ३ ते ४ मिनीट शिजु द्याव्यात.
थोडी शंका आल्यास मधे मधे चेक करत रहावे जेणेकरुन फोडी करपु नयेत.
भरल्या गिलक्यांची कोरडी भाजी तयार आहे. पेशंस असल्यास निगुतीने प्लेटींग करावे, फोटो काढावे.
मग ही भाजी चपाती, भाकरी, खिचडी किंवा वरणभातासोबत तोंडीलावणी म्हणुन खावी.
१. अर्धा चमचा तेल टाकण्याच्या स्टेपमधे फोडींवर जास्तीचे मिश्रण दिसत आहे ते उरलेले मिश्रण वाया जावु नये म्हणुन जबरस्तीने टाकलेय. गिलक्याच्या फोडी मारुन मुटकुनही यापेक्षा जास्त "आ" वासत नव्हत्या.
२. ४/५ मिनीट शिजवण्याच्या स्टेपमधे पाणी सुटल्याने तसेच तेल मिक्स झाल्याने मिश्रण फोडींच्या बाजुला पसरेल, चिंता करु नये ते मिश्रणही इतके चटपटीत लागते की बस्स.
मस्तच दिसते आहे. पण गिलके
मस्तच दिसते आहे. पण गिलके शिजल्यावर गिळगिळीत नाही होत का?
छान चमचमीत रेसिपी. करून बघणार
छान चमचमीत रेसिपी. करून बघणार.
छान.
छान.
(No subject)
आज केली भाजी. छान झाली .

Thanks जेम्स बॉन्ड
सामो, मस्तच.
सामी, मस्तच.
नो टाईम टु डाय! पण भरली
नो टाईम टु डाय! पण भरली घोसाळी करायला बरा वेळ मिळाला तुला!
अन्जु, बरोबर कोकणात,
अन्जु, बरोबर कोकणात,
पारोसं = घोसाळं. आम्ही भजीच करतो मस्त ओवा वगैरे चुरडून.
दोडका = शिराळं हे डाळीत नाहितर चटणीत.
नो टाईम टु डाय! पण भरली
नो टाईम टु डाय! पण भरली घोसाळी करायला बरा वेळ मिळाला तुला!>

हा रिप्लाय पाहून माझ्या टीम मधलीच कुणी आहे का हि असे क्षणभर वाटले.
म्हणजे डिलिव्हरी डेट्स एवढ्या रिव्हाईस करतेय आणि इथे भरली घोसाळी करत बसलीय.
मस्त वाटतायत.. याच पद्धतीने
मस्त वाटतायत.. याच पद्धतीने कारली पण मस्त होतील
म्हणजे डिलिव्हरी डेट्स एवढ्या
म्हणजे डिलिव्हरी डेट्स एवढ्या रिव्हाईस करतेय आणि इथे भरली घोसाळी करत बसलीय



तुमची कम्पनी कोणती असा धागा
तुमची कम्पनी कोणती असा धागा काढायला हवा.. मग टीम प्रोजेक्ट
गिलक्याचे प्रेझेंटेशन झकास.
गिलक्याचे प्रेझेंटेशन झकास. शाही आहे अगदी.
सामीने पण लगेच केले की.
पण गिलके शिजल्यावर गिळगिळीत
पण गिलके शिजल्यावर गिळगिळीत नाही होत का?
नाही होत. त्याला सुटते तेच पाणी वाफ बनुन गिलक्याला शिजायला मदत करते.
शिजवल्यानंतर त्याची कंससटंन्सी (चपाती सारखी) बोटाने तोडणेबल रहाते.
पण गिलके शिजल्यावर गिळगिळीत
पण गिलके शिजल्यावर गिळगिळीत नाही होत का?> आजिबात नाहि होत. पुढच्या वेळी १ किलो ची तरी करायला हवी .
हि केल्या केल्या लगेच संपून गेली. फायनल आऊटपुट चे फोटो काढायलाच मिळाले नाहीत.
छान रेसिपी. पण ओव्याची बी
छान रेसिपी. पण ओव्याची बी लावली तर पानांसाठीचं रोप तयार होतं का?
आभार्स....
म्हणजे डिलिव्हरी डेट्स एवढ्या
म्हणजे डिलिव्हरी डेट्स एवढ्या रिव्हाईस करतेय आणि इथे भरली घोसाळी करत बसलीय.

>>
रेसिपी मात्र छान आहे!
दोडक्याची अशी भाजी चांगली
दोडक्याची अशी भाजी चांगली लागेल ना? इथे घोसाळी मिळत नाहीत. भाजी तर मोहात पाडतेय
दोडक्याची अशी भाजी चांगली
दोडक्याची अशी भाजी चांगली लागेल ना?
करुन पहा नी आम्हालाही कळवा :)).
मी कधी करुन पाहिलेली नाही. यावेळेस तुमच्यानंतर ट्राय करायला हरकत नाही.
माझी आई करते भरली दोडक्याची
माझी आई करते भरली दोडक्याची भाजी, अशी शेंगदाण्याचा कुट घालून...
छान लागते.
मी ही परवा दोडक्याची केली
मी ही परवा दोडक्याची केली घोसावळी मिळाली नाहीत म्हणून असा मसाला भरून. छान खमंग झाली.
वावे>> माझंही असच झालं. फोटो इतकी जबरी दिसतोय की बघून मोह होतोच करायचा.
ओके आता करतेच
ओके आता करतेच
अरे हो एक राहिलेच.
अरे हो एक राहिलेच.
मी अॅडमिनचे आभार मानायचे विसरुनच गेलो.
धन्यवाद अॅडमीन !!!!!!
छान रेसिपी. पण ओव्याची बी
छान रेसिपी. पण ओव्याची बी लावली तर पानांसाठीचं रोप तयार होतं का?
>>>
नाही. नेहमीचा ओवा आणि भाज्यांची पाने दोन्ही वायले.
भरलेली गिलके छान दिसतायेत..
भरलेली गिलके छान दिसतायेत..
भरलेली गिलक्याची रेसिपी सासूबाई नेहमी करायच्या फक्त शेंगदाणे किंवा नारळाची विकतची चटणी वापरायच्या. खूपच चविष्ट लागतात भरलेली गिलके...
आमच्या इथे घोसाळी मीळत नाहीत
आमच्या इथे घोसाळी मीळत नाहीत , या पध्दतीने दोडक्याची भाजी केली छान झाली होती, फोटो काढायला विसरले ,, thanks जेम्स बॉन्ड
मी आज करून पाहिले. मदतनिस
मी आज करून पाहिले. मदतनिस मुलीने चिरताना साली काढून टाकल्यामुळे शेप राहिला नाही, झुणकासदृश प्रकार झाला.
पण चव सुंदर होती. गिलकी ही फक्त भजी करायची गोष्ट आहे असे मानणार्या मेंबरांनी चाखत माखत भाजी खाल्ली.
छान दिसत आहेत भरली गिलकी.
छान दिसत आहेत भरली गिलकी. करून बघाविशी वाटतात.
मस्त, भेन्डी अशी करतो आम्ही.
मस्त, भेन्डी अशी करतो आम्ही. हे पण नक्कीच करुन बघणार
हायला हे बेस्ट आहे
हायला हे बेस्ट आहे घोसावळ्यांची भाजी म्हणजे ! भरीत पण मस्त होते त्याचे !
Pages