अलक

Submitted by nimita on 29 September, 2020 - 03:45

अलक १- पाऊस

संध्याकाळच्या वेळी अचानक अंधारून आलं; ढगांचा गडगडाट आणि त्याच्या जोडीला विजांचा लखलखाट सुरू झाला. त्या दोघीही लगबगीने उठल्या आणि आपापल्या स्वैपाकघरात गेल्या. दोघींनी भांड्यांच्या ढीगातून कढाया काढल्या.... एकीने भजी तळण्यासाठी चुलीवर चढवली आणि दुसरीने..... गळणाऱ्या छपराखाली नेऊन ठेवली....

प्रत्येकीचा पाऊस वेगळा !!

अलक २- खेळ

खेळण्यांच्या त्या महागड्या दुकानातून दोन मोठ्या पिशव्या सांभाळत त्याची आई बाहेर पडली. अजून खेळण्यांसाठी रडणाऱ्या आपल्या मुलाला समजावत राहिली....

समोरच्या भाजीवाल्याला एक लाचार बाप म्हणाला," दादा, एक निमुळत्या आकाराचा कांदा देता का ? कधी नव्हे तो मुलानी वाढदिवसासाठी भोवरा मागितलाय...."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
पण भोवरा इतका पण महाग नसतो.

छान

:'(