म्हैसूरपाक

Submitted by MSL on 27 September, 2020 - 05:11
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१:१ वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी,मिक्स करून, एकतारी पाक करायचं...
२: १- वाटी तूप आणि २- चमचे तेल,गरम करत ठेवावे
३: एकतारी पाक तयार झाला की त्यात बेसन घालून ढवळत राहायचं...गुठळी नको व्हायला...
४: उकळी आली की एक एक पळी तूप घालायचं,ढवळत राहायचं, अशी कृती करत राहायची..
५: ४-५ मिनिटे नंतर बेसन फुलून वर वर येते..खमंग वास सुटतो...त्यावेळी उरलेले तूप त्यावर ओतावे...जाळी पडते...तेव्हाच गॅस बंद करून,तूप लावून ठेवलेल्या डब्यात ओतावे...
६: थोडे गार झाले की कापून घ्यावे...१०- मिंतनी खायला तयार...

एकेक वाटीच्या प्रमाणात केलंय म्हणून ही कृती सोपी वाटतेय का? मी पाहिलेल्या आणि वाचलेल्या रेसिपी त बरेच डुज आणि डु नॉट्स होते.

एकतर हे गंजात शिजवायचं. तुपही बहुधा गरम हवं. आंणि थाळीत ओतून ठेवलं की ती तिरकी करून ठेवायची म्हनजे तूप निथळून जातं असं काय काय.
जाळीदार मैसूर पाक आवडतो, तुम्ही तो स्वतः करता हे ग्रेट आहे.

## ..एक / दोन वाटीच्या प्रमाणात केला की घरात १-२ वेळा मुलांना खायला द्यायला पुरेसा होतो....
तूप गरम पाहिजे...उकळते नको...
तसे प्रमाणात घेतलाय त्यात तूप जास्त निथळात नाही...मी रोजच्या वापरातली कढई , पातेली ,डब्बा असेच घेतलेलं..

हा कर्नाटकी स्टाईल आहे की चेन्नई स्टाईल?
मी काल परवाच तुपामध्ये निथळणारी आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या चेन्नई च्या म्हैसोरपाक ची आठवण काढली होती.
माझ्या मागच्या कंपनीचा मॅनेजर चेन्नई हून पुण्याला येताना श्रीकृष्ण चा म्हैसोर पाक आणायचा..
आहाहा..
त्याची चव मी विसरूच शकत नाही
आठवण काढून त्रास झाला.

म्हैसूर पाक म्हणजे कडक कटकटीत माल, गोळ्या बिस्कीट च्या दुकानात 2 रु ला एक देतात

म्हैसूरपा म्हणजे मऊ बर्फीसारखी वडी

ह्यापैकी एक कायतरी होईलच

४-५ मिनिटे नंतर बेसन फुलून वर वर येते..खमंग वास सुटतो...त्यावेळी उरलेले तूप त्यावर ओतावे...जाळी पडते...तेव्हाच गॅस बंद करून,तूप लावून ठेवलेल्या डब्यात ओतावे... >>>> हा मैसूर झाला ना ?
मैसूरपाक म्हणजे तो लुसलिशीत , बिना जाळीचा .

म्हणजे माझी तरी अशी समजूत होती . मला दोन्ही आवडतात .
मुंबईत , चेंबूरला "श्रीकृष्ण"चं दूकान आहे .
माझी तेलगू कलिग तिथून आणायची मैसूरपाक आमच्यासाठी खास . केवळ अप्रतिम लागतो तो .

मी जेव्हा कंपनी चालवत होते तेव्हा चेन्नाई हैद्राबाद काय म अप डाउन करत असे. चेन्नाई एअर्पोर्ट वर करयच्या तीन गोष्टी. मॅगी स्टॉल वर गरमा गरम मॅगी खाणे, चॉकोलेट्स चे एक दुकान होते म्हणजे हँडमे ड चॉकोलेट्स तिथून घरच्यासाठी चॉकोलेट्स घेणे. व तो मैसुर पा घेणे. मैसुरपा च्या एक सिंगल वडी बसेल अश्या बारक्या डब्या येत. व त्यावर देवाचे रंगीत दाक्षिणात्य चित्र असे. आत एक बटर पेपर वाली वडी. फारच खमंग खुसखुशीत पण हाय कॅलरी प्रकरण. खाउन झाले की डबा साफ पुसून घेउन त्यात ज्वेलरी ठेवली होती. एकदम उपयुक्त. मुंबई शिफ्ट झाल्या पासून आजिबात खाल्लेला नाही. लगता है चेन्नै जानाही पडेगा.

मला, जाळीदार कडक, मैसूर आवडतो, तो सौदिंडियन मैसूरपाक. कधीतरी वरा वाटतो.. फारच मऊ आणि साखर जरा ज्यास्तच असतो पाक प्रकरणात...