नमस्कार मायबोलीकर,
हे वर्ष मायबोली गणेशोत्सवाचे यंदाचे २१ वे वर्ष होते. यावर्षी जगभर कोरोना चे सावट आल्याने सगळीकडे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळेच यावर्षी गणेशोत्सव उपक्रमांत आणि स्पर्धेत आबाल वृद्धांपासून सर्व जण भाग घेऊ शकतील अश्या काही सोप्प्या परंतु सर्वांना त्यांच्या विविध कला दाखवायची संधी मिळेल अश्या स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्याचे आम्ही ठरवले.
नेहमीच्या यशस्वी नि सर्वांच्या आवडत्या पाककला स्पर्धा तर होत्याच. मायबोलीवर लेखक बऱ्याच संख्येने आहेत तेंव्हा लेखन स्पर्धेत कोरोनामुळे घरात अडकून पडलेल्यांचा अनुभव शब्दबद्ध करण्याची स्पर्धा साहजिकच होती. पण मायबोलीवर विविध कला निपुण असलेले बरेच सभासद आहेत. गेल्या काही वर्षात गणेशोत्सवात फक्त लेखन स्पर्धांवर भर असल्याचे लक्षात आल्याने यावर्षी स्त्री पुरुष आणि लहान मुलं असे सगळे भाग घेऊ शकतील अश्या चित्रकला, हस्तकला स्पर्धांवर भर द्यायचे ठरवले. कोरोनामुळे गरजेची वस्तू झालेल्या मास्क बनवण्याची
समयोचित स्पर्धा होती. लोकांना बालपणीचा, शालेय काळ परत जगत यावा म्हणून हस्ताक्षर स्पर्धा, नाव गाव फळ फुल उपक्रम होते. नेहमीप्रमाणे झब्बू होते, क्विझ होत्या, मुलांना पर्यावरण जोपासण्याची आवड लागावी म्हणून यंदा रोपसंवर्धन उपक्रम ठेवला. एकंदरीत सगळे भाग घेऊ शकतील असा यावर्षीचा कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
सर्वच स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. वाचनमात्र असलेले मायबोलीकर सुद्धा सहभागी झाले. अर्थातच सर्वात जास्त प्रतिसाद हस्ताक्षर स्पर्धेला आणि नाव गाव फळ फुल उपक्रमाला मिळाला. कौतुकाची गोष्ट म्हणजे पाक-कृती नि बुकमार्क स्पर्धेत स्त्रिया मुलांसोबत पुरुषांनीही भाग घेतला. रोपसंवर्धन उपक्रमाला मात्र अत्यल्प प्रतिसाद आला. पण एकूण गणेशोत्सवात सर्वांना सहभागी करून घेण्याचा संयोजन मंडळाचा हेतू साध्य झाला असे आम्ही म्हणू शकतो. या सगळ्या प्रवासात बहुतांश मायबोलीकरांनी जो विश्वास दाखवला, पाठिंबा दिला त्यांचे खूप आभार!
संयोजन मंडळा व्यतिरिक्त मायबोलीकर अजय चव्हाण यांनी स्पर्धेसाठी सुंदर दवंडी लिहून दिली तसेच मायबोलीकर रिषिकेश यांनी डूडल करून दिले. त्यांचे ही मंडळ आभारी आहे. संयोजनात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली.कॉम संयोजन समिती तसेच ज्या समस्त मायबोली वाचकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा वार्षिक उत्सव निर्विघ्नपणे पार पडला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
-आपले संयोजक मंडळ
असामी, jui.k, किशोर मुंढे, प्रगल्भ, अभ्या....
छानच झाला गणेशोत्सव . खूप मजा
छानच झाला गणेशोत्सव . खूप मजा आली . मन रमलं जरा .
संयोजकांचे त्यासाठी खूप कौतुक आणि आभार.
ह्या वेळी विजेत्यांना दरवर्षी मिळत तस प्रशस्तीपत्रक नाही मिळणारे का ?
ह्या वेळी विजेत्यांना दरवर्षी
ह्या वेळी विजेत्यांना दरवर्षी मिळत तस प्रशस्तीपत्रक नाही मिळणारे का ?
>>>
हेच विचारायला आलेलो. मुलीचे आहेत म्हणून जास्त उत्सुकता आहे. छान बनवा
मायबोलीवर इतके विविध प्रकारचे
मायबोलीवर इतके विविध प्रकारचे लोक आहेत की सगळ्यांनाच सगळे आवडेल असे नाही.... बहुसंख्यांना आवडले की आपले प्रयत्न सार्थकी लागले असे म्हणायचे
>>>>>>
+७८६
लेखनस्पर्धेत कोरोनासोबत आणखी काहीतरी मजेशीर हवे होते असे मलाही वाटलेले. पण चलता है. जेव्हा आपल्या आवडीचे मिळत नाही तेव्हा आपली आवडच सर्वप्रथम त्याला जबाबदार असते
मायबोलीवर इतके विविध प्रकारचे
मायबोलीवर इतके विविध प्रकारचे लोक आहेत की सगळ्यांनाच सगळे आवडेल असे नाही.... बहुसंख्यांना आवडले की आपले प्रयत्न सार्थकी लागले असे म्हणायचे
>>>>>>
+७८६
लेखनस्पर्धेत कोरोनासोबत आणखी काहीतरी मजेशीर हवे होते असे मलाही वाटलेले. पण चलता है. जेव्हा आपल्या आवडीचे मिळत नाही तेव्हा आपली आवडच सर्वप्रथम त्याला जबाबदार असते
Pages