मायबोली गणेशोत्सव २०२० समारोप

Submitted by संयोजक on 27 September, 2020 - 04:04

नमस्कार मायबोलीकर,

हे वर्ष मायबोली गणेशोत्सवाचे यंदाचे २१ वे वर्ष होते. यावर्षी जगभर कोरोना चे सावट आल्याने सगळीकडे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळेच यावर्षी गणेशोत्सव उपक्रमांत आणि स्पर्धेत आबाल वृद्धांपासून सर्व जण भाग घेऊ शकतील अश्या काही सोप्प्या परंतु सर्वांना त्यांच्या विविध कला दाखवायची संधी मिळेल अश्या स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्याचे आम्ही ठरवले.

नेहमीच्या यशस्वी नि सर्वांच्या आवडत्या पाककला स्पर्धा तर होत्याच.   मायबोलीवर लेखक बऱ्याच संख्येने आहेत  तेंव्हा लेखन स्पर्धेत कोरोनामुळे घरात अडकून पडलेल्यांचा अनुभव शब्दबद्ध   करण्याची स्पर्धा साहजिकच होती. पण मायबोलीवर विविध कला निपुण  असलेले बरेच सभासद आहेत.  गेल्या काही वर्षात गणेशोत्सवात फक्त लेखन स्पर्धांवर भर असल्याचे लक्षात आल्याने यावर्षी स्त्री पुरुष आणि लहान मुलं असे सगळे भाग घेऊ शकतील अश्या चित्रकला, हस्तकला स्पर्धांवर भर  द्यायचे ठरवले.  कोरोनामुळे गरजेची वस्तू झालेल्या मास्क बनवण्याची
 समयोचित स्पर्धा होती.  लोकांना बालपणीचा, शालेय काळ परत जगत यावा म्हणून हस्ताक्षर स्पर्धा, नाव गाव फळ फुल उपक्रम होते. नेहमीप्रमाणे झब्बू होते, क्विझ होत्या, मुलांना पर्यावरण जोपासण्याची आवड लागावी म्हणून यंदा रोपसंवर्धन उपक्रम ठेवला. एकंदरीत सगळे भाग घेऊ शकतील असा यावर्षीचा कार्यक्रम  ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
           सर्वच स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. वाचनमात्र असलेले मायबोलीकर सुद्धा सहभागी झाले.  अर्थातच सर्वात जास्त प्रतिसाद हस्ताक्षर स्पर्धेला आणि नाव गाव फळ फुल उपक्रमाला मिळाला.  कौतुकाची गोष्ट म्हणजे पाक-कृती नि   बुकमार्क स्पर्धेत स्त्रिया मुलांसोबत पुरुषांनीही भाग घेतला. रोपसंवर्धन उपक्रमाला मात्र अत्यल्प प्रतिसाद आला. पण एकूण गणेशोत्सवात सर्वांना सहभागी करून घेण्याचा संयोजन मंडळाचा हेतू साध्य झाला असे आम्ही म्हणू शकतो. या सगळ्या प्रवासात  बहुतांश मायबोलीकरांनी जो विश्वास दाखवला, पाठिंबा दिला त्यांचे खूप आभार!
            

संयोजन मंडळा व्यतिरिक्त मायबोलीकर अजय चव्हाण यांनी स्पर्धेसाठी सुंदर दवंडी लिहून दिली तसेच मायबोलीकर रिषिकेश यांनी डूडल करून दिले. त्यांचे ही मंडळ आभारी आहे. संयोजनात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली.कॉम संयोजन समिती तसेच ज्या समस्त मायबोली वाचकांच्या  उत्स्फूर्त  सहभागामुळे हा वार्षिक उत्सव निर्विघ्नपणे पार पडला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

        गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
-आपले संयोजक मंडळ
असामी, jui.k, किशोर मुंढे, प्रगल्भ, अभ्या....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाला गणेशोत्सव! प्रत्यक्ष आयुष्यात सध्याच्या परिस्थितीमुळे फारशा आनंददायक आणि उत्साहवर्धक घटना घडत नसताना मायबोलीवरच्या गणेशोत्सवामुळे वेळ सकारात्मक पद्धतीने, चांगला व्यतीत झाला.
संयोजक मंडळाचं हार्दिक अभिनंदन!! गणपतीबाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या! Happy

छान झाला गणेशोत्सव! प्रत्यक्ष आयुष्यात सध्याच्या परिस्थितीमुळे फारशा आनंददायक आणि उत्साहवर्धक घटना घडत नसताना मायबोलीवरच्या गणेशोत्सवामुळे वेळ सकारात्मक पद्धतीने, चांगला व्यतीत झाला.> +१
संयोजक मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

संयोजक मंडळाचे अभिनंदन. सर्व उपक्रम छान होते.स्वतःचे व्याप सांभाळून हे सर्व केलेल्या तुम्हा सर्व टीम चे आभार आणि कौतुक.
टू बी फेअर, रोप संवर्धन च्या गाईडलाईन्स फार स्पष्ट नव्हत्या.ऑक्टोबरमध्येच थेट धागा टाकायचा आहे असा माझा तरी समज झाला होता.
स्पष्ट शब्दात 'आता 21 ऑगस्ट पासून रोप संवर्धन चे धागे काढा आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येक रोपांची वाढ पाहून समारोप' अश्या सूचना देता आल्या असत्या.मी बऱ्याच ठिकाणी यात धागे नक्की कधी टाकायचे आहेत असे विचारले पण उत्तर मिळाले नाही(धाग्यात आम्ही नीट सांगीतलंय तरी परत परत काय विचारतात' असं वाटून दिले नसावे.)
सगळे काही ता वरून ताकभात ओळखणारे सुज्ञ नसतात.असो, तसाही उपक्रम आहे.आता तो धागा वर काढून आवाहन केले तर लोक पटापट धागे टाकतील.

@ संयोजक मंडळ
अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद !!!
मजा आली Happy

छान झाला गणेशोत्सव! प्रत्यक्ष आयुष्यात सध्याच्या परिस्थितीमुळे फारशा आनंददायक आणि उत्साहवर्धक घटना घडत नसताना मायबोलीवरच्या गणेशोत्सवामुळे वेळ सकारात्मक पद्धतीने, चांगला व्यतीत झाला.> +१
संयोजक मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

मी आधी दुसर्‍या धाग्यावर म्हटलं तसं मला स्पर्धा थोड्या बाळबोध वाटल्या, पण मजा आली. जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा हा उद्देश असेल तर बर्‍यापैकी साध्य झाला.

"कौतुकाची गोष्ट म्हणजे पाक-कृती नि बुकमार्क स्पर्धेत स्त्रिया मुलांसोबत पुरुषांनीही भाग घेतला." हे वाक्य आणि पाककृती स्पर्धांच्या घोषणांतील "स्पर्धा महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी खुली आहे' हे वाक्य एका प्रकारे सेक्सिस्ट वाटली.

या आधीच्या गणेशोत्सवांत पाककृतीसकट कोणत्याही स्पर्धेसाठी ही स्पर्धा स्त्री पुरुष दोघांसाठी आहे, असं सांगितलं गेल्याचं आठवत नाही.

या वाक्यामुळे आठवलं की एके वर्षी एका पाककृती स्पर्धेत पहिले तीनही क्रमांक पुरुषांना मिळाले होते. (यात काही विशेष आहे असं मला तेव्हाही वाटलं नव्हतं आणि आताही वाटत नाही )

असो.

भरगच्च गणेशोत्सवाबद्दल संयोजकांचे आभार आणि अभिनंदन आणि मायबोलीकरांच्या न संपणार्‍या प्रश्न आणि शंकांची दखल घेत उत्तरे दिल्याबद्दल विशेष कौतुक.

संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि खूप छान स्पर्धा आणि उपक्रम राबविल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद !

झब्बू- तुझी माझी जोडी जमली रे उपक्रमही छान होता.
आणि रोजच्या रंगांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला..

असामी, jui.k, किशोर मुंढे, प्रगल्भ, अभ्या....
>>>छान संयोजन केलेत... मजा आली...
तुम्हाला शाबासकी...

आले का समारोपाचे भाषण...विसरले होते वाटते संयोजक. मतदानाचे निकाल लागून आठवडा होऊन गेला तरी समारोप नाही मला वाटले अजून प्रवेशिका मतदानात सामाविष्ट करण्याचे कामच चालू आहे की काय. Wink

एकंदर स्पर्धा आणि ऊपक्रमांचे एक्झिक्युशन प्रामाणिक आणि सफाईदार वाटले. वाचकांना गुंतवून ठेवण्यात संयोजक बर्‍यापैकी यशस्वी झाले, त्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन. ह्या अवघड काळात एक चांगला कार्यक्रम दिल्याबद्दल संयोजकांना अनेक धन्यवाद.
भरत ह्यांच्या मुद्द्याशीही सहमत आहे....स्पर्धा आणि ऊपक्रम बाळबोध आणि कल्पकतेचा अभाव असलेला वाटले. कोविड बद्दल ऑलरेडी एवढे भरमसाठ सगळीकडे लिहिले गेले असतांना पुन्हा त्यावरच लिहायचे प्रयोजन कळाले नाही. हस्तलेखन स्पर्धेला आलेला प्रतिसाद ईतर स्पर्धा फारशा ईंट्रेस्टिंग न वाटल्याने आला असे वाटले. लहान टीम असल्याने असे झाले असावे. चालायचेच...
एक चांगला ऊत्सव दिल्याबद्दल सर्वांचेच (संयोजकांचे आणि सर्व सहभागींचे आभार)
ऊत्सवाचे लॅंडिंग पेज नेहमीप्रमाणेच ह्यावेळी अप्रतिम होते त्याचा विशेष ऊल्लेख करतो.
वेमा/अ‍ॅडमिन मागच्या वेळीपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव दिसले ....जस्ट एक निरिक्षण. Happy

@हायझेनबर्ग
मी मायबोली admin ना नक्की विनंती करेन की पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सव संयोजन मंडळात तुम्हाला घ्यावे. मला खात्री आहे की तुमच्या अमूल्य व नावीन्यपूर्ण कल्पनेच्या योगदानामुळे मायबोलीकरांचे उदंड प्रतिसाद मिळून त्या वर्षीचा उत्सव गेल्या १०-१२ वर्षातील संस्मरणीय उत्सव होईल. Happy
धन्यवाद..

असामी, jui.k, किशोर मुंढे, प्रगल्भ, अभ्या....
>>>छान संयोजन केलेत... मजा आली...
तुम्हाला शाबासकी...

खूप आभार. तुमचा संयोजनाचा(बहुतेकांचा) आणि माझा सहभागी असण्याचा हा पहिला गणेशोत्सव होता तो तुम्ही खरंच खास केला . तुम्हाला खरंच भरपूर कामं लागली असतील याची पूर्ण जाणीव आहे. कौतुक आणि
मनःपूर्वक आभार.

जुई,
तुमचा माझ्या प्रतिसादावर वैयक्तिकरित्या दाखवलेला सार्कॅझम अनवॉरंटेड आणि मिसप्लेस्ड आहे.... तुम्ही (म्हणजे सगळ्यांनी मिळून, तुम्ही वैयक्तिकरित्या नव्हे) संयोजक म्हणून जे काम केले... ते मला कसे वाटले, माझा अनुभव काय होता ते सांगण्याचा मला अधिकार आहे.
तुम्ही दिलेला प्रतिसाद संयोजक आयडीने लिहिता येतो का ते पहा, म्हणजे मला पुढचे लिहिता येईल. ह्या विषयावरून संयोजक मंडळातल्या ईंडिविड्युअल आयडीशी वाद घालायची ईच्छा नाही.... धन्यवाद.

धन्यवाद संयोजक ! (असामी, jui.k, किशोर मुंढे, प्रगल्भ, अभ्या..._)
यावेळचा गणेशोत्सव एकदम मस्त झाला. तुमची टीम इतकी छोटी असूनही सगळे उपक्रम मस्त पार पडले आणि प्रतिसादही छान मिळाला.
मायबोली तुमची ॠणी आहे.

धन्यवाद संयोजक. छान झाला उत्सव.
२०२० वर्षातील रोपे किंवा गणेशोत्सवातील रोपे तसाच काही एक धागा काढा जाता जाता. (असा धागा असल्यास लिंक इथे द्या प्लीज). उत्सव संपला तरी रोपं वाढत रहातील. न जाणो पुढच्या वर्षी कुणाच्या रोपाला फुलेही येतील... आम्ही रोप नाही लावलं तरी इतरांचे झाड, त्याची फुले इ. बघायला आवडेल.

टीमचे अभिनंदन!

कोविड बद्दल लिहीण्याची स्पर्धा मला पण नकोशी वाटली. आधीच नको नको झाले असतांना त्या आठवणी का आठवत बसायच्या! काही काळाने जेव्हा कोरोना जाईल, तेव्हा हे दिवस आठवायला काही वाटणार नाही. असो.

हस्ताक्षर स्पर्धा जोरात झाली. अनेकांची सुंदर अक्षरे पाहून हेवा वाटला. Happy
सर्वांनी भाग घेतला हे छान झाले.
तुमच्या श्रम नक्कीच अनमोल आहे.

>> असामी, jui.k, किशोर मुंढे, प्रगल्भ, अभ्या....

अरे वा किशोर भाई संयोजनात आहेत हे माहित नव्हते. सर्वानीच खूप छान संयोजन केले. मुख्य म्हणजे "लिहिते" केलेत माझ्यासारख्या अनेकांना. पेनाने (हस्ताक्षर) आणि कीबोर्डने (कोव्हीड अनुभवलेखन) Happy त्याबद्दल खरेच मनापासून आभारी आहे.

अशा उपक्रमांमुळे लिहायला होते. नाहीतर हे दोन्ही प्रकारचे लिहिणे झाले नसते. संयोजन करणे हे खूप क्लिष्ट काम असते याचा अनुभव आणि म्हणून विनम्र जाणीव आहे. त्यामुळे सर्वांचे कौतुक आणि हे यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन सुद्धा.

पुन्हा एकदा मायबोली आणि संयोजकांचे आभार _/\_

संयोजकांचे अभिनंदन!!
संयोजन करण्याला उत्साह आणि जबाबदारी यांचा योग्य समतोल लागतो तो तुमच्या संयोजनातुन दिसला.
खुप चांगला झाला या वर्षीचा गणेश उत्सव!

लोकांना काय आवडू शकते किंवा कशाला भरपूर प्रतिसाद मिळेल याचा तुम्हाला योग्य अंदाज असावा असे वाटले.

मायबोलीवर इतके विविध प्रकारचे लोक आहेत की सगळ्यांनाच सगळे आवडेल असे नाही.... बहुसंख्यांना आवडले की आपले प्रयत्न सार्थकी लागले असे म्हणायचे.
आणि लोकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला या वर्षीच्या उत्सवाला त्याअर्थी तुम्ही नक्कीच चांगले संयोजन केले आहे.

मला या सगळ्या स्पर्धान्मध्ये, उपक्रमांमध्ये ठरवून केलेली "बॅक टू बेसिक्स" अशी थीम आढळली.... म्हणजे सोपेपणामध्ये सातत्य होते आणि कदाचित तोच सोपेपणा लोकांना आवडला

या वर्षीच्या उत्सवामध्ये मी वाचनमात्र होतो.... नाही म्हणायला झब्बू खेळलो थोडा.... तिथेही सुरुवातीला हे काय नुसतेच रंगाचे कॉंबो असे वाटले पण नंतर विचार करता ते पण तुमच्या थीमला अनुसरुनच वाटले आणि आजवर झब्बूमध्ये इतके विषय हाताळून झाले आहेत त्यामुळे नवीन काही विषय निवडणे आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळणे जरा अवघडच!

यावर्षी काव्यसंदर्भात एकही उपक्रम नव्हता हेही जाणवले पण चलता है!

परत एकदा एक सुंदर आणि लोकांना आवडेल असा गणेशोत्सव आयोजित केल्याबद्दल सर्व संयोजकांचे मनापासून अभिनंदन!!

स्पर्धा सोप्या असल्याने जास्त बरे वाटले.फार डोकं न चालवता भाग घेता येतो.
सर्वच उपक्रम आवडले.
रोपटे उपक्रम वर्षभर चालू ठेवायची वरच्या प्रतिसादातली सूचना पण छाने.कपल चॅलेंज साडी चॅलेंज असतो तसा मायबोली चा रोपटे संवर्धन चॅलेंज.

संयोजक मंड ळाचे हार्दिक अभिनंदन. उपक्रम छान होते व सर्व च कला प्रकार व रेसीपी बघायला एकदम छान . नैवेद्याची ताटे तर काय सुरेख होती. मी जमेल तेवढे उघडून बघितले. तुमच्या मेहनतीचे कौतूक. आता लगे हात उत्साहाने दिवाळी अंक पण बांधायला घ्या. नवे लेखक लेखिका कवयित्री कवी खुपच आहेत सध्या. त्यांना प्रोत्साहन मिळेल.

मोरया.

असामी, jui.k, किशोर मुंढे, प्रगल्भ, अभ्या....संयोजक मंडळाचं हार्दिक अभिनंदन!!
छान झाला गणेशोत्सव!

स्पर्धा सोप्या असल्याने जास्त बरे वाटले.फार डोकं न चालवता भाग घेता येतो. > + १.
समहाऊ यंदाच्या काळात जास्त डोकं चालवणं जमलं नसतं मला तरी. कुठेतरी करोना, लॉकडाऊनचं दडपण होतं मनात. रोजंदारी अजून ठीक झाली नाही. अशा वेळेस हलके फुलके उपक्रम चांगले वाटले, दडपण कमी झालं.

पण पूर्ण सहभागी होण्याची माझी ही पहिलीच वेळ. यापूर्वी एवढा सक्रीय सहभाग नव्हता त्यामुळे पूर्वीच्या गणेशोत्सवांशी तुलना मी करू शकत नाही. जे अनेक वर्षांपासून सक्रीय सहभाग घेतात त्यांच्या मतांचा आदर आहे.

Pages