भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?

Submitted by ताजे प्रेत on 24 September, 2020 - 13:46

हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे
या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?

मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते.

तर यांचे 4जी हे hyper efficient network आहे, म्हणजे फोन चार्ज करायला खरे तर जवळपास एक तृतीयांश ( खरे तर 31.7595 %) वीज लागते. आता कोणाचे वीज बिल यांचे नेटवर्क वापरत असल्याने कमी झाले आहे का ? नाही कारण ही वीज टॉवर कडे microwave form मध्ये परत पाठवली जाते आणि तिचे परत wave particle theory, uncertainty principle, Einsteins Nobel winning equation E=MCsq वापरून परत विजेमध्ये रूपांतर केले जाते. 

आणि एक मोठी वीज कंपनी यांच्या बंधू चीच होती तिला हे देतात ,आता तुमच्याच भागातले त्यांचे मित्र चालवतात - ते एकच आहेत हे सर्वांना माहीत आहे.. 

म्हणजे तुम्ही अधिक डेटा वापरा याना तुमचीच वीज मिळेल आणि ते तुम्हालाच ती विकत देतील!
हे विलक्षण धक्कादायक आहे .

Group content visibility: 
Use group defaults

>> Wireless Transmission of Electric Energy is possible.
>> Submitted by मानव पृथ्वीकर on 24 September, 2020 - 23:47

हो पण त्यासाठी क्वांटम फिजिक्स वापरलेले नाही कुणी आजवर ते ह्या कंपनीने वापरले आहे असे धाग्यात लिहिलेय Happy

त्यांनी एकदम वस्तुमानातून उर्जेचे समीकरण घेतले आहे, सोडा ते.

मी फक्त मायक्रोव्हेवद्वारे विद्युतऊर्जा वहन याच्या माहिती करता तो दुवा दिला. त्यासाठी तेवढ्या शक्तीची विद्युतऊर्जा मायक्रोवेव्ह मध्ये परिवर्तीत करावी लागेल आधी.

हे ताजे प्रेत कुठल्यातरी टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातले दिसतंय..डिप्रेशन मधून बाहेर आल्यावर लगेच टेलिकॉम. मरायच्या आधी बहुतेक VI मध्ये असावा.

डोके आपटत असतो प्रत्येक जण कधी ना कधी. पण यातून वीज निर्मिती करता येईल काय असे विचारत असावेत @विक्षिप्त_मुलगा

डोके आपटत असतो प्रत्येक जण कधी ना कधी. पण यातून वीज निर्मिती करता येईल काय असे विचारत असावेत @विक्षिप्त_मुलगा
Submitted by Srd on 26 September, 2020 - 05:04

नाही ओ, मी कशाला डोके आपटून वीज निर्मिती करायचा विचार करु??? हा लेख वाचल्यानंतरचा तो माझाच video आहे, घरातल्यांनी shoot केलेला!!!

बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्हींची विलिनीकरण झाल्याने त्यांच्या एकूण मालमत्ता (मोक्याच्या ठिकाणी असणार्‍या मोठमोठ्या जमिनी व त्यावरील इमारती) त्यांचे गावोगाव पसरलेले टॉवर्स, एकूण मोबाईल्स व लँडलाईन्स चे जाळे, ऑप्टिक फायबर व इतर केबल्स या सगळ्यांचे मूल्य पाहता भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल च असावी.

टेलीकॉम तन्त्रज्ञानाचे श्राद्ध घातलेत हा लेख लिहुन...

एक पदव्युत्तर टेलीकॉम (दुरसन्चार) अभियन्ता

Pages