देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!
‘हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य’ , ‘भारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर’ अशा मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बहुतेकांनी नुकत्याच वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील.
चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते सोनिया गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका आणि उद्योगपतींचाही समावेश आहे. एवढेच नाही तर यात सेलिब्रेटी आणि अगदी मीडियाशी संबंधित लोकांची आणि अनेक गुन्हेगार, आरोपींची नावेही यादीत आहेत. 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वेबसाइटच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
"दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’ चा वापर करण्यात आला. या माहितीसाठय़ाला कंपनीने ‘ओव्हरसीज की इन्फॉर्मेशन डाटाबेस’ (ओकेआयडीबी) असे शीर्षक दिले आहे. या माहितीसाठय़ात शेकडो नोंदी आहेत. त्यातून भारताबद्दलची माहिती शोधण्यात आली. ही माहिती अस्पष्ट नोंदींमध्ये चिन्हांकित केलेली नसल्याचे आढळले. अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशांविषयीच्या माहितीचा साठाही कंपनीने केला आहे. कंपनीने ही माहिती कंपनीशी संबंधित असलेल्या संशोधकांच्या जाळ्यामार्फत जमविली आहे.
ही माहिती शेन्झेनमध्ये अध्यापन केलेल्या व्हिएतनाममधील प्राध्यापक ख्रिस्तोफर बाल्डिंग यांच्यामार्फत सूत्रांनी काही वृत्तसंस्थांना दिली. त्यात दि इंडियन एक्स्प्रेस, द ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ या वृत्तपत्रांचा समावेश आहे."
वरील माहिती ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ समूहाच्याच ‘लोकसत्ता’ ह्या मराठी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत देण्यात आली आहे.
घटनात्मक पदांवरील मंडळी, उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय पुढारी / नेते, न्यायाधीश, उद्योगपती, गुन्हेगार अशा लोकांची माहिती जमवून त्याचा उपयोग देशाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या गुप्तचर संघटना / संस्थांकडून होणे हि काही नवीन गोष्ट नाही. त्यातल्या अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून / फितवून अथवा वेळप्रसंगी अपहरण करून त्यांच्याकडून मिळवलेल्या गोपनीय माहितीचा सरकारकडून संबंधित देशाविषयीचे आर्थिक, व्यापार, युद्ध, परराष्ट्र धोरण ठरवण्याच्या कामी उपयोग केला जातो हे सर्वश्रुत आहे. आय. एस. आय. ह्या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने दाऊद सारख्या गुन्हेगाराला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याकरवी मुंबईत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांचेही आपण साक्षीदार आहोत.
चीनच्या ‘झेनुआ’ कंपनीकडून ज्यांच्यावर नजर ठेवली गेली त्यात आपल्या सारख्या सर्वसामान्य भारतीयांची नावे नसली तरी आपण सुरक्षित आहोत का?
आपण काय बोलतोय ते कोणी आपल्या नकळत ऐकतंय का?
आपण समाज माध्यमांवर (Social Media) वर काय आणि कसे व्यक्त होतोय ते अशा हेरगिरी करणाऱ्या कंपन्या / संस्थांपर्यंत पोहोचतय का?
वरील पैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. ज्याला आपण मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून ओळखतो त्या AI (Artificial intelligence) च्या सध्याच्या जमान्यात अशा हेरगिरी पासून आपण सर्वसामान्य भारतीयही सुरक्षित नाही.
आणि पुढच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे होय अशी आहेत. आपले बोलणेही आपल्या नकळत महा-संगणक ऐकत असेल आणि आपण समाज माध्यमांवर (Social Media) वर काय आणि कसे व्यक्त होतोय तेही अशा हेरगिरी करणाऱ्या कंपन्या / संस्थांपर्यंत पोहोचत आहे.
AI (Artificial intelligence) चा आवाका आता फक्त स्मार्ट फोन्सच्या माध्यमातून आपल्या आवडी-निवडी, पसंती विषयीची माहिती मिळवून त्या अनुषंगाने आपल्याला जाहिराती दाखवण्या पुरता मर्यादित राहिला नसून तो आपल्या कल्पनेपलीकडे प्रचंड वाढला आहे.
मागील पाच-सहा महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढलेला आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये जो संघर्ष झाला होता त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर चीन आणि भारत या दोन्ही देशांचे परस्पर संबंध तणावाचे झाले असून ती परिस्थिती अजूनही कायम आहे. कालच अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केली असल्याची बातमी आली आहे.
अशा परिस्थितीत भारत आणी चीनमध्ये युद्ध होईल की नाही होणार ते येणारा काळच ठरवेल परंतु अशा तणावग्रस्त काळात जवाबदार देशवासी म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत.
सध्या सामाज माध्यमांवर युध्द विषयक चर्चा चालू आहेत. त्यावर व्यक्त होताना अनेक जण “युद्ध झाले तर भारताला ते परवडणारे नाही.” , “भारताने सामंजस्याची भूमिका घेऊन युद्ध टाळायला हवे." , “लष्करी ताकदीत चिन आपल्यापेक्षा वरचढ असून युद्ध झाल्यास आपला पराभव अटळ आहे” अशा अर्थाची मते मांडताना दिसत आहेत.
भारत, चीन, युद्ध, गलवान, लडाख हे आणि अशा विषयांशी सबंधित शब्द असलेले लेखन, तसे लेखन करणारे, त्या लेखनावर दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रिया देणारे, दृकश्राव्य माध्यमांवरील चर्चा सत्रे, मुलाखती अशा सर्व डेटाचे अत्यंत कमी वेळात विश्लेषण करून अचूक अथवा अचूकतेच्या जवळ पोचणारा अहवाल तयार करून देण्याचे सामर्थ्य AI (Artificial intelligence) मध्ये आहे आणि चीन सह जगातील अनेक देश त्याचा यशस्वीपणे वापरही करत आहेत.
देशातील जनमताचा कौल जाणून घ्यायला सर्वच माध्यमांवर व्यक्त होणारी मते फार मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्यासाठी खूपच घातक ठरू शकतात. समजा भारत सरकार अथवा आपल्या संरक्षण दलांकडून जनमत युद्धासाठी अनुकूल आहे कि नाही ह्याचा अंदाज घ्यायला अशा मिळवलेल्या माहितीवर आधारित अहवालाचा वापर केला जात असेल तर अशा अप्रस्तुत चर्चा/प्रतिक्रियांमुळे अल्प प्रमाणात का होईना पण त्रुटी येऊन हाती येणाऱ्या अहवालाच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकतो. पर्यायाने सरकारला / संरक्षण दलांना योग्य तो निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांचे मनोधैर्यही खच्ची होण्याचा धोका उद्भवतो.
दुसऱ्या बाजूला शत्रू राष्ट्राकडून जर अशा मिळवलेल्या माहितीवर आधारित अहवालाचा वापर केला जात असेल तर परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल असल्याची धारणा होऊन त्यांचे मनोधैर्य वाढल्याने त्यांच्याकडून दबाव वाढवण्याची /आणखीन नवीन कुरापती काढण्याची वा युध्द पुकारण्याची शक्यता वाढते.
प्रत्येक भारतीय मग तो कुठल्याही जाती धर्माचा / भाषेचा असो, कुठल्याही राजकीय पक्षाचा / नेत्याचा समर्थक वा विरोधक असो परंतु अशा कठीण प्रसंगी त्याने कुठल्याही माध्यमावर व्यक्त होताना देश-हिताचे भान ठेवावे आणि भावनांच्या भरात वाहवत न जाता जरा जपून व्यक्त व्हावे.
प्रसंग बाका आहे खरा, पण तो टळला पाहिजे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
प्रत्येक भारतीय मग तो
प्रत्येक भारतीय मग तो कुठल्याही जाती धर्माचा / भाषेचा असो, कुठल्याही राजकीय पक्षाचा / नेत्याचा समर्थक वा विरोधक असो परंतु अशा कठीण प्रसंगी त्याने कुठल्याही माध्यमावर व्यक्त होताना देश-हिताचे भान ठेवावे आणि भावनांच्या भरात वाहवत न जाता जरा जपून व्यक्त व्हावे. >>> सहमत.
@ संजय भावे, किती दिवसांनी
@ संजय भावे, किती दिवसांनी लेखन केलेत. मला तर तुम्ही ईजिप्त-पिरॅमिड सफरीसाठी अगदी कयमचे स्मरणात रहाल...
तुमचा लेख पटला... समाज
तुमचा लेख पटला... समाज माध्यमावर राजकीय किंवा एखाद्या संवेदनशील विषयावर आपलं मत व्यक्त करताना प्रत्येक व्यक्तीने थोडे भान ठेवायला पाहीजे हे मात्र १००% खरं...
छान लेखन..खरं आहे...
छान लेखन..खरं आहे...
ईजिप्त-पिरॅमिड सफरीचे वर्णनलेख पण आहेत काय.
नक्की वाचेन.
अभ्यासपुर्ण लेख आहे. छान
अभ्यासपुर्ण लेख आहे. छान माहीती दिलीत, सर्वसामान्य नागरीक इतक्या खोलवर जाउन विचार न करता मते मांडतात. या लेखामुळे सुरक्षितचा विचार करायला नक्कीच भाग पाडले आहे.
लोक सरकारला कर देतात
लोक सरकारला कर देतात
सरकारने रक्षण करावे
राफेल, जीडीपी , कोविड यावर फेसबुक, ट्विटरवर विचारू नका, हा छुपा उद्देश वाटत आहे.
तसेही ह्यांचे स्वतःचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते म्हणे
हे आम्हाला आत्मनिब्बर व्हायला सांगतात
वरून शत्रूने बॉम्ब टाकल्यास भाजपा जबाबदार नाही , म्हणून डोक्यावर उलटा तवा घेऊन फिरावे , उद्या असेही सांगतील
अभ्यासपुर्ण लेख आहे. विचार
अभ्यासपुर्ण लेख आहे. विचार करायला लावणारा
इंटरेस्टिंग. माझा समज होता कि
इंटरेस्टिंग. माझा समज होता कि सरकार जनमत त्यांच्या बाजुने वळवायला युद्धं पुकारतात. इथे जनमताच्या आधारे सरकार (किंवा शत्रुराष्ट्र) युद्ध पुकारेल अशी भाबडी चिंता व्यक्त केली आहे (मिलिटरी अॅपरॅटस जाउदे तेल लावत). आता अखंड भारत लवकरंच होणार अशी आशा बाळगायला हरकत नाहि, जनमताचा कौल आहे तो...
राज आपल्याला ही चिंता खरीच
राज आपल्याला ही चिंता खरीच भाबडी वाटते का? एआय वाले तर या पेक्षा भयानक चित्र उभ करतात.
प्रश्न/मुद्दा एआयचा नाहि,
प्रश्न/मुद्दा एआयचा नाहि, जनमतावरुन युद्ध छेडण्याचा आहे. एआयची बाउंडरी आणि रियल इंटेलची सत्यता यातला फरक समजुन घ्या. एआय्/एमएल मॉडेल/अॅल्गो द्वारा जनमत गरजेनुसार स्विंग करता येउ शकतं याची कल्पना तुम्हाला आहे का?
एआय्/एमएल मॉडेल/अॅल्गो
एआय्/एमएल मॉडेल/अॅल्गो द्वारा जनमत गरजेनुसार स्विंग करता येउ शकतं याची कल्पना तुम्हाला आहे का?>>>> फक्त अंदाज आहे. ज्ञान नाही.
<< मागील पाच-सहा
<< मागील पाच-सहा महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढलेला आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये जो संघर्ष झाला होता त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर चीन आणि भारत या दोन्ही देशांचे परस्पर संबंध तणावाचे झाले असून ती परिस्थिती अजूनही कायम आहे. कालच अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केली असल्याची बातमी आली आहे. >>
----- गलवान मधे २० जवान शहीद झाले, आणि १०० अधिक जखमी झाले... पण पंतप्रधान १९ जून च्या सर्वपक्षिय सभेत घुसखोरी झालेली नाही असे सांगितले आहे.
" ना कोई वहां हमारी सिमा मे घुंस आयवहां, न ही कोई घुसा हुआ है, न ही हमारी कओ कोई पोस्ट किती दुस्रे के कब्जे मे है... " चीन ने नावही घेतले नाही.
परराष्ट्र मंत्री, आणि रक्षा मंत्री वेगळेच सांगत आहेत. जर कुणी भारताच्या हद्दीत घुसलेच नाही तर अनेक जवान शहीद कसे झाले?
<< माझा समज होता कि सरकार
<< माझा समज होता कि सरकार जनमत त्यांच्या बाजुने वळवायला युद्धं पुकारतात. >>
----- सहमत.... माझाही असाच समज आहे.
सिमेवर युद्धसदृश परिस्थिती आहे. काहीही होण्याची शक्यता आहे...
हा डाटा शत्रू राष्ट्र पेक्षा
हा डाटा शत्रू राष्ट्र पेक्षा येथील ल च राजकीय पक्षांना जास्त उपयोगी असतो .
आणि तेच ह्याचा वापर करतात .
विविध खोट्या द्वेष पूर्ण व्हिडिओ समाज मध्यम वर अपलोड करतात,टीव्ही चॅनल वर अजेंडा चालवतात आणि जनमत दूषित करून जनमत स्विंग करतात
शत्रू राष्ट्र ना हा डाटा काही कामाचा नाही .
शत्रू राष्ट्राचे विभाजन करायचे असेल तरच त्याचा थोडा फार उपयोग होवू शकतो.
पण अस्थिर शेजारी जास्त धोकादायक त्या मुळे शत्रू असले खेळ खेळणार नाही.
पण अस्थिर शेजारी जास्त
पण अस्थिर शेजारी जास्त धोकादायक त्या मुळे शत्रू असले खेळ खेळणार नाही. >>>>>>>

हे सुद्धा त्यांनी चिनी भाषेत वाचले असेल
आणि १९६२ च्या विश्वास घातकी आक्रमण नंतर सुद्धा आपण चीन ला सभ्य समजतोय हे बघून त्यांचे हृदय पाझरले असेल यात शंका नाही
!
हो ना
हो ना
मुख्यमंत्री असताना मोदी 5 वेळा चीनला गेले होते , काय हे बंधुप्रेम
चीनच कशाला अगदी महाराश्ट्रात
चीनच कशाला अगदी महाराश्ट्रात जरी तुम्ही सरकार विरुद्ध बोललात तर तुमचे घर पाडले जाउ शकत व इतर काही आरोप लावले जाउ शकतात. तसेच सन्जय राउत सामनामधे तुमच्यावर एक खणखणीत अपशब्दानी भरलेला लेख पण लिहितील.
राहुल गांधीला आधी सांगा हो.
राहुल गांधीला आधी सांगा हो. त्याच्या मते सगळा उत्तर भारत चिन्यांनी पादाक्रांत केलाय, पण सरकार उर्फ मोदी घाबरून आपल्या घरात लपून बसलेय.
आणि आता मी हे लिहीत असताना कदाचित चिनी माझ्या दारात पण आले असतील अशी भीती मला राहुल गांधींचे ट्विट वाचून वाटायला लागलीय.
जाऊन बघून या आणि मोदींना
जाऊन बघून या आणि मोदींना सांगा
38000 sq किलोमीटर जमीन चीन नी
38000 sq किलोमीटर जमीन चीन नी ताब्यात घेतली आहे ही काही कमी आहे काय.
चीन नी जेवढी जमीन ताब्यात घेतली आहे त्या
पेक्षा भारतातील काही राज्य आकार नी लहान आहेत.
मोदी नी सांगा तो भू भाग परत
मोदी नी सांगा तो भू भाग परत घेण्यास बघा जमतंय का त्यांना.
फक्त टीव्ही वर भाषण देवून तर जमणार नाही.
मोदी बोलतो , कोई आया नही
मोदी बोलतो , कोई आया नही
मोदी राफेल घेतो
संघाची 3 दिन आर्मी आहे
मोदींनी चायना ऐप बंद करून चीनचे कम्बरडे मोडले.
आणि राहुल गांधींचे कशाला ऐकायचे ?
राहुल गांधींच्या घरचे पंतप्रधान होते, तेंव्हा त्यांना विचारत होते. आता मोदी शहाना विचारा
त्यांना नाही जमलं तर कंगना ला
त्यांना नाही जमलं तर कंगना ला पाठवा सीमेवर ती शेरणी आहे.
आणि अर्णव कडे एकाधी तोफ देवून पाठवा.
हे असले की बाकी सैन्याची गरजच नाही.
38000 sq किलोमीटर जमीन चीन नी
38000 sq किलोमीटर जमीन चीन नी ताब्यात घेतली आहे ही काही कमी आहे काय. >>>>>
अहो १९६२ ला युद्ध झाले आणि १९६३ पर्यंत चीन च्या ताब्यात असलेल्या जमिनीचा तो आकडा आहे !!!!
संसद मध्ये पण काही काँग्रेसी सदस्य भाजप ची खेचू पाहत होते , पण तो आकडा १९६३ पर्यंत चा आहे समजल्या वर गप्प बसले .
जम्मू पासून तामिळनाडू पर्यंत भाजप विरोधकांचे silective outrage हास्यास्पद असते म्हणून सर्व सामान्य जनता विरोधकांना वाळीत टाकते !.
या बाबत अजुन एक उदाहरण ----
केरळ मधील सोने तस्करी केस मध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट च्या सहकारी एल डी एफ पक्षाचा मंत्री जलील चा हाथ असल्याचे दिसून आले , तर कम्युनिस्ट पक्षांचा नेता बालकृष्णन ने
" जलील ने कुराण पुस्तक वाटले म्हणून भाजप त्याला या केस मध्ये अडकवू पाहत आहे "
असे सांगून अकलेलेचे तारे तोडले .
यावरून तेथील काँग्रेस ने सुद्धा कम्युनिस्ट पक्षाला झापले " खरे स्मग्लार कोण ते केरळी जनतेने ओळखले आहे , यात कुराण कशाला मधी आता ? ".
त्या बालकृष्णन सारखं इथले मोदी विरोधक तर्क शून्य आरोप करत आहेत ......
जाऊन बघून या आणि मोदींना
जाऊन बघून या आणि मोदींना सांगा>>>
तुमचा राहुल करतोय की रोज तेच काम..... त्याच्यावर विश्वास नाही का ???
1962 ला गेले
1962 ला गेले
गेले ते गेले
नंतर काँग्रेसची 40 वर्षे झाली , भाजपाचीही 17 वर्षे झाली ( व्हीपासिंग भाजपा 5 , बाजपेयीं 5 , मोदी 7 )
कुणीतरी परत आणायलाच पाहिजे
मला वाटले होते की उदयभौ
मला वाटले होते की उदयभौ परदेशात रहातात तेव्हा त्यांना बरीच माहिती असेल, पण तसे नाही. उदय, नो मॅन्स लँड हा प्रकार माहिती आहे असेलच तुम्हाला. या नावाचा सिनेमा पण ऑस्कर मिळवुन गेलाय. बोस्निया वर होता तो. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी अगदी अगदी आवर्जुन पहावा अशी माझी तह-ए- दिलसे शिफारस आहे.
तर हे नॉटी नॉटी पिचपिचे आपल्या आणी त्यांच्या जमिनीच्या मध्ये असणार्या नो मॅन्स लँड मध्ये घुसले आणी त्यांनी आपल्या सैनिकांना मारले, आपले २० गेले पण त्यांचे किती गेले त्या बद्दल नॉटी नॉटी चकार शब्द काढत नाहीत. मग इथेच युवीचे ( युवराज / अनादी कालपासुन भावी पंप्र ) फावते आणी मग युवी किबोर्ड बडवत बसतो. मग मोदी जर म्हणाले की पिचपिचे ( मोदी चिन्यांना चिनीच म्हणतात, पिचपिचे माझे वर्ड्स आहेत कारण मी वर्णद्वेषी आहे ) आत आले नाही, तर मग मोदींचे काय चूकले? हो चूकलेच बर्र का. कारण ते युवीला कळ्ळेच नाही.
हो १९६२ ला युद्ध झाले आणि
हो १९६२ ला युद्ध झाले आणि १९६३ पर्यंत चीन च्या ताब्यात असलेल्या जमिनीचा तो आकडा आहे !!!!
मग ती परत घ्यायची आहे की त्यांनाच दान करायची आहे.
मोदी सारखे 56 इंची छातीचे पंतप्रधान आहेत.
आरएसएस सारखी राष्ट्रवादी संघटना मोदी बरोबर आहे..
बिन कामाची काँग्रेस satte बाहेर आहे.
मग काय अडचण आहे घ्या ना 38000 वर्ग किलोमीटर जमीन चीन कडून.
मग काय अडचण आहे घ्या ना 38000
मग काय अडचण आहे घ्या ना 38000 वर्ग किलोमीटर जमीन चीन कडून.
नवीन Submitted by Hemant 33 on 19 September, 2020 - 11:43
---
घेतील..ते..,तुम्ही नका काळजी करु.
मग काय अडचण आहे घ्या ना 38000
मग काय अडचण आहे घ्या ना 38000 वर्ग किलोमीटर जमीन चीन कडून.>>> हो ना, ती जमीन म्हणजे एक छोट्टेसे खेळणेच आहे, जे पिचपिच्यांनी हातपाय आपटत, रडत गागत चाचांकडुन हिसकावुन घेतले. चाचांना तर लहान मुले प्रिय. त्यांनी विचार केला की एवीतेवी त्या जमिनीवर गवताचे पाते पण उगवत नाही, मग ती जमीन नॉटींना द्यायला काय हरकत आहे? मग ती त्यांनी उदार मनाने देऊन टाकली.
आता हेमंत आणी त्यांचे सहकारी ( इथले माबो वरचे ) दिल्ली दरबारात जाऊन निवेदन देणारेत जमिनीविषयी.
Pages