तिरुमला ऑईल

Submitted by बिथोवन on 15 September, 2020 - 00:54

तुम्ही सचिन सुप्रिया या जोडगोळीचा "तिरुमला ऑईल" ही जाहिरात पाहिली असेल. ही जाहिरात पाहिल्यानंतर मला पडलेले प्रश्न.

(१) "मला आवडणारे पदार्थ मी नेहमीच खातो" असे म्हणताना सचिन त्याची तुंदीलतनु आतमध्ये खेचतो असे वाटते का?

(२) सचिनचे सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ असा टी शर्ट घातला असावा का? (कारण तो खरोखर फिट्ट असेल तर शर्ट आतमध्ये खोचलेला दाखवला असता असे वाटते.)

(३) सुप्रिया ज्या पद्धतीने "तिरुमला ऑईल" असे कॅन दाखवत ठासून म्हणते तेंव्हा ती एखादी इंजिन ऑईलची जाहिरात करते असे वाटते का?

(४) सुप्रियाने "तिरुमला ऑईल" असे न म्हणता "तिरुमला तेल" असे म्हंटल्यास योग्य वाटेल काय?

(५) ती दोघं पिळगावकर असल्याने आपल्याला पिळत आहेत असे वाटते का?

जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

.....

Group content visibility: 
Use group defaults

<<<कुठले तेल?
जेमिनी>>> आपण तिरुमला किंवा जेमिनी नाही वापरला आणि त्या ऐवजी पॅराशूट कोकोनट ऑइल वापरले तर चालते का?

म्हागृ चा वर्क आउट ह्युडो बघा युट्युबवर आणि त्याचे रोस्ट ट्रोल केलेले ह्युडो पण बघा खूप स्ट्रेस कमी करणारे आहेत खूप हसवणारे आहेत. किती लाल करतो हा माणूस स्वतःची अजूनही, एकदम आत्मकेंद्रित आहे .

म्हागृ चा वर्क आउट ह्युडो बघा युट्युबवर.............हो मागेच पाहिले आहेत.खूप किळसवाणा दिसतो.बिन बाह्यांचा टीशर्ट onglvanaa दिसतो.मनातून साफ उतरला.

विग लावून आमची मुंबई आमची मुंबई गाण्यावर नाचतो त्या व्हिडिओचे कमेंट्स वाचा युट्युबवर. मस्त करमणूक होईल.

BIG BASKETवर उपलब्ध दिसत आहेत तिरुमाला ची तेलं.
मी वापरत नाही, पण इथली चर्चा आठवली ,कार्ट भरतांना सहज तपासून पाहिले. सर्व refined oils च आहेत

जाहिरात खरच थोडी loud वाटली. तसही पिळगाव्कर साहेब असले की अतिशयोक्ती / आत्मप्रौढी होणार हे मी तरी गॄहित धरलेल असतच.
योगायोगाने काही दिवसापुर्वीच या ब्रँड्च्या एका distrbutor मित्राशी बोलण झाल. त्याच्या मतानुसार, ह्या तेलाला मार्केट response खुप चांगला आहे.
बाकी, कंपनीने इथली चर्चा वाचल्याचा दाट संशय येतोय Happy , त्यांच्या आगामी 'कोकोनट' तेलाची ब्रँड अँबेसिडर माधुरी नेने असेल ( साभार: युटुब वरिल MD ची मुलाखत ).

असु द्या,... माधुरी तर माधुरी. ती लाऊड अभिनय तरी करत नाही आजिबात. वीम च्या जाहिरातीत नाही का ती खरंच मोलकरीण वाटली होती.

तो अमिताभ एवढ्या जाहिराती करतो या वयात ते चालते आणि ५३ वर्षांची (५३! कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना!) माधुरी दीक्षित करते म्हटलं तर लगेच म्हातारी?
मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो बघा... Light 1

<<< खरंच मोलकरीण वाटली होती.>>> तिला खरंच पोळ्या लाटायला येत असतील तर आम्हाला हवी आहे पोळ्या करणारी बाई! इथे रोज दहा पोळ्या करायला महिना २०००/- घेतायत. आम्ही निगोशीएट न करता तेवढे देऊ.

माफ करा पण मला असे वाटले की विनोदाच्या अंगाने जाताजाता धागा बॉडी शेमिंग (किळसवाणा वगैरे) वर घसरला.
६३ व्या वर्षी सचिन व्यायामाच्या बाबतीत जागरूक आहे, कपडे ही व्यायामासाठी सोयीस्कर असेच दिसले. त्याची तुलना तिशीच्या पीळदार शरीराच्या तरूणांच्या वर्कआऊटशी करून ओंगळवाणे कसे म्हणता येईल?
पुन्हा न आवडलेल्या तेलाची जाहिरात, त्यातले संवाद, जाहिरात कधी, किती वेळा प्रसारित करायची ह्यावर सचिनचा कंट्रोल नसावा, त्याबाबत त्याला दोष कसा देता येईल?
बरेच प्रतिसाद पटले, आवडले नाहीत.

मूळ जाहिरात ठीकठाक होती. म्हणजे,
आम्ही तुम्हाला चक्क बटाटेवडे खाताना बघतोय. हो, माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरीही इतका fitness?? तिरुमाला ऑईल..

हे समजू शकतो. पण नवीन जो बदल केला आहे, happiness वाला. तो अजिबात जुळत नाही. म्हणजे पहा,
आम्ही तुम्हाला ..... हो, माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरीही इतका happiness??

आता आवडीचे पदार्थ खाल्यावर happinessच मिळणार ना??? sadness साठी कोणी आवडीचे पदार्थ खात का???

पण मला असे वाटले की विनोदाच्या अंगाने जाताजाता धागा बॉडी शेमिंग >>>>>>> खरंच गप्पाच्या तालात पब्लिक फोरमवर लिहिताना हे भान बाळगायला हवे होते.आता संपादित करता येणार नाही.लक्षात आणून दिल्याबद्दल, अश्विनी धन्यवाद.

जाता जाता व्यायामाचे ज्यावेळी व्हिडिओ बनवले जातात्,त्यावेळी आपल्या त्रुटी झाकणारे कपडे असावेत ह्या मतावर मात्र ठाम आहे.

त्या वर्काआऊट च्या video मधे महागुरूंनी waxing केलेलं दिसतय
कोणाला कशाचं तर मनिम्याउला केसाचं !!!!
अस पण महागुरु विगच वापरतात.

कोणाला कशाचं तर मनिम्याउला केसाचं !!!!
अस पण महागुरु विगच वापरतात. Lol Lol Lol

अहो महागुरूंनी हात पाय wax केले हो. डोक्यावरचे केस टापशी बांधून झाकलेत की Lol

सचिन यांच्याबद्दल अश्या पोस्ट बघून नेहमीच वाईट वाटत आलेय.
मला वाटते सचिन पिळगावकर यांच्याबद्दल अशी ट्रोलिंग मराठी प्रेक्षकांकडूनच होते. बाकी भाषिकांमध्ये त्यांच्याबद्दल पुरेसा आदरच दिसून येतो.
हे एक फॅड आहे ज्याला दुर्दैवाने आपण बळी पडतो. जिथे अभिमान बाळगायचा तिथे आपल्याच माणसांचे हसे करून ठेवतो.
बाकी जिथे राहुल गांधींना पप्पू आणि खुद्द नरेंद्र मोदींना फेकू म्हणून झटक्यात अपप्रसिद्धी मिळते त्या सोशलसाईटच्या जमान्यात एखाद्याला ठरवून ट्रोल करणे काही कठीण नाही.
आपण सारेच आपल्या नकळत प्रवाहासोबत वाहावत जातो आणि आपल्याला हे फनी वगैरे वाटू लागते.
यामागे हुमायून नेचरसुद्धा आहे. एखाद्या यशस्वी माणसातील एखादा असलेला वा नसलेला दोष शोधून वा मोठा करून त्यावर बोट ठेवत ट्रोल केल्यास कुठेतरी आपल्या आत काहीतरी सुखावते, वा एक समाधान मिळते ज्यामुळे आपल्यातल्या एखद्या वैगुण्याचे मग आपल्याला फारसे काही वाटत नाही.

गंमत बघा, सोशलसाईटवर नसलेले माझे आईबाबा काकामामा जे कोणी आहेत त्यांच्या मनात सचिनबद्दल तोच आदर आणि तेच प्रेम आजही आहे. Happy

Pages