लेखनात मुख्य चित्र/फोटो देण्यासाठी नवीन सोपी सोय

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

मायबोलीवरच्या लेखनात चित्रे/फोटो द्यायची सोय अनेक वर्षांपासून आहे. आधी तुमच्या वैयक्तीक जागेत फोटो अपलोड करायचा आणि नंतर तो लेखात चिकटवायचा. पण ही दोन टप्प्यात आहे आणि मोबाईलधारकांसाठी थोडी अडचणीची आहे.

इथे प्रकाशित झालेल्या ७०% टक्के लेखनात फक्त एकच चित्र असते (किंवा एकच चित्र योग्य दिसेल) असे दिसून आले. त्याला आपण मुख्य चित्र किंवा मुख्य फोटो म्हणू यात. आजपासून लेखनात मुख्य चित्र द्यायची सोपी सोय केली आहे.
नवीन लेखन करताना
१. " मुख्य चित्र /फोटो" इथे असलेले "choose file" बटन दाबून हवे ते चित्र /फोटो सिलेक्ट करायचा.
२. उपलोड "Upload" बटनावर टिचकी मारून ते चित्र /फोटो लेखनात चिकटवायचे.
३. नेहमीप्रमाणे इतर मजकूर लिहायचा .

झालं !

फोटोचा आकार खूप मोठा असेल , तर मुद्दाम छोटा करायची गरज नाही. तो आपोआप ९००x९०० इतका केला जाईल. मात्र फोटो कमीत कमी ३००x३०० इतका असणं गरजेचे आहे नाहीतर खूप छोटा फोटो चांगला दिसत नाही.

मुख्य चित्र आपोआप सगळ्यात वर कुठल्याही मजकूराच्या अगोदर दिसत राहील. उपलोड सोपे व्हावे म्हणून फाईल साईजची मर्यादा 2 MB इतकी वाढवली आहे. मोबाईलधारकांसाठी हे खूप सोपे झाले आहे.

सध्या "लेखनाचा धागा" आणि "पाककृती" या लेखनप्रकारात ही सोय केली आहे. हळूहळू इतर प्रकारातही होईल.

याचा आणखी फायदा म्हणजे ग्रूपच्या लेखनाच्या यादीतही या चित्राचे छोटेखानी रूप (Thumbnail) दिसत राहील. लवकरच हे मायबोलीच्या "मायबोलीवर नवीन्/ माझ्यासाठी नवीन " या याद्यांमधेही दिसू लागेल.
याची चाचणी म्हणून काही लेखात/ पाककृतीवर असे चित्र/फोटो चिकटवून पाहिले आहे. त्यामुळे ज्या लेखनात ही चाचणी केली त्यात "बदलून" असे दिसते आहे.
उदा. हे ग्रूप पहा.
गुलमोहर - इतर कला , पाककृती आणि आहारशास्त्र,
खेळाच्या मैदानात

या शिवाय तुम्हाला आणखी चित्रे/फोटो लेखात द्यायचे असतील , तर सध्याची सोय आहेच. त्यात बदल नाही.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

@मायबोली प्रशासक.

मायबोली अ‍ॅप दोन दिचसापेक्षा जास्त दिवस ओपन नाही केली तर, आपोआप लॉगआऊट होते.
ती तशी न व्हावी यासाठी काही करता येईल का ? या शिवाय अ‍ॅप 'User Name' आणि 'Password' देखील लक्षात ठेवत नाही याबाबतीत देखील काय करता येईल का ते पाहा.

App वापरताना काही अडचणी (लेखात किंवा प्रतिसादात चित्र देण्याबद्दल) आहेत आणि त्यावर काम सुरु आहे.

Pages