दिवास्वप्न

Submitted by डी मृणालिनी on 9 September, 2020 - 06:17

मी त्यादिवशी सहज विचार करत होते ,समजा सध्या जगात चालणाऱ्या गोष्टी उलट्या दिशेने चालू लागल्या तर .... ? म्हणजे लहानांनी मोठ्यांचं ऐकण्याऐवजी मोठे लहानांचं ऐकू लागले तर ...... ? कित्ती छान कल्पना आहे किनई !
मग रोज मम्माला मी दूध देईन . ती मला विनवणी करेल. '' मृणाल ,प्लिज आज दूध नाही घेतलं तर चालेल ? ''
'' अजिबात नाही . चल लवकर गुटुक गुटुक पिऊन टाक ''
''अगं पण मी रोज घेते ना ! आजच्या दिवस नको ना प्लिज ..... ''
'' एवढुशी होतीस ना तेव्हा सगळं ऐकायचीस . तेव्हा किती छान गब्दुल्ली होतीस . आणि आता बघ हाडांचा सापळा नुसता ! ''
आणि मग बिचारी मम्मा मुकाट्याने सगळं दूध पिऊन टाकेल .
मग येणार सचिन ( माझा बाबा )
मी म्हणेन , " सचिन आधी तो मोबाईल बाजूला ठेव "
सचिन गुपचूप हातातला मोबाईल बाजूला ठेवेल . " अरे ! हे काय ? मोबाईल ठेवायला सांगितला तर लॅपटॉप घेतला . आधी सगळं बाजूला ठेव . कळलं ? " - मी .
" मृणाल , प्लिज गं . थोडं काम आहे . लगेच आटपतो . चालेल ना ? फक्त ५ मिनिटं "
" अजिबात नाही चालणार ."
सचिन लॅपटॉपसुद्धा शिस्तीत बाजूला ठेवतो.

आता पाळी आली दादा ताईची .

" दिवसभर नुसता आळस आळस आणि आळस . चला उठा . कुदळ -खोरं घेऊन विहिरीकडे या . सगळे भाजी लावूया . मी बिया घेऊन येते . " - मी
" मृणाल ,आज संध्याकाळी मासे पकडायला जाऊया प्लिजSSS तू किती दिवसांपासून बोलतेस . पण घेऊनच जात नाहीस. आज जाऊया ना प्लिज " - दादा
" बघू . आधी शेतात चला . "

आणि .. मी पुढचा विचार करते न करते तोच मम्माची हाक आली. " मृणाल SSS आधी दूध पी .. "

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy

हा हा .. आमच्याकडे ॲक्चुअली बरेचदा कळत नाही की बाप कोण आहे आणि लेक कोण आहे.... हा विनोदी लेखही त्याच उद्वेगातून नाही ना आला Happy

हा हा .. आमच्याकडे ॲक्चुअली बरेचदा कळत नाही की बाप कोण आहे आणि लेक कोण आहे.... हा विनोदी लेखही त्याच उद्वेगातून नाही ना आला Happy