प्रकरण ७: ग्रीन कार्ड सिस्टिममधील वर्णद्वेषामुळे भारतीयांच्या व्यक्तिगत जीवनातील अग्निदिव्ये

Submitted by गुंड्या on 7 September, 2020 - 21:18

ग्रीन कार्ड हि अडथळ्यांची शर्यंत आहे हे आत्तापर्यंत लक्षात आलेच असेल. ह्यात तुम्ही एकटेच असता तोपर्यंत ठीक आहे, पण काळ थांबत नाही. लग्न, मुले होतात, संसाराचा पसारा वाढत जातो, अनुभव वाढत जातो, तुम्ही जीवनशैलीत स्थिरावत जाता, परंतू ह्या सगळ्याचाच आधार, तुमच्या अमेरिकेतील वास्तव्याचा आधार काही बदलत नाही, मग मर्यादांची जाणीव होते. "अरे, आधीच वेळेत काही निर्णय घेतले असते; कॅनडाला गेलो असतो किंवा दुसऱ्या देशात शिक्षण/नौकरीसाठी गेलो असतो तर बरं झालं असतं" वगैरे विचारचक्र सुरु होतात. उद्योग किंवा इतर काही योजना अनुभवातून तयार झालेल्या असतात, पण संधींचा लाभ घेता येत नाही. व्हिसाचक्रात अडकल्यामुळे काहीच करता येत नाही, अशी असंख्य उदाहरणे आहेत. तर आपण त्यातील काहीची या लेखात चर्चा करणार आहोत.
समजा तुम्ही अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आलात ते संपल्यानंतर, तुम्हाला साधारण २४ महिन्याचा कालावधी इंडस्ट्रीच्या अनुभवासाठी मिळतो. त्या कालावधीमध्ये, पुढील वास्तव्यासाठी नौकरीचे प्रायोजकत्व (तात्पुरत्या वास्तव्याचा एच - १ व्हिसा) मिळणे गरजेचे आहे.

पाचव्या प्रकरणात एच १ व्हिसाबद्दल चर्चा केली होती. "नवीन"/ अगदी पहिल्यांदा (नवा कोरा) एच - १ व्हिसाचा अर्ज करण्यावर बंधने आहेत. दर वर्षी ८५००० चा एच १ व्हिसाचा कोटा उपलब्ध होतो. ८५००० मध्ये २०,००० अमेरिकेत उच्च- शिक्षण घेतलेल्यांसाठी राखीव आहेत. ६५००० च्या कोट्यामध्ये कुणीही अर्ज करू शकतो. अगदी जगभरातून कुणीही.. भारतातील इन्फोसिस, टी.सी. एस. वगैरे कंपन्या त्यांच्या भारतातील कामगारांचे एच - १ व्हिसाचे अर्ज ह्याच मार्गाने भरतात. सहाव्या प्रकरणात चर्चिल्याप्रमाणे ग्रीन - कार्डाच्या सिस्टिम प्रमाणे, ८५,००० एच - १ व्हिसावर कुठल्याही देशाच्या अर्जदारांची कमाल मर्यादा नाही. त्यामुळे मागणी - पुरवठा तत्वावर आधारित, फर्स्ट कम - फर्स्ट सर्व्ह पद्धतीने व्हिसाचे वाटप होते. ८५,००० च्या प्रति-वर्षीच्या नवीन कोट्यासाठी अमेरिका अर्ज स्वीकारायला १ एप्रिलपासून सुरुवात करते. एकदा ८५,००० व्हिसा भरले की पुढील वर्षापर्यंत "नवीन" (नवा कोरा)/ पहिलटकरीण अर्ज स्वीकारणे बंद करते. गेल्या ६-७ वर्षांमध्ये ८५,००० च्या कोट्यासाठी तिप्पट म्हणजे जवळ जवळ अडीच लाखाच्या वर अर्ज भरले गेले आहेत. ह्यावर उपाय म्हणून अमेरिका चक्क लॉटरी सिस्टिम पद्धतीने ८५,००० चा कोटा पूर्ण करते. तुमच्या २ वर्षाच्या (२४ महिन्याच्या) कालावधीत साधारण २ संधी ह्या पहिल्या अग्निदिव्यातून पार पडायला तुम्हाला मिळतात. जर त्यात तुमचा नंबर लागला तर ठीक, नाहीतर लाखो रुपये भरून अमेरिकेत शिक्षणासाठी आल्यानंतर एच - १ व्हिसा न झाल्याने आल्या पावली भारतात परत जायला लागू शकते.. ह्यात शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड ही दोन वर्षात झालेली नसते.

अमेरिकेत बहुसंख्य कामे कंत्राट पद्धतीवर चालतात. तुमच्या व्हिसाचा कालावधी ज्या कामाच्या जागेसाठी, तुमची निवड केली आहे, त्याचा कालावधी आणि इतर असंख्य माहितीवर अवलंबून असतो. गेल्या ४-५ वर्षात इम्मीग्रेशन डिपार्टमेंट खूपच सजग झाल्याने, जरी एच-१ व्हिसाचा कमाल कालावधी ३ वर्षाचा असला तरी लोकांना ४ महिने, १ वर्ष इतक्या कमी कालावधीचे व्हिसा मिळाले आहेत. म्हणजेच अँप्रुव्हड व्हिसा हातात मिळेपर्यंत, नव्याने व्हिसाचे अँप्लिकेशन टाकणे गरजेचे झाले आहे. व्हिसाच्या नूतनीकरणामध्ये देखील अनेक अडचणी आहेत, कारण प्रत्येक वेळेला कंपनीला त्यांच्याकडे तुमच्यासाठी काम आहे हे सिद्ध करावे लागते, आणि जर तुम्ही कंत्राटदार असाल तर तुम्हाला मिळणारे काम हे कस्टमरवर अवलंबून आहे.
ह्यात अजून एक गम्मत म्हणजे, तुमच्या कस्टमरची गरज असेल त्याप्रमाणे, तुम्हाला त्या कामाच्या ठिकाणी हजर व्हावे लागते. ९ वर्षात १० विविध राज्यात वास्तव्य झालेले एक कुटुंब, माहितीत होते. तुमच्याकडे ग्रीन कार्ड असेल आणि कंत्राट संपले तरी काळजी नसते, परंतू व्हिसावर असताना तुमच्या हातातील काम संपताक्षणीच तुम्ही बेकायदेशीर ठरता. गाशा गुंडाळून तुमच्या देशात परत जाणे अपेक्षित असते.

एच-१ व्हिसा प्रायोजकाधारित आहे, म्हणजेच तुम्हाला नौकरी स्वतःच्या मर्जीने बदलता येत नाही. जर दुसरी कंपनी, त्याच्याकडील उपलब्ध जागेसाठी तुमचा व्हिसा प्रायोजित करू शकत असेल, तरच तुम्हाला नौकरी बदलता येते. ह्याचाच अर्थ, एच १ व्हिसाधारक त्याच्या कंपनीशी अप्रत्यक्षरित्या बांधील होतो. त्याला त्याच्याच कंपनीच्या एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये मूव्ह करण्यासाठीसुद्धा कंपनीला व्हिसा अमेंडमेंट (दुरुस्ती) करून घ्यावी लागते. जागतिक महामारीच्या काळात बरेचसे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे लोक घरूनच काम करत आहेत, त्यांचे काम करण्याचे ठिकाण बदलले आहे, कंपन्यांनी अत्यंत काळजीपूर्वक हा बदल सरकारी नियमात बसवून घेतला आहे.

ह्या दुसऱ्या पातळीवरील अग्निदिव्यांशी झुंजत असताना, तुम्ही लग्न वगैरे करता. समजा तुम्ही भारतातील व्यक्तीशी लग्न केले. तर ती व्यक्ती, अमेरिकेत एच- ४ व्हिसा वर (जो एच -१ व्हिसाचा आश्रित व्हिसा आहे), प्रवेश करते. एच - ४ व्हिसावर तुम्ही काम तर सोडाच पण जीवनातील साध्या साध्या गोष्टींसाठीही पात्र ठरत नाही. हेच जर तुम्ही एल - २ (जो एल-१ व्हिसाचा आश्रित व्हिसा आहे), वर आलात तर कामच काय परंतू सगळ्या गोष्टींसाठी पात्र ठरता. हा भेदभाव का त्याला काहीही आधार नाही. जगण्याचे मूलभूत मानवाधिकार देखील एच - ४ व्हिसावरच्या लोकांना नाकारले गेले आहेत. एच - ४ व्हिसावरील लोकांना किती विविध पातळीवर (मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, स्थलांतरण संदर्भात आणि इतर अनेक) संघर्ष करावा लागतो ह्यासाठी Hearts Suspended , एच-४ व्हिसा; एक शाप वगैरे अवॉर्ड विंनिंग शॉर्ट डॉक्युमेंटरी जरूर पहाव्या. एच - ४ हा एच - १ वरील आश्रित व्हिसा असल्याने, गैरफायदा उठवून कौटुंबिक हिंसा आणि इतर अनेक सामाजिक गुन्हेदेखील घडले आहेत. किंवा कित्येकांना हे अस्थैर्य, सततचा दबाव सहन न झाल्याने कौटुंबिक कलहातून डिव्होर्स (घटस्फोटा) पर्यंतही प्रकरणे गेली आहेत.

जर तुमच्या ग्रीन कार्डाचा अर्ज सरकार दरबारी (धूळ खात) पडून राहिला असेल तर एच - ४ वरील जोडीदाराला काम करण्याचा परवाना मिळतो. परंतू सरकार अत्यंत सजगपणे काम करत असल्याने, ह्या परवान्यांच्या नूतनीकरण वगैरे प्रक्रियांमध्ये विलंबित तालाचा सढळपणे वापर केलेला दिसून येतो. परवान्यासाठी वेळेत अर्ज करूनही सरकार दरबारी झालेल्या विलंबामुळे हातातील नौकऱ्या सोडून अनेकांना घरी बसावे लागले आहे.

समजा तुम्ही भारतातच लग्न- मुले झाल्यावर अमेरिकेत एच-१ व्हिसाच्या माध्यमातून आलात, तर तुमची भारतात जन्मलेली मुले एच - ४ व्हिसावर अमेरिकेत येतात. अगदी शिशु - बाल वयात अमेरिकेत आलेली आणि अमेरिकन व्यवस्थेत वाढलेल्या मुलांची वेगळीच ससेहोलपट होते. अमेरिकेत जन्म किंवा एच-१ (कामाच्या परवान्यावर) वास्तव्य नसल्याने त्यांना एस.एस.एन (SSN) मिळत नाही. शाळा - कॉलेजातून बर्याचश्या प्रोजेक्ट (प्रकल्पावर) कार्य करण्यासाठी ही मुले अपात्र ठरतात. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अमेरिकेतील मुले हमखास छोट्या - मोठ्या नौकऱ्या करून पैसे कमावतात, एच - ४ व्हिसावरील मुले ह्यातले काहीच करू शकत नाहीत. १५० वर्षाच्या ग्रीन - कार्डाच्या कालावधीमुळे, एच - ४ वर जगणारी भारतीय मुले सज्ञान (२१ वर्ष) होईपर्यंत, त्यांना ग्रीन- कार्ड मिळणे केवळ अशक्य आहे. म्हणजे २१ वर्षाची झाल्यावर, त्यांना त्यांच्या पालकाच्या एच - १ व्हिसावर राहता येत नाही. त्यांना स्वतःचा एच - १ व्हिसा किंवा एफ - १ व्हिसा किंवा अन्य कुठला तरी व्हिसा प्राप्त करणे भाग आहे. शिशु - बाल वयापासून अमेरिकन सिस्टिममध्ये वाढलेल्या मुलांना अचानक कुठेतरी त्यांच्या उपरेपणाची जाणीव करून दिली जाते. ह्या सगळ्याचे पर्यवसान मुले आणि पालकांची ताटातुटीत होणे साहजिक आहे. २१ वर्षाची सज्ञान मुले, जी अमेरिकेत वाढली त्यांना अमेरिकेबाहेर - त्यांच्या मायदेशात (ज्या बद्दल त्यांना फार कमी माहिती आहे.) जाण्याशिवाय गत्यंतर उरत नाही.
समजा तुमची मुले अमेरिकेत जन्माला आली असतील, तर त्यांना जन्मसिद्ध अमेरिकन नागरिकत्व मिळते. तुम्ही भारतीय नागरिक आणि मुले अमेरिकन नागरिक. दुर्दैवाने जर तुमच्यावर प्राणघातक प्रसंग गुदरला, आणि तुम्ही मृत्युपत्रात मुलांच्या पुढील सोयीबद्दल लिहिले नसेल तर तुमच्या पश्चात, अमेरिकन सरकारला तुमच्या मुलांची सोय बघण्याचा संपूर्ण अधिकार प्राप्त होतो. तुमच्या भारतीय नातेवाईकांचा तुमच्या मुलांवर कुठलाही कायदेशीर अधिकार उरत नाही. अमेरिकन सरकार येथील पद्धतीप्रमाणे लहान मुलांची पुढची सोय लावू शकते.

तुमच्या एच - १ व्हिसावरच्या वास्तव्यात अमेरिकेबाहेरच्या प्रवासावर अनेक निर्बंध येतात. जर तुम्ही नौकरी बदलली असेल, किंवा अमेरिकेतील वास्तव्यात एच - १ चे नूतनीकरण झाले असेल, तर अमेरिकेत परत येताना तुम्हाला मायदेशातील (भारतातील) अमेरिकन एम्बसीमध्ये जाऊन परवान्यावर मान्यता मिळवणे कायद्याने बंधनकारक आहे, त्याशिवाय परतीचा प्रवास करता येत नाही. गेल्या १० वर्षात, अमेरिकन एम्बसीने काहीतरी कारण देऊन तिथेच (भारतात) अडकवण्याचे उद्योग सुरु केले आहेत. त्यामुळे एच - १ व्हिसाधारक, शक्यतो अमेरिकेबाहेरचा प्रवास टाळत आहेत. अश्याप्रकारे आपल्या अमेरिकेतील कुटुंबाशी ताटातूट झालेले अनेकजण भारतात अडकले आहेत. ह्याचा परिणाम म्हणजे, लोकांना लग्न - मुंजी सारख्या शुभ कार्यासाठीच नव्हे तर आपल्या आप्तेष्टांच्या अंत्यदर्शनासारख्या नाजूक घटनांनाही मुकावे लागले आहे. तुमच्या घरातील प्रिय व्यक्तीच्या अंतिम दर्शनाला आणि कार्यालादेखील केवळ आणि केवळ अमेरिकेतील पुनर्प्रवेशाच्या अनिश्चितीमुळे जाता येऊ शकत नाही, हि कल्पनाच शहारे देऊन जाते.

हि सगळी अग्निदिव्ये दिवाळीचे बाण/ फटाके वाटावे, किंवा ज्याला चेरी ऑन टॉप म्हणता येईल तो प्रकार आता आपण बघूया. समजा दुर्दैवाने, एच - १ व्हिसा-धारकाचे काही कारणांमुळे निधन झाले, तर आश्रित असलेले एच - ४ व्हिसावरील सगळे कुटुंब त्याक्षणी बेकायदेशीर ठरते. त्यांना १४ दिवसांचा ग्रेस पिरियड मिळतो, परंतू कायद्याच्या दृष्टिकोनातून ते सगळे कुटुंब बेकायदेशीर आहे, त्यांनी देश (अमेरिका) लौकरात लौकर सोडणे अपेक्षित आहे.

ज्या १० लाख भारतीय कुटुंबांची कथा इथे मांडली आहे, ती कुटुंबे सरासरी १० - १२ वर्ष तरी अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. कुणी कुटुंब-कबिल्याबरोबर इथे आलाय, तर कुणाचा संसार इथे फुललाय. सामाजिक बंधांबरोबरच, लहान मुलांच्या शिक्षण आणि इतर गोष्टी स्थिरस्थावर झाल्या आहेत. परंतू सगळ्याचा आधारच स्थिर नाही, कुठल्याही क्षणी आपण इथून मुळासकट उखडले जाऊ शकतो ह्या भावनेने जीवन जगत आहेत.

२०१७ साली कान्सास राज्यात वांशिक द्वेषातून कृष्णा कुचीभोटला ह्या तरुणाच्या हत्येनंतर तेथील लोक-प्रतिनिधींनी तत्परतेने त्याच्या पत्नीला मदत केली नसती तर त्या कुटुंबाची अवस्था फारच कठीण झाली असती. दिवसाआड एखादी तरी घटना एच -१ वरील व्यक्तीच्या निधनाची बातमी सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून ऐकायला मिळतेच, कधी हेल्थ कंडिशन, तर कधी अन्य काही कारणामुळे, दुर्दैवी घटना घडते. मग कुटुंबाच्या निकट असलेली एखादी व्यक्ती फंड रेझिंग सुरु करते. फुललेले संसार एका क्षणात उखडले जातात. कुटुंबातील व्यक्तीच्या जोडीदाराचा कामाचा परवानाही मुळ व्यक्तीच्या (एच - १ वरील) निधनामुळे तात्काळ संपुष्टात येतो. ह्या कुटुंबांना जर ग्रीन कार्ड वेळेत मिळाले असते तर त्यांचे कुटुंब सरकारी जाचक निर्बंधातून मुक्त झाल्याने त्यांना निदान त्यांच्या अमेरिकेतील अस्तित्वाची चिंता करायची गरज पडली नसती.

व्यक्तिगत जीवनातील सगळ्याच आव्हानांचा तपशील खोलात जाऊन लिहिणे शक्य नसले तरी काही वानगीदाखल उदाहरणे इथे लिहिली आहेत. ह्या संदर्भात काम करणाऱ्या संस्थांनी; अमेरिका उच्च - शिक्षित स्थलांतरितांना गुलामांपेक्षा हीन दर्जाची वागणूक देते; अश्या प्रकारची निरीक्षणे नोंदवलेली आहेत.

व्यक्तिगत जीवनातील ही लढाई लढत असताना, कामाच्या ठिकाणी काय परिस्थिती असते ह्याचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उबो, fear mongering विषयी सहमत. खरंतर वर्णद्वेष हा शब्द बदलला पाहिजे. ऐसीवरचे प्रतिसाद वाचनीय आहेत.
तरीही ही लेखमाला उपयोगी पडेल असे वाटते. विशेषतः ज्या पालकांना अजूनही आपल्या मुलांना अमेरिकेत धाडायची हौस आहे त्यांना याचा नक्की उपयोग होईल. अमेरिकेत राहण्याचे अनेक फायदे आहेत आणि ज्यांना जायची इच्छा आहे त्यांनी जरूर जावे. फक्त या सर्व बाजू देखील समजून घ्याव्यात.
आताचे ट्रेंड अगदीच वेगळे आहेत. परवाच वाचलं की यंदा पुण्यातील सर्व महत्त्वाच्या कॉलेजेस मध्ये विज्ञान शाखेचा कट अॉफ कला शाखेच्या खाली आहे! हुशार मुले कला शाखा प्रामुख्याने निवडत आहेत. अर्थात बदलणाऱ्या शैक्षणिक धोरणांचा या मुलांना फायदाच होईल असे वाटते.

साधना, कारण भारतात राहणे अधिक जिकिरीचे आहे. सर्व गोष्टींचा विचार केला तर पारडं अजूनही अमेरिकेकडेच झुकतं. म्हणून लोकं या अनिश्चितता स्विकारून अमेरिकेत राहणं पसंत करतात.

तुमच्या सगळ्यांची चर्चा वाचून मलापण अमेरिकेत जायची खूप इच्छा आहे पण मी पडलो गरीब माणूस. अमेरिकेत जायचे तीन मार्ग आहेत एक विमानाने, दुसरा जहाजाने आणि तिसरा भारतातून भुयार खोदत खोदत अमेरिकेत जाणे. पहिले दोन काय माझ्या खिशाला परवडणारे नाहीत आणि त्यात धोका पण खूपच आहे वरून पासपोर्ट व्हिजा बनवा वैगरे बारा भानगडी त्यामुळे सध्या मी तिसऱ्या मार्गाचा विचार करतोय रोज तास अर्धा तास भुयार खणत गेलो तर 25-30 वर्षात पूर्ण होईल आणि मी वाटेल तेव्हा अमेरिकेत फुकट फिरून येऊ शकतो.

साधना, कारण भारतात राहणे अधिक जिकिरीचे आहे. सर्व गोष्टींचा विचार केला तर पारडं अजूनही अमेरिकेकडेच झुकतं. म्हणून लोकं या अनिश्चितता स्विकारून अमेरिकेत राहणं पसंत करतात.>>>

Ok. जे दोन्हीकडे राहिलेत त्यांना फरक लक्षात येणार.

मुकुंद धन्यवाद.

दोन्ही जागांचा तुलनात्मक अभ्यास कोणी करून मांडला तर अजून माहिती मिळेल. भारतात राहणे जिकिरीचे आहे असे बाहेर राहणाऱ्यांच्या लक्षात येत असले तरी अमच्यासारख्या लोकांना तिथे कुणीही कधीही कुठेही उठून बंदूक काढू शकतो याची भीती जास्त वाटते Happy Happy

तिथे कुणीही कधीही कुठेही उठून बंदूक काढू शकतो याची भीती जास्त वाटते
Submitted by साधना on 9 September, 2020 - 13:42

ती निदान परवानाधारकाची बंदूक असते. इथे तुमच्या आसपासच्या पाच किमी परिसरात तुम्ही फिरता तेव्हा तुमच्या संपर्कात येणार्‍या कोणी बेकायदा बंदूक बाळगली नाहीये याची खात्री देऊ शकता का? हल्लीच एकाला पोलिसांनी पकडले - त्याने बेकायदा पिस्तुले खरेदी केली होती. खरेदी करायचे कारण काय ठाऊक आहे? नाही कोणाशीही वैर नव्हते फक्त विकणारा लईच स्वस्तात विकत होता (रु. ८,०००/- प्रत्येकी) म्हणून याने दोन घेऊन ठेवली- पुढे मागे गरज पडलीच तर बरी या उद्देशाने. नेमका त्याला पोलिसांनी पकडला. न पकडले जाणारे असे किती असतील. रस्त्यात गाड्या लुटतात, रात्री उशिरा परतणार्‍या आयटी कर्मचार्‍यांना लुटतात. व्यावसायिकांना खंडणी मागतात. मुंबईत लहान मोठ्या सक्रिय गँग हप्तावसूली करतात त्या अशा बंदूकांच्या जोरावरच. अर्थात मुंबईचं नाव झालंय आता देशातल्या सर्वच लहानमोठ्या शहरांत अशीच परिस्थिती आहे.

साधना, बंदूकीची भीती वाटते हे विधान हे भारतात एकट्या स्त्रीला फिरताना असुरक्षित वाटते या विधानासारखे आहे. दोन्ही विधानांत तथ्य आहे पण तरी इतके सरसकटपणे हे विधान करता येईल अशी परिस्थिती सुदैवाने दोन्ही देशात नाही.
भारतात देखील उ. प्र. आणि बिहार मध्ये काही ठिकाणी सर्रास लोक बंदूक वा तत्सम हत्यार बाळगून हिंडतात असे ऐकून आहे.
पण राहणीमान मात्र अनेक पातळ्यांवर मोजता येते आणि त्यात बऱ्याच अंशी अमेरिका भारतापेक्षा पुढे आहे. अर्थात भारतात मोठा बंगला असणाऱ्या व्यक्तीवर जर अमेरिकेत होमलेस रहाण्याची वेळ आली तर ती भारतात परतून येईलच. But relatively speaking Indians are upwardly mobile when they migrate to the US so it makes sense to continue the stay despite the visa limitations.

इथे तुमच्या आसपासच्या पाच किमी परिसरात तुम्ही फिरता तेव्हा तुमच्या संपर्कात येणार्‍या कोणी बेकायदा बंदूक बाळगली नाहीये याची खात्री देऊ शकता का? >>>

त्याने बाळगली असेल पण तो ती काढून निरपराधांवर उगीच चालवत नाही. तो गुंड असेल तर ज्याची सुपारी घेतली असेल त्याच्यावर चालवेल पण सिनेमा हॉल किंवा मुलांच्या शाळेत जाऊन चालवणार नाही.

भारतात देखील उ. प्र. आणि बिहार मध्ये काही ठिकाणी सर्रास लोक बंदूक वा तत्सम हत्यार बाळगून हिंडतात असे ऐकून आहे>>>

हो, माझे तिकडचे कलिग्स सांगतात की हे खरेच आहे. पण ही बंदूक घेऊन कोणी शाळेत जाऊन उगीच फैरी झाडत नाही हा फरक आहे.

साधना, बंदूकीची भीती वाटते हे विधान हे भारतात एकट्या स्त्रीला फिरताना असुरक्षित वाटते या विधानासारखे आहे. >>>

Yes, makes sense..

कॅनडा चे नागरिकत्व घेऊन बरीच मंडळी अमेरिकेला पळतात किंबहुना कित्येकांचा तोच उद्देश असतो.
अशा मंडळींची ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काय परिस्थिती आहे ?

<<लेखकाने काहीही संदर्भ न देता सनसनाटी विधाने पण केली आहेत. उदा. आता ग्रीनकार्डला १५० वर्षे लागतात, एच 4 वर अगदी हाल होतात, तुम्ही जीवनातील साध्या साध्या गोष्टींसाठीही पात्र ठरत नाही. माझ्या मते हे fearmongering आहे.>>

ह्यात काहीही सनसनाटी नाही. अतिशयोक्ती वाटत असली तरीही सत्य परीस्थिती हीच आहे. एखादी गोष्ट तुम्ही अनुभवली नसेल किंवा तुमच्या पहाण्यात आली नसेल ह्याचा अर्थ असा नाही कि ति नाहीच. १५० वर्षासाठी हा संदर्भ बघा.
https://www.cato.org/blog/150-year-wait-indian-immigrants-advanced-degrees
एच ४ वरचे हाल मि स्वतः बघतोय, जगतोय...

<<आपल्या मनासारखे झाले नाही/होत नाही म्हणून गळा काढण्यात (विशेषतः मराठी पब्लिक फोरमवर, ज्यातून काही निष्पन्न होणार नाही) काही अर्थ नाही. >> तुम्ही हे का ग्रुहीत धरताय कि इथे लिहीणारे माझ्यासारखे लोकं इतर योग्य ठिकाणी काही बोलतच नसतील किंवा इतर विधायक व सनदशीर मार्गांनी प्रयत्न करतच नसतील. तसे प्रयत्न चालूच आहेत. धागा ह्या मराठी फोरम वरती काढलाय, मग इथेच मराठीत उत्तर देणार ना!

>>>>>साधना, बंदूकीची भीती वाटते हे विधान हे भारतात एकट्या स्त्रीला फिरताना असुरक्षित वाटते या विधानासारखे आहे. >>>>>>> अ‍ॅब्सोल्युटली. स्त्रिया व लहान मुली फकिंग अतिशय लहान बसने जाणार्‍या मुलींनाही ओंगळ अनुभव येतात.

तिकडे विसावर राहणे इतके तापदायक आहे तरीही लोक तिकडे(च) का राहतात? सेकंड सिटीझन म्हणून पदोपदी अपमान का सहन करतात? अमेरिका म्हणजे(च) स्वर्ग असे काही आहे का? >> Happy Everybody wants to go to heaven but nobody wants to die.

आपल्या प्रश्नांचे उत्तर प्रत्येकाची स्वर्गाची व्याख्या काय आहे त्यावर अवलंबून आहे. माणूस नेहमी संधी शोधत असतो - काम करण्याची, उत्तम पालक होण्याची इ. जिथे आपले उद्दीष्ट गाठायची संधी जास्त असेल तिथे रहातात लोकं. भारतासहित इतर देशात अनेक बाबतीत वयोमर्यादा, किंवा इतर पद्धतीने संधी नाकारतात. अमेरिकेत मिलिटरी असे काही मोजके एंप्लॉयर्स सोडले तर नोकरीच्या जाहिरातीत वयोमर्यादा नसते! आता कुणाला ह्यात स्वर्ग वाटेल, कुणाला नाही. एच-४ वर "सडल्यात" असं वरकरणी जरी म्हणत असल्या तरी अनेकांना त्यावेळात इतर काही करता येत नव्हतं म्हणून उत्तम पालक झालो ह्याचे समाधान असते. आता हे काहींना पटत नाही. इतर देशात जातात. मानू तिथे स्वर्ग असतो.

सामो, शिफ्ट + ८ गं!!!! ... पार "ती फुलराणी" झाली की तुझी Wink
पण हो भारतात महिलांना अनेक प्रकारचे अनुभव येतात आणि कुणी कुणी पार अगदी मणिपूर सुखरूप गाठतात. तेव्हा अतिशय 'wide range of experiences' आहे.

>>फक्त काय जे कौशल्याधारीत ग्रि का देणार आहात ते देताना फक्त कौशल्य आणि अर्जाची क्रमवारी बघितली जावी एवढीच माफक अपेक्षा आहे....<<
वेल, दुर्दैवाने एचआर-१०४४ हे एक गाजर आहे; ज्या कोणि इंट्रोड्युस केलं, स्पांसर केलं आणि सपोर्ट केलं (आयटि कंपनीज) यांनी दाखवलेलं. अमेरिकन लेजिस्लेशन कसं काम करतं, याची माहिती असणार्‍यांना एचआर-१०४४ चं फेट आधीपासुन माहित होतं. तर ते असो.

हियर इज माय सजेशन - ग्रीन कार्डच्या मागे धावण्यापेक्षा सगळ्या लॉबिइस्टनी, समर्थकांनी एच१/४ विजामधे हा बदल सुचवावा. ग्रीन कार्ड्/सिटिझन्स सारखंच, ऑल एच विजाज आर नो मोर टाय्ड टु एनी एंप्लॉयर. वर्क अ‍ॅट विल. - अशी मागणी करावी. बाँडेड लेबरचा मुद्दा आणि त्या अनुशंगाने येणार्‍या सर्व समस्या आपोआप निकालात निघतील. आणि मग बघा, बिल इंट्रोड्युस करणारे, स्पांसर, आय्टि कंपनीज या सगळ्या हिपक्रट्स ची रिअ‍ॅक्शन...

ऑल एच विजाज आर नो मोर टाय्ड टु एनी एंप्लॉयर. वर्क अ‍ॅट विल >>> आताचे माहीत नाही पण मध्यंतरी एक नियम असा आला होता की तुम्ही एका कंपनीच्या व्हिसावर काम करत आहात, आणि दुसरी कंपनी तुम्हाला हायर करायला तयार आहे - अशा वेळी दुसर्‍या कंपनीने तुमचे व्हिसा अ‍ॅप्लिकेशन केल्या केल्या तुम्ही कंपनी बदलू शकता. तो नियम अजूनही आहे का माहीत नाही. बहुधा २००० च्या आसपास आला होता.

मात्र जसे एच-१ व्हिसाज "कौशल्यावर" (all caveats apply Happy ) दिले जातात तेच लॉजिक पुढे नोकरीवर आधारित ग्रीन कार्ड्सना लावले जावे ही अपेक्षा रास्त आहे.

दुसरी कंपनी तुम्हाला हायर करायला तयार आहे - अशा वेळी दुसर्‍या कंपनीने तुमचे व्हिसा अ‍ॅप्लिकेशन केल्या केल्या तुम्ही कंपनी बदलू शकता. तो नियम अजूनही आहे का माहीत नाही. बहुधा २००० च्या आसपास आला होता.
>>

अजूनही हा नियम आहे. मात्र आता h1 दाखला फेटाळण्याचे (rejection) प्रमाण एव्हडे वाढले आहे की हा धोका लोक पत्करत नाहीत

>>तुमचे व्हिसा अ‍ॅप्लिकेशन केल्या केल्या तुम्ही कंपनी बदलू शकता.<<
हे आगीतुन फुफाट्यात पडल्या सारखं होउ शकतं. बाँडेड लेबरचा प्रश्न यातुन सुटत नाहि, शिवाय नविन एच१ प्रोसेसिंगचा झमेला आहेच...

माझा मुद्दा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तुम्हाला खरोखर टॉप टॅलंट एच१ वर आणायचं आहे तर एच१ विजा एंप्लॉयर अ‍ॅगनास्टिक करा, टेक्नालजी अ‍ॅगनास्टिक करा. अरे, सहा वर्षांत एक अख्खी टेक्नालजी बदलते तर एंप्लॉयर का बदलु नये...

पण सरकार व खाजगी कंपन्या यांच्या मधे एक सेमी-सरकारी एजन्सी बनवावी लागेल - जी हे सगळे उद्योग करेल - भारतात लोक शोधणे, त्यांचा व्हिसा करणे, त्यांनी इथे असेपर्यंतची जबाबदारी घेणे वगैरे. नाहीतर आलेला माणूस दोन महिन्यांत पळून दुसर्‍या कंपनीत जाणार असेल तर मूळ कंपनीला काय मोटिवेशन आहे हे सगळे करायला Happy

खरे म्हणजे असे लोक आयते मिळू लागले तर मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या पथ्यावरच पडेल ते. पण लहान कंपन्यांचे वांदे होतील.

माझा मुद्दा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तुम्हाला खरोखर टॉप टॅलंट एच१ वर आणायचं आहे तर एच१ विजा एंप्लॉयर अ‍ॅगनास्टिक करा, टेक्नालजी अ‍ॅगनास्टिक करा. अरे, सहा वर्षांत एक अख्खी टेक्नालजी बदलते तर एंप्लॉयर का बदलु नये... >> एच१ विजा एंप्लॉयर स्पॉन्सर्ड असतो. एंप्लॉयर अ‍ॅगनास्टिक केला तर स्पॉन्सर कोण करणार ?

>>एंप्लॉयर अ‍ॅगनास्टिक केला तर स्पॉन्सर कोण करणार ?<<
अंकल सॅम; फक्त पोलिटिकल विल पाहिजे. डु यु स्टिल थिंक दे कॅनाट रिझॉल्व धिस इशु? दिज गाय्ज हॅव पुट मॅन ऑन द मून.. फिफ्टि एफिंग इयर्स अ‍ॅगो...

डु यु स्टिल थिंक दे कॅनाट रिझॉल्व धिस इशु? >> व्हाय वुड दे?

तुम्हाला खरोखर टॉप टॅलंट एच१ वर आणायचं आहे तर एच१ विजा एंप्लॉयर अ‍ॅगनास्टिक करा, >> प्रश्न एच१ चा नाहीचे मुळात. त्यांना हवे तितके लोक मिळतच आहेत एच१ वर. उलट ६५,००० किंवा जी काय आहे त्या संख्येपेक्षा डिमांड अतिप्रचंड आहे म्हणून लॉटरी पद्धत सुरू करावी लागली आहे. ग्रीनकार्ड मिळावे म्हणून एच१ वाले धडपडतात, अमेरिकेला त्याच्याशी काही देणेघेणे नाही जोपर्यंत एच१ च्या लोकांकडून किंवा आऊटसोर्सिंगमुळे त्यांची कामे होत आहेत. कुणी सांगावं, उलट अमेरिकेतल्या वाढत्या बेकारीमुळे कदाचित विरोध होईल एच१ व्हिसा पद्धतीला आणि आऊटसोर्सिंगला.

त्यापेक्षा एच४ वरील स्पाऊसला पण जर नोकरी मिळत असेल तर त्वरित नोकरी करण्याची संधी दिली (EAD ची वाट न बघता) तरी त्याने खूप बरे पडेल, असे मलातरी वाटते. त्यामुळे ज्यांच्याकडे टॅलेंट/स्किल्स आहेत, त्याचा सदुपयोग होईल. आणि शिवाय त्याचा फायदा फक्त भारतीयच न्हवे तर सर्वच एच४ ना आणि अमेरिकन उद्योगांनापण होईल.

अंकल सॅम; फक्त पोलिटिकल विल पाहिजे. डु यु स्टिल थिंक दे कॅनाट रिझॉल्व धिस इशु >> गरज कोणाला आहे नक्की व्हिसाधारकांची ह्याबाबत तुझा काही गोंधळ झाला आहे ?

नोप. गरज अमेरिकेला आहे असं भासवलं जातंय, परंतु मूळ प्रश्नाला हात घालण्याची कोणाचीहि तयारी नाहि. हे तुला अजुन समजलं नसेल (इंन्क्लुडिंग वरच्या कामेंटमधला सारकॅझम) तर धन्य आहेस...

अमेरिकेत टेक टॅलंटचा तुटवडा खरोखर आहे का, यावर भाष्य करणारा हा लेख वाच. यावरुन अमेरिकेची भूमिका एका बाजुला, आणि दुसरीकडे एचआर-१०४४ मागे उभी असलेली यंत्रणा, त्यामागचं राजकारण हे सुद्धा लक्षात घे. मग मला सांग, हा प्रश्न कोण, का आणि कसा सोडवु शकेल...

उबो, अ‍ॅज फार अ‍ॅज फ्रीडम ऑफ एंप्लॉयमेंट इज कंसर्न्ड (एच१/४), वी आर ऑन सेम पेज...

राज " एंप्लॉयर अ‍ॅगनास्टिक केला तर स्पॉन्सर कोण करणार ?" ह्या साध्या प्रश्नाचे उत्तर का देत नाहीस ? उपाय तू सुचवला आहेस म्हणून तुला विचारलय. मला सारकॅझम नक्कीच कळला नाही.

एकूण कठीण आहे.

अमेरिकेत कायमचे रहाण्यासाठी येण्याचे आता काहीच कारण नाही. नोकरीपुरते यावे, भारताशी घट्ट संबंध ठेवावे.
या देशाचे काही खरे नाही.
इतकी वर्षे इथे राहिल्यावर जाणवते की इथले जे जे काय पूर्वी चांगले वाटत होते, ते सर्व हळू हळू वाईट होत चालले आहे.

कस्काय नंद्या!
बरेच दिवसांनी दिसलात...प्रतिसाद बघून छान वाटले.. येत रहा.

मी जे भारतात पाहिले त्यावरून असे वाटते की भारतातील तरुण मुले भारतातच जास्त सुखी आहेत, तिथेहि त्यांना भरपूर शिकण्याची, इतर गोष्टी करण्याची संधि आहे, मग का बरे इकडे यायची नि कष्ट करायची इच्छा?
जेंव्हा अमेरिकन कंपन्या आपल्या नोकरांना इकडे तिकडे पाठवतात तेंव्हा त्यांचे कसलेहि प्रश्न सोडवण्यास तत्परतेने प्रयत्न करतात, असा बहुतेक सर्वांचा अनुभव आहे - भारतातील कंपन्या असे करत नाहीत का?

माझ्या माहितीप्रमाणे १९९० पर्यंत येणार्‍या लोकांचे ठीक होते - भारतापेक्षा कितितरी जास्त वाव होता इकडे स्वतःचा सर्वांगिण विकास, शिकायला बरेच खूप, अधिक पैसे वगैरे.
आता भारतातच सगळे मिळते आहे. शिवाय इथल्या सारखे स्वतःचे स्वतःला नाही करावे लागत, घरकामाला वगैरे मदत मिळते, मग वेळ वाचतो.

माझ्या मते आता अमेरिकेत फक्त प्रवासी म्हणून यावे, जमेल तितके दिवस रहावे. भारतात राहून पैसे खर्च होत नसतील तर इथे भरपूर वाव आहे जरा खिसा हलका करायला. फक्त डॉलर शॉप नि नार्शल मधे जाण्या ऐवजी जरा अमेरिकेतल्या लोकांना परवडणार नाही अश्या ठिकाणी जा.

Pages