मिशन मंगळ
२० ऑगस्टला इस्रोकडून आयोजित करण्यात आलेल्या 'अनलॉकिंग इंडियाज पोटेन्शिअल इन स्पेस सेक्टर' (Unlocking India's Potential in Space Sector) या वेबिनार मध्ये आम्ही भाग घेतला होता. इस्रोचे खाजगीकरण होणार आहे अशा चर्चा बऱ्याच काळ चालत होत्या परंतु तसे काहीच होणार नाही, पण खासगी कंपन्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं आणि त्यामुळे तंत्रज्ञान विकास आणि क्षमता विस्तार होऊ शकेल, असं इस्रो चेअरमन के सिवन म्हणाले. खासगी कंपन्या इस्रोसोबत अंतराळ मोहिमांत भाग घेतील परंतु मुख्य काम इस्रो आणि त्याचे वैज्ञानिकच करतील असं ही ते म्हणाले.
इस्रो आता सध्या रॉकेट आणि सॅटेलाईट बनवण्यात सक्षम आहे. अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं करण्याच्या त्यांनी केलेल्या घोषणे नंतर खासगी कंपन्याही अशी साधनं बनवण्यात मदत करतील. त्यामुळे जास्तीत जास्त सॅटेलाईट अवकाशात सोडता येतील, असंही के. सिवन यांनी म्हटलं. खासगी क्षेत्राला अंतराळात रॉकेट, उपग्रह निर्माण आणि प्रक्षेपण सेवा देण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. अमेरिका आणि युरोप मधील काही देशांमध्ये खासगी कंपन्यांचा सहभाग पूर्वीपासून आहे.
हे सांगायचं कारण म्हणजे मी आणि ऋषि अशी खाजगी कंपनी स्थापन करत आहोत, KRARERISS.
कृष्णा, राधा, ऋषि, एविता, रमा (आमची मुलगी) इशान, इरा, इप्सित यांच्यातली अध्याक्षरे आणि पुढचे दोन एस एस म्हणजे स्पेस सिस्टीम.
माझ्या "पायातली साखळी" या कथेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात याबद्दल मी तुमची शतशः आभारी राहीन. माबोवर मी अगदी नवखी आहे. तुम्ही सगळे वरिष्ठ आहात त्यामुळे माझा लेख वाचून काहींना खटकले असेल तर सॉरी, मनापासून सॉरी. ज्यांना आवडला त्यांचे शतशः धन्यवाद, थँक्यू, आभार.
मला, म्हणजे आम्हाला तुमचे आशिर्वाद हवे आहेत. आम्ही या क्षेत्रात उतरत आहोत कारण आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला हातभार लावावा आणि देशाची, या मातीची सेवा घडावी या उद्देशाने. त्यासाठी तुमच्या शुभेच्छा ऊर्जा देतील, बळ देतील.
माझ्या काही मित्र मैत्रिणी अमेरिकेतील नासा साठी अशी कामे करतात, त्यांनीही मदत करण्याची उत्सुकता दाखवली आहे.
एक गोष्ट नमूद करते. तुमच्यामुळे माझं मराठी खूप सुधारलं. लेखनाला एक खोली आणि झळाळी प्राप्त झाली असं वाटतं. धन्यवाद.
मी आता काही महिने लिखाण करू शकणार नाही त्यामुळे तुमचा निरोप घेत आहे. परत नक्की भेटेन.
बाय बाय,
तुमची लाडकी आणि दोडकी!!!
एविता.
एविता, तुला भावी project साठी
एविता, तुला भावी project साठी भरभरून शुभेच्छा. तुझा आणि तुझ्या कथांचा विरह सहन करावा लागेल आता. आवडत्या लेखनाने मायबोलीवरून exit किंवा pause घेतला तर खूपच हुरहूर वाटते गं. तुझा माबो परिवार तुझी आतुरतेने वाट पाहतोय, नव्या अनुभवांसकट, पुन्हा एकदा नव्या वाटचालीसाठी शुभकामना !!
शुभेच्छा तुमच्या पुढील
शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी...........तुझे लिखान मिस्स करेल ....खुप मोठा ब्रेक नको घेऊस
हार्दिक अभिनंदन .
हार्दिक अभिनंदन .
अरे वा !! अभिनंदन आणि
अरे वा !! अभिनंदन आणि शुभेच्छा !
लवकरच या नवीन अनुभवांसह पुन्हा लिखाण करा , वाट बघतो
अनेक आशिर्वाद आणि आभार पण!
अनेक आशिर्वाद आणि आभार पण! यशस्वी भव!
एविताताई पुढील वाटचालीस खूप
एविताताई पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
तुमचे लिखाण खूप छान आहे. वेळ मिळाला तर लिहित रहा. मायबोलीवर हा माझा पहिलाच प्रतिसाद आहे.
तुमचे अभिनंदन आणी शुभेच्छा !!
तुमचे अभिनंदन आणी शुभेच्छा !! तुमचे नर्मविनोदी लिखाण आम्ही नक्कीच मिस करू.
अभिनंदन आणि शुभेच्छा ....
अभिनंदन आणि शुभेच्छा ....
रिय एविता,
गेले काही महिने तुझ्या लेखांमुळे तु मला खुप निखळ आनंद दिला आहेस.
माबो वरती गेले काही महिने कोरोना, सुशांतसिंग, मोदी, ठाकरे ई ई विषयांवरचे धागेच दिसत होते. आणि त्यात एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप हे आणि एवढेच...असो...( गणेशोत्सवाचे १० दिवसाचा अपवाद वगळता )
खुप कमी लेखक आहेत ज्यांचे नाव माबोवर झळकले की लगेच वाचावेसे वाटते आणि त्यातुन कधीच अपेक्षाभंग होत नाही. केवळ आणि केवळ पॉझिटीव्ह वाईब्स च मिळतात.
तु माझ्यासाठी त्यापैकी एक आहेस...( मनीमोहोर , अर्निका, दाद, जागु, कुलु ही अजुन काही माझी आवडती नावे...पण बरेच दिवसात त्यांचे पण लिखाण वाचायला मिळाले नाहिये ...लवकर या रे सगळेजण परत...:-) )
तुम्हा सगळ्यांच्या नवीन उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा....
तुझ्या नवीन कंपनी मुळे तु खुप बिझी असशील मान्य आहे. पण तरी विनंती आहे की खुप मोठा ब्रेक घेउ नकोस..लवकर परत ये..
तु, ऋषि, तुझे सासु सासरे यांच्यातले अजुन छान छान किस्से येउदेत...तुझे नवीन कंपनीचे अनुभव येउदेत...
keep in touch...:-)
- तुझी मनापासुन चाहती,
स्मिता श्रीपाद>>>>>
संपूर्ण पोस्टसाठी मम् >>>> मी पण मम !!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे वा !! अभिनंदन आणि पुढील
अरे वा !! अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
<<<<माझ्या "पायातली साखळी" या
<<<<माझ्या "पायातली साखळी" या कथेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात याबद्दल मी तुमची शतशः आभारी राहीन. माबोवर मी अगदी नवखी आहे. तुम्ही सगळे वरिष्ठ आहात त्यामुळे माझा लेख वाचून काहींना खटकले असेल तर सॉरी, मनापासून सॉरी. ज्यांना आवडला त्यांचे शतशः धन्यवाद, थँक्यू, आभार.>>
ज्यांना तुम्ही सॉरी म्हणालात त्यांच्या शुभेच्छा आल्याचं दिसत नाही. सॉरी म्हणालात तरीही!
यातच त्यांची कोती मनोवृत्ती दिसून येते. माबो वरील काही महिला अशाच वृत्तीने पछाडलेल्या आहेत आणि त्यांचेच साम्राज्य इथे पसरलेले आहे.
इथले पुरुष मात्र असे नाहीत. त्यांना स्त्री दाक्षिण्य कळते. बायकांना पुरुष दाक्षिण्याचा मागमूस नाही. रिया चक्रवर्ती प्रमाणे Roses are red, violets are blue, let us end patriarchy me and you असे त्यांचेही मत आहे. असो.
तुमचे हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा. तुमच्या नव्या योजनांची भरभराट नक्कीच होईल यात शंकाच नाही.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
मनापासून अभिनंदन आणि
मनापासून अभिनंदन आणि भविष्यातील पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी खूप शुभेच्छा .
Pages