Submitted by तो मी नव्हेच on 4 September, 2020 - 10:48
अशी झाली तिन्हीसांज
आली निळाई दाटून
क्षितिजाने बांधियले
लाल केशरी तोरण
पक्षी फिरती माघारी
मनी घरट्याची आस
वात लावूनिया दारी
घर बघते वाटेस
हळूहळू ती निळाई
सरे क्षितिजाकडेला
शांत रात मोहवते
तप्त धरणी तनूला
गळा किन किन वाजे
घंटा गोठ्यात गुरांच्या
येई भाकरीचा वास
दारी प्रत्येक घराच्या
साऱ्या आसमंती दाटे
मंद पिठूर चांदणं
माझं गाव दमलेलं
घेते समाधानी झोप
-रोहन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कविता.. संध्याकाळचे वर्णन
छान कविता.. संध्याकाळचे वर्णन सुंदर..
धन्यवाद रूपाली जी
धन्यवाद रूपाली जी