Submitted by 'स्वच्छंदी on 3 September, 2020 - 22:14
..तुला भेटल्यानंतर
- महेश मोरे (स्वच्छंदी)
आयुष्याचे गाणे झाले..तुला भेटल्यानंतर
हे जगणे सोन्याचे झाले..तुला भेटल्यानंतर
जे जे माझे होते ते ते..ते दोघांचे झाले
आणि तुझे ते माझे झाले..तुला भेटल्यानंतर
समोर आल्या नंतर अवचित जे ओठांचे व्हावे
ते ते या देहाचे झाले..तुला भेटल्यानंतर
बोलायाला बंदी होती तुला भेटण्याआधी
हसायचेही कोडे झाले..तुला भेटल्यानंतर
तुझ्या अदेवर दुनिया वेडी आहे माहित होते
मन माझेही वेडे झाले..तुला भेटल्यानंतर
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर, मी पण गझल शिकण्याचा
सर, मी पण गझल शिकण्याचा प्रयत्न करतो आहे ,
या गझलेत रदिफ म्हणजे तुला भेटल्यानंतर
मग काफिया कोणता आहे
सर खुप भारी गझल आहे
सर खुप भारी गझल आहे
छान.
छान.
तुझ्या अदेवर दुनिया वेडी आहे माहित होते
मन माझेही वेडे झाले..तुला भेटल्यानंतर
पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत.
-दिलीप बिरुटे