झब्बू- तुझी माझी जोडी जमली रे - (सेपिया - *)

Submitted by संयोजक on 31 August, 2020 - 10:43

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

आज ची रंग जोडी नेहमीपेक्षा वेगळी आहे. एक रंग (टोन) सेपिया हवा तर दुसरा रंग कुठलाहि चालेल.

https://en.wikipedia.org/wiki/Sepia_(color)

आजचा रंगांचा झब्बू शेवटचा झब्बू आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरु झब्बू

बदामी - भूतनाथ मंदिर
10009306_929108243768498_6820535923143762580_n (1).jpg

धन्यवाद हिरा.

विटकरी रंग येतो म्हणजे चिरेबंदी घराचा फोटो चालला असता.

खरं तर सेपिया हा रंगापेक्षा Tone/ छटा म्हणून जास्त गणला जातो.
त्याचं लाल, तपकिरी, विटकरी असं वर्णन करणं किंवा गृहीत धरणं तितकसं अचूक ठरणार नाही..
Black & White म्हणजे कृष्णधवल ही फोटोची जशी एक कॅटॅगरी समजली जाते ज्यात काळ्यापासून पांढऱ्यापर्यंत जाणाऱ्या करड्या रंगाच्या अनेक छटा असतात पण परिणाम एकजिनसी असतो...
तसंच सेपिया ही लाल ते तपकिरी (Reddish to Brown) याची छटा असते.
संपूर्ण रंगीत प्रकाशचित्राची कृष्णधवल प्रत जसा कुठलाही इतर रंग न दाखवत काळ्या पांढऱ्या करड्या रंगाच्या छटा (Tones) दाखवतात तसंच Sepia Tone मधे त्या छटा लालसर ते तपकिरी रंगाच्या Variation मधे दिसतात. परिणाम एकजिनसी असतो.
हा टोन आपल्याकडे काही दशकांपुर्वी प्रचलित होता म्हणून त्याला आता व्हिंटेज समजलं जातं.
म्हणूनच चित्रपटात जुना काळ किंवा फ्लॅशबॅक दाखवण्यासाठी कधीकधी सेपिया (कधी कृष्णधवल) टोनचा वापर केला जातो.

Pages