षण्णवतिः शब्द कथा - मिशनरी पोझिशन

Submitted by बिथोवन on 31 August, 2020 - 06:03

षण्णवतिः शब्द कथा - मिशनरी पोझिशन

"तुला अजून दहा वेळा करावे लागेल.”

"मी करू शकत नाही."

"मला काही ऐकायचं नाही."

“प्लीज समजून घे ना... मी खरंच थकलोय ”

"डार्लींग, आय नो, तू करू शकतोस."

"नॉट पॉसिबल."

"कर म्हणतेय ना.."

"अगं, पण मी थकलोय."

" थकलोय बिकलोय काही नाही. कर म्हणजे कर."

" अगं ऐकतर खरं?"

“ नो ऑर्गुमेंट. आतापर्यंत तू फक्त पालथं पडून केलंयस. उभं राहून करायचंय त्याचं काय? ”

"बापरे, शक्य नाही. आय एम टोटली बर्नट् आउट."

"टोटली नाही. तुझा चेहरा लाल झालाय म्हणजे बर्न आउट नाही. चल, डू इट."

"बर बाई, करतो. नाही केलं तर तू ऐकणार थोडीच आहेस…? "

……..

टीप- वरील संभाषण नेमकं काय आहे ते जाणून घ्यायचे असेल तर ते जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी झालेलं आहे. चार आठवडे आहेत आणि आठवड्याच्या सुरुवातीला तारखा आहेत ७/१४/२१/२८. बाय द वे, we should not judge a book by its cover, a person by his/her face and a story by its title.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप रे। त्या कविता वाचून मी माबोपासून दूर पळाले होते.
नंतर स्वच्छ मायबोली बघून परत आले आणि ऐक्टिव झाले.

२१ जून.. योग दिवस.
'ती' त्याच्याकडून योगासनं करून घेते आहे.

धन्यवाद प्राची , मिशनरीचा योगा"योग" कळला.
बिथोवन चांगले लिहिले आहे .

हो ना.
योगा दिवस होता नाही का 21 जून.

मिशनरी वाचून मोठ्या अपेक्षेने लेख उघडला अडमीन डिलीट करण्याआधी काय आहे ते बघून घ्यावे म्हणून... ऐसा नई करने का भाई.. क्लिकबेट नहि लागानेका...

रच्याकने यानिमित्ताने पडलेला एक प्रश्न, मिशनरीचा मूळ अर्थ पाहता त्या शब्दाचा आणि या पोझिशनचा काही अर्थाअर्थी संबंध लागत नाही.. कुणाला या बद्दल अधिक माहिती आहे का?

अजिंक्य राव पाटील, तुमचा प्रश्न खरोखर लॉजिकल आहे. मिशनरी म्हणजे ख्रिस्ती धर्माचा प्रचारक. तो ज्या उत्साहाने धर्माचा प्रसार करतो त्याला मिशनरी झिल असेही म्हणतात. त्याचं उत्साहाने पुढील योगासने करता यावीत म्हणून याला मिशनरी पोझिशन म्हंटले असावे. शिवाय हे मेल डॉमीनेटेड आहे आणि पूर्वी मिशनरी बहुतेक मेल्स असायचे म्हणून ही असावे असं मला वाटतं.
आता मदर टेरेसा वरती पण पुस्तक आहेच की मिशनरी पोझिशन: थियरी अँड प्रॅक्टिस.
खरं म्हणजे वरच्या कथेत ज्या पद्धतीने ती त्याला कमांड करते ते वाचून कथेचं शीर्षक वुमन ऑन टॉप केलं तरी चालण्यासारखं आहे!

बाय द वे, तुम्ही उत्तराच्या जवळ गेला होतात. फक्त २१ जून ऐवजी २२ जून झाले!.

@ आनंदा. छान गेस केलंय. धन्यवाद.
@mrunali.samad थँक्यू फॉर रीडिंग.
@प्राची. ग्रेट!. तुम्ही बरोबर ओळखलंत. चाणाक्ष आणि हुशार आहात. धन्यवाद.
@मी अस्मिता मनःपूर्वक धन्यवाद.
@म्हाळसा धन्यवाद
@च्रप्स. सॉरी फ्रेंड. पण वाचल्याबद्दल धन्यवाद
@अजिंक्यराव पाटील, तुमच्या प्रश्नाचे उत्तर एवीता यांनी दिलेले आहे.
@एविता. धन्यवाद. अगदी खरे आहे. आता ही कथा योगा डे दिवशीची आहे हे प्राची मॅडमनी ओळखलं. वुमन अगेन! आज बायका खरंच टॉप वरतीच आहेत. नो डाऊट! तुम्ही सांगितल्या प्रमाणे टायटल बदलतो.