पाककृती स्पर्धा -3 (फास्टफूड स्पर्धा) – लसंगा/लसानिया ----ओजस

Submitted by ओजस on 30 August, 2020 - 05:23

यंदा गणपती स्पर्धा जाहीर झाल्यापासून आपणही भाग घ्यावा असे वाटत होते. घरच्या गणपतींचे विसर्जन झाल्यावर, गोड गोड खाऊन झाल्यावर लेकाची फर्माईश आली आई लसंगा बनव. मग काय स्पर्धेचे औचित्य साधून घेतला लसंगा करायला. यासाठी लागणारा पिझ्झा सॉस व व्हाइट सॉस पण मी बनवून घेतला. तर क्रमवार कृती खालील प्रमाणे.

पिझ्झा सॉस साहित्य – ४ मध्यम आकाराचे टोमॅटो, १ कांदा , ७-८ लसून पाकळया , १/२ टी.स्पून मिरीपावडर , १/२ टी.स्पून मिक्स हर्ब्स , तेल , २ चमचे टोमॅटो सॉस,१ टी.स्पून तिखट ,चवीपुरते मीठ

व्हाइट सॉस साहित्य- २ चमचे मैदा ,१ चमचा बटर ,(मी घरचे लोणी वापरले ) १/२ टी.स्पून साखर , १/२ टी.स्पून मिक्स हर्ब्स ,चवीपुरते मीठ,पाणी .

लसंगा मधील भाज्या –सिमला मिरची ,कोबी ,फ्लावर,वाफवलेले मकयाचे दाणे ,बटाटा प्रत्येकी १/२ वाटी बारीक चिरून ,१ वाटी बारीक चिरलेला कांदा, ७-८ लसून पाकळया,१/२ इंच आले,२-३ हिरव्या मिरच्या, मिक्स हर्ब्स , तेल ,चवीपुरते मीठ आणि चीझ (कोणतेही चालेल, मी अमूलचे घेतले. )WhatsApp Image 2020-08-29 at 9.09.13 PM.jpegWhatsApp Image 2020-08-29 at 9.09.27 PM (2).jpeg पास्ता / लसंगा शीट साहित्य- दीड वाटी/कप मैदा, तेल, चवीपुरते मीठ,पाणी .

आता कृती –

पिझ्झा सॉस:- २ टोमॅटो उकडून मिक्सरमधून काढले. २ टोमॅटो व कांदा बारीक चिरून घेतले. कढ़ईमध्ये
तेल गरम झाल्यावर ठेचलेला लसूण , कांदा घालून परतले, मग टोमॅटो टाकून झाकण ठेवून शिजवले. मग त्याला रगडले. त्यात मिक्स हर्ब्स, मिरीपावडर, टोमॅटो सॉस, तिखट व चवीपुरते मीठ घातले WhatsApp Image 2020-08-29 at 9.09.17 PM.jpegWhatsApp Image 2020-08-29 at 9.09.25 PM.jpegव्हाइट सॉस:- यासाठी मैद्याची पाण्यात पेस्ट बनवली. कढ़ईत बटर घातले. त्यात थोड़े पाणी घातले. त्यात मैद्याची पेस्ट घातली. सतत ढवळत राहवे म्हणजे गुठळया होत नाही. दाटसर झाल्यावर त्यात साखर, मिक्स हर्ब्स, चवीपुरते मीठ घातले. WhatsApp Image 2020-08-29 at 9.09.30 PM.jpegपास्ता शीट: – मैद्यामध्ये तेल, चवीपुरते मीठ घालून पीठ भिजवले.१० मिनिटे झाकून ठेवले। मग त्याचे ४ भाग बनवून पातळ पोळया लाटल्या. एका कापड़ावर टाकून १५-२० मिनिटे पंख्याखाली सुकवल्या. WhatsApp Image 2020-08-29 at 9.09.32 PM (1).jpegWhatsApp Image 2020-08-29 at 9.09.32 PM.jpegभाज्या :– फ्लावर, बटाटा, जरा अर्धवट वाफवून घेतला. कढ़ई मध्ये तेल गरम झाल्यावर ठेचलेला लसूण , आलेमिरची पेस्ट, कांदा घालून सोनेरी रंगावर परतले. त्यात सर्व भाज्या घालून जरा परतले. त्यात मिक्स हर्ब्स, मिरीपावडर, चवीपुरते मीठ घातले.
WhatsApp Image 2020-08-29 at 9.09.29 PM (1).jpeg

आता महत्वाची स्टेप लसंगा साठी लेयर करणे :-

आधी एका फ्रायपॉन मध्ये खाली तळाला तेल लावून घ्या. त्यावर थोड़ा पिझ्झा सॉस लावा.
WhatsApp Image 2020-08-29 at 9.09.27 PM.jpeg आता त्यावर एक पास्ता शीट ठेवा. यावर एक पातळ थर पिझ्झा सॉस आणि व्हाइट सॉसचा लावा. आता भाज्यांचा एक थर लावा.त्यावर चीझ कीसून टाका.
WhatsApp Image 2020-08-29 at 9.09.31 PM.jpeg परत आता त्यावर एक पास्ता शीट ठेवा.अनुक्रमे एक पातळ थर पिझ्झा सॉस आणि व्हाइट सॉस, भाज्यांचा एक थर, चीझ कीसून टाका। याप्रमाणे चारही थर लावून घ्या. WhatsApp Image 2020-08-30 at 2.37.43 PM.jpegवर तुम्हाला चालेल तेवढे चीझ कीसून टाका. मंद आचेवर १०-१५ मिनीटे शिजू द्या. लसंगा तय्यार. गरमागरम लसंगा पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस बरोबर खा.
WhatsApp Image 2020-08-30 at 2.39.18 PM.jpeg
तयार लसंगा

WhatsApp Image 2020-08-29 at 9.09.23 PM.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त दिसतंय
लझानिया ची डिटेल कृती पहिल्यांदा वाचली
एकदा करून बघणार.

मस्त दिसतेय..
मला फार आवडते हे.. घरी करणे शक्य् असेल तर बायकोला फॉर्वर्ड करतो हे

लझान्या एकदम भारी , आणि डिटेल पाककृती लिहील्याबद्दल खूप आभार. तुम्ही लझान्या शिट्स पण घरी बनवल्या... ग्रेट.

छान Happy