सॉफ्ट्स्किल्स नक्की कसे शिकायचे? मान्य आहे की अनुभवांनी जरुर काही प्रमाणात शिकता येतात. पण बालपणी आपल्या पाल्यांना शिकवता येतात का? मूळात आडात (पालक) नसतील तर पोहर्यात (पाल्य) येउ शकतील का? तुम्हाला काय वाटते तुम्ही सॉफ्ट स्किल्स्मध्ये कितीसे पारंगत आहात? तुम्ही कसे शिकलात?
यावेळचा परफॉर्मन्स रिव्ह्यु बंडल गेला. मॅन्युअल टेस्टर असल्यामुळे, माझ्या प्रोफेशनमध्ये सॉफ्ट स्किल्स तसेच अॅप्लिकेशनची पुरेपूर माहीती असणं या दोन बाबी फार महत्वाची कौशल्ये मानली जातात. पैकी डिफेक्ट सापडल्यानंतर स्क्रममध्ये कौशल्याने , जबाबदारीने मांडणे, कोणी नाकारल्यास, त्याबद्दल अधिक माहीती देउन उदाहरणार्थ - रिक्वायरमेन्ट नंबर/स्टोरी नंबर आदिकडे अंगुलीनिर्देश करुन तो डिफेक्ट 'इन स्कोप' कसा आहे ते पटवणे, हे सर्रास करावे लागते. बरेचदा प्रॉडक्ट ओनर्स स्टोरीज नीट लिहीत नाहीत त्या पुरेश्या स्पष्ट नसतात, म्हणजे ambiguous असतात पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मग स्टोरीज नीट अॅटॉमिक व स्पष्ट लिहीण्याची विनंती करणे आदि कामे करावी लागतात. यामध्ये सॉफ्ट स्किल्स नसतील तर त्रेधा तिरीपीट उडते किंवा मग परफॉर्मन्स रिव्युत दट्ट्या बसतो. फक्त तोंड बंद ठेउन इतरांच्या सोयीनी काम केलं की सगळं ऑल वेल असत. हे माहीत आहे पण जमत नाही.
कसे डेव्हलप करायचे हे स्किल्स? उदाहरणे देउन स्पष्ट करावे प्लीज. माझ्या टिममध्ये , क्लायंटशी ज्यांचा संबंध येतो त्या लोकांत ही कौशल्ये असतात असे आढळलेले आहे किंबहुना म्हणुनच ते त्या पदावर टिकू शकतात. यावेळेला पर्फॉर्मन्स रिव्युमुळे, मानसिक स्थिती बरीच विमनस्क झालेली आहे. स्वतःत दोषच दोष आढळत आहेत. ऑटोमेशन शिकायला सुरुवात केलेली आहे वगैरे अलाहिदा. हेही दिवस मागे पडतील पण कोणाशी तरी बोलावेसे वाटले, इतरांचे अनुभव जाणुन घ्यावेसे वाटले म्हणुन हा धागाप्रपंच.
काही उदाहरणे -
- उशीरा का होइना, एक शिकले की जर प्रोसेसमध्ये किंवा एखादी तृटी आढळली तर एकदम 'युरेका युरेका' करत तॄटी दाखवुन 'जितं मया' करायचे नाही. आधी त्यावरील सोल्युशन शोधुन , तॄटी व सोल्युशन दोन्ही सुचवायचे.
- अजुन एक शिकले ते म्हणजे प्रॉजेक्टचा भार आपल्याच शिरावर ठेवल्यागत, प्रॉजेक्टचा ठेका घेतल्यागत वागायचे नाही. थोडक्यात काही स्लॉपी गोष्टींकडे कानाडोळा करायचा. योग्य वेळेवर त्या सुधारणा होत असतात. आपण लक्षात आणून देउन उगाचच रोषास पात्र होतो. हे नको तिथे परफेक्शनिझम टाळायचं, परफेक्शनिझमचा रोख स्वतःवर वळवायचा. आपण सुधारायचं, प्रॉजेक्ट सुधारण्याकरता लोकं ठेवलेले असतात ज्यांना भरपूर मोबदला दिलेला असतो. लष्कराच्या भाकर्या आपण भाजायच्या नाहीत
सामो,
सामो,
असा विचार कर की ऑफर हातात आहे म्हणजे तुझा स्किलसेट त्यांना आवडलाय, फक्त पक्की तारीख ठरायची आहे. आता जे उद्या आणि परवाचे इंटरव्ह्यू आहेत ते 'माझा स्किलसेट चांगला आहे, एक ऑफर हातात आहे' या पॉझिटिव मूडमधे दे. कुणी सांगावे त्यांच्याकडून अजून छान ऑफर्स मिळतील. इतके दिवस धीराने घेतलेस आता स्वतःला मागे ओढू नकोस. ऑल द बेस्ट!
नक्की
नक्की
जॉब बदलणे हे अमेरिकन नोकरी
जॉब बदलणे हे अमेरिकन नोकरी व्यवसायात चांगले समजले जाते असं ऐकून आहे. म्हणजे उमेदवार आहे त्यात समाधानी न राहता नवीन कामात झोकून आव्हानं पेलायला तयार आहे वगैरे.
पलिकडे काय होतं असतं? त्याच कंपनीत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना एक संदेश मिळतो की आपल्या कामासाठी बाहेरून उमेदवार मिळवण्याची चाचपणी सुरू आहे. आपल्याला सुधारणा करायला हव्यात नैतर जाॉब सोडावा लागेल. तर त्यात थोडा वेळ जात असेल.
'आपण होउन' जॉब बदलणे हे
'आपण होउन' जॉब बदलणे हे अमेरिकन नोकरी व्यवसायात चांगले समजले जात असावे
एक्स्ट्रीम हॉपिंग & जंपिंग चांगले नाहीच पण जर ग्रोथ नसेल तर आहे तिथे चिकटणेही बरोबर नाही. ग्रोथच नसेल तर डच्चू मिळतो.
>>>>आपल्याला सुधारणा करायला हव्यात नैतर जाॉब सोडावा लागेल. तर त्यात थोडा वेळ जात असेल.
इट इस ऑलवेज गुड टु बी ऑन युअर टोज.
>>>>>>>> नवीन कामात झोकून आव्हानं पेलायला तयार आहे वगैरे.
फेक इट टिल यु मेक इट
All the best सामो. You will
All the best सामो. You will rock it.
Flower नही fire है तू.
.
डरणे का नै
किल्ली धन्यवाद.
किल्ली
धन्यवाद.
२ जॉब्सच्या ऑफर्स आहेत. एक
२ जॉब्सच्या ऑफर्स आहेत. एक व्हाईट प्लेन्स ला एक ऑल्बनीला. दोन्ही लांब आहेत. कमीत कमी अडीच तास बाय ट्रेन.
पण निदान आता धीर आलेला आहे. काहीतरी हालचाल आहे. जून २०२४ पासून गॅप पडलेली आहे.
.
ऑल्बनीला मात्र रविवारी रात्री जाऊन एखाद्या मॉटेलवर किंवा रुम घेउन सोम-मंगळ-बुध रहावे लागेल व बुधवारी रात्री घरी परत.
याउलट व्हाईट प्लेन्स ला अप-डाउन करता येइल.
बघू काय होतय ते.
माबोकर, ऑल्बनीत एखादी रुम शेअर असेल तर कळवा प्लीज.
Pages