पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे (स्टफ्ड ब्रेड मोदक) - Nilakshi

Submitted by निल्स_23 on 27 August, 2020 - 13:50

लॉक डाऊनच्या कृपेने जरा वेळ मिळतो नेहमीच्या रूटिनमधून तर ब्रेड बनवण्याचे प्रयोग सुरू असतात.
आणी मोदकांचे म्हणाल तर लग्नानंतरच उकडीचे मोदक खाल्लेत. आत्ता आत्ता कुठे थोडे जमतायं करायला.
तर जेव्हा ही स्पर्धा जाहीर झाली तेव्हा ब्रेड आणी मोदक असं काहीतरी फ्युजन करूया असा विचार केला आणी अर्थातच अमलात आणला. तर मायबोलीकर मंडळींसाठी सादर आहे स्टफ्ड ब्रेड मोदक.

IMG-20200827-WA0040.jpg

यासाठी सारण आणी ब्रेड दोन्ही बनवायचे आहे.

आधी सारण बघूया.

सगळे साहित्य बारीक चिरून घ्यायचे.
सहा सात लसुण पाकळ्या
अर्धा इंच आलं
एक मध्यम कांदा
शिमला मिरची - 1 मध्यम
पत्ताकोबी - अर्धा कप
बीन्स - पाव कप
गाजर- अर्धा कप
कांदापात-
कोथिंबीर
पनीर
मटार
खरं तर भाज्या आपल्या आवडीप्रमाणे आणी कमी जास्त प्रमाणात घेता येतील.

कढईत थोड्या तेलावर आलं, लसुण, कांदा परतायचा.
सगळ्या भाज्या टाकून परतायचे. एक चमचा सोया सॉस, एक चमचा चिली सॉस, मिरी पावडर आणी मीठ घालायचे.
मी झाकण न ठेवता 10/12 मिनीट परतले. फार शिजवायचे नाहीये.
IMG_20200827_164040.jpg

आता ब्रेड.

अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा साखर घालून ढवळले. त्यात एक चमचा इंस्टंट यीस्ट घालून दहा मिनीट ठेवले. यीस्ट चांगले फसफसायला पाहीजे.
दोन कप मैदा आणी एक कप कणिक घेतली. चवीनुसार मीठ, पाव कप तेल, थोडे ओरीगैनो आणी यीस्ट घातले. गरजेनुसार थोडे दुध आणी पाणी घालून अगदी सैल कणिक भिजवली आणी जवळपास वीस मिनीटे मळली.
नंतर एका भांड्यात हि कणिक ठेवून क्लिंज फॉईलने झाकून दोन तासांकरता ठेवून दिली.
दोन तासांनी कणिक जवळपास दुप्पट होते. पुन्हा थोडीशी मळून घेतली.
आता कणकेचा छोटा गोळा घेऊन, उकडीच्या मोदकांसारख्या कळ्या पाडून सारण भरले आणी मोदकांचा आकार दिला.
IMG_20200827_173026.jpg

ओव्हनच्या ट्रे ला तेल लावून मोदक ठेवलेत. दोन मोदकांच्या मध्ये थोडी जागा असु द्या.
मोदकांना वरनं ब्रशने दुध लावले.
ओव्हनमध्ये 180 डिग्रीला जवळपास पंचवीस ते तीस मिनीटं लागली.
मोदक ओव्हनच्या बाहेर काढल्यावर अमुल बटर आणी कोथिंबीर मिक्स करून मोदकांना लावले. नंतर दहा ते पंधरा मिनीटे मोदक ओल्या कापडाने झाकून ठेवलेत.
तर करून बघा आणी आवडलेत का ते सांगा.

IMG-20200827-WA0038.jpgIMG-20200827-WA0042.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच भारी , अवनमध्ये मोदकांचे तोंड ओपन अप होईल ही भिती आहे... पण करावे वाटतंय. पुष्कळ वेगवेगळ्या स्टफिंग्सना वाव आहे. खूपच छान.

फारच सॉलिड दिसतायत
एकदम नवी फ्रेश कल्पना
नक्की करून बघणार
सादरीकरण पण आवडलं.

मस्तंच .. स्टार्टर म्हणूनही मस्त लागतील

अमेझिंग क्रिएटिव्हिटी! झकास दिसतायत ब्रेड मोदक.
मला plating लाही 10 मार्क extra द्यावेसे वाटले.
तो छोटा क्युट गणपती, लाल जास्वंद आणि ब्रेड मोदक..मस्तच.

अरे कसली सही कल्पना Happy
फार सुरेख दिसताहेत ब्रेमो। ब्रेड मस्त लुसलुशीत दिसतोय अगदी।
लिहिलयस ही एकदम छान, मुख्य म्हणजे फार क्लिष्ट न करता लिहिलय
फोटो अप्रतिम सुंदर। सगळं प्रेझेंटेशन एक नंबर
कल्पना आणि प्रेझंटेशनमधे पहिला नंबर Happy मस्तच ग

Pages