*दंगल*
तो म्हणाला चल दंगल खेळू
मी ही मग हो म्हटलं
आमच्या दोघांमध्ये मग
एक धर्मयुद्ध च पेटलं
त्याने एक दगड उचलला माझ्या घरावर भिरकावला
मी पेट्रोल ची बाटली घेतली त्याचे घर जाळले
त्याला त्याचा धर्म प्यारा झाला
मला माझा धर्म प्यारा झाला
मी त्याच्या धर्माला ला वाईट म्हणायचो
तो माझ्या धर्माला वाईट म्हणायचं
धर्मा पेक्षा ही आता आम्हला धर्मवाद प्यारा होता
देवा पेक्षा ही आता आम्हला दैववाद प्यारा होता
लहानपणी आम्ही इंद्रधनु ला सप्तरंगात रंगवायचं
आता त्या रंगांची किळस येत होती
मग त्याने त्याचा रंग निवडला
मी माझा रंग निवडला
आता रंग त्याचा नी माझा अस्मिते चा प्रश्न बनला होता
काल परवा कोणी तरी शांततेचा पांढरा रंग आणला होता
हा कोणत्याच धर्मात बसेना म्हणून सगळ्यांनी मिळून त्याला च हाणला होता.
धर्मा साठी तो , मी आणि आम्ही सारेच आता निधर्मी बनलो होतो
माणुसकी चा धर्म आम्ही केव्हा च विसरलो होतो
आता आम्हाला एकमेकांची फक्त कत्तल करायची होती
एकमेकांच्या धर्माची एकमेकांवर भिस्त घालायची होती
अहिंसा वगैरे आता आम्ही केव्हाच विसरलो होतो
आता फक्त आम्ही धर्माचे ( निधर्माचे) सेवेकरी उरलो होतो
आता नको होती प्रज्ञा , आता नको होती करूणा
नको होते माणूसपण नको होती अहिंसा
आता आम्हाला फक्त दंगल हवी होती....
Anand Anil Kamble AK...