पुणे तिथे काय उणे

Submitted by संयोजक on 26 August, 2020 - 01:52

खाली दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील ठिकाणे ओळखा..

१ बाग आहे पण फुले नाहीत
२ वहात्या पाण्याचा थांबा
३ सांगायला दगड पण आहे गाव
४ थकल्या भागल्यांची वाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको
७ आडवी तिडवी वस्ती
८ लहान पाखरू ढेरी मोठी
९ फाॅरेनची गल्ली
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली
१२ मिठाई वाला हनुमान
१३ बेवडा ब्रीज
१४ पिडाकारी दैवताचा ओटा
१५ हार आहे तोही दगडाचा
१६ याचे थालीपीठ होत नाही
१७ नकार देणारी पेठ
१८ नमुनेदार वसाहत
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत
२० इथे बांगडीवाले आहेत का हो?
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली
२२ गिळंकृत करणारे मास्तर
२३ सगळे इथे ऐटीत
२४ सुगंधित नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय!

उत्तरे :
१ बाग आहे पण फुले नाहीत
तुळशीबाग, विश्रामबाग
२ वहात्या पाण्याचा थांबा
नळ स्टॉप
३ सांगायला दगड पण आहे गाव
खडकी
४ थकल्या भागल्यांची वाडी
विश्रांतवाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे
सहकार नगर
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको
शनिवारवाडा
७ आडवी तिडवी वस्ती
वाकडेवाडी
८ लहान पाखरू ढेरी मोठी
चिमण्या गणपती
९ फाॅरेनची गल्ली
हॉंगकॉंग लेन
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती
महात्मा सोसायटी
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली
धनकवडी
१२ मिठाई वाला हनुमान
जिलब्या मारूती
१३ बेवडा ब्रीज
दारूवाला पूल
१४ पिडाकारी दैवताचा ओटा
शनीपार
१५ हार आहे तोही दगडाचा
खडकमाळ
१६ याचे थालीपीठ होत नाही
भारती विद्यापीठ
१७ नकार देणारी पेठ
नाना पेठ
१८ नमुनेदार वसाहत
मॉडेल कॉलनी
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत
कांचनबाग
२० इथे बांगडीवाले आहेत का हो?
कासारवाडी
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली
घोरपडी
२२ गिळंकृत करणारे मास्तर
हडपसर
२३ सगळे इथे ऐटीत
हिंजवडी
२४ सुगंधित नगर
चंदन नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय!
मगरपट्टा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही. वर कुणीतरी बॅरिस्टर वाडी लिहिले आहे त्या अनुषंगाने उगीचच अंदाज.
पण ती वसाहत होती. 'वसाहत' आणि होती' हे लक्षात घेतले तर काही सुचू शकते.

संगम आणि फुगेवाडी आणि अप्पर नाहीये यात. शिवाय बऱ्याच साहित्यात कात्रजचा घाटदाखवला, आणि पौड फाट्यावर सोडलं, मस्तानी तलाव असतो. ( मी पुणेकर नाही.)

Pages