श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा- अदिती - अमृताक्षर

Submitted by अमृताक्षर on 24 August, 2020 - 23:47

हा माझा मायबोलीवरचा पहिला गणेश उत्सव.
बाहेर कोरोना मुले शांतता असली तरी मायबोलीवर एकदम उत्साही वातावरण आहे त्यामुळे खरचं मस्त वाटत आहे.
इतक्या नव नवीन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आभार.IMG_20200825_091410.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अक्षर!
ही आरती जुन्या आरती संग्रहात होती.

सुंदर अक्षर आणि नवीन आरती. भाद्रपद मासी होशी तू भोळा आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा | कपाळी लावूनी कस्तुरी टिळा तेणे तू दिसशी सुंदर सावळा || जय देव जय देव जय गणराजा सकल देवांआधी तू देव माझा || प्रदुषाचे दिवशी चंद्र शापिला समयी देवे मोठा आकांत केला | इंदू येऊनि चरणी लागला श्रीराम बहुत शाप दिधला || जय देव जय देव जय गणराजा सकल देवांआधी तू देव माझा || पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा नेत्र शीणले तुझी वाट पाहता | किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता मला बुद्धी देई तू गणनाथा || जय देव जय देव जय गणराजा सकल देवांआधी तू देव माझा ||