मायबोलीवरील संक्षेप

Submitted by गोगा on 24 August, 2020 - 10:27

मी मायबोलीवर नवीन आहे, त्यामुळे इथले बरेच संक्षेप अजिबात समजत नाहीत. त्यांचा खुलासा कोणी करू शकेल का? उदा.:
1. धन्स
2. बाफ
3. रच्याकने
4. विबासं
5. मावे (हे मायक्रोवेव्ह असावं असा अंदाज आहे)
अजून काही असतील तर तेही सांगा कृपया..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चु.भू.द्या.घ्या - चुकभूल द्यावी घ्यावी
पु.ले.शु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा

हे रच्याक मलाही जाणून घ्यायचे आहे.

धन्स: धन्यवाद
बाफ: बातमीफलक (notice board)
मावे बरोबर आहे

विपू- विचारपूस
हाकानाका - हाय काय नाय काय (असाच अर्थ असावा बहुतेक)

आन = आपला/ली नम्र
पूमाराना = पूर्वीची मायबोली राहिली नाही.

तु प्र म प हा प्र प हो. का का वे अ क, प ब वे स ना. छ्या! का का ल ठे मा?
=
तुमचा प्रतिसाद मध्ये पडला हा प्रतिसाद पहिले होता. का काढला वेळे अभावी कदाचित, पण बहुतेक वेळ सगळ्यांना ना(?)सतो. छ्या. का काढुन लगेच ठेवू माझा?

श्या! नाही लागत अर्थ.

ह्या धाग्याच्या निमित्तानं धन्स हा शब्द वापरणाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करून मी मा दो सं.

हो, हे झब्बू काय असतं, म्हणजे कशासंदर्भात वापरायचं हे पण कळू शकलं तर बरं होईल.. पत्त्यांचा झब्बू माहितेय, पण इथे देताना कसा द्यायचा, एकपानी का गड्डेरी का जपानी वगैरे बहुमोल माहिती मिळाली तर उत्तम.