किस्सा क्रमांक ४
आई, देव कुठे राहतो?
तरी मला मनिष नेहमी सांगतो, 'नील च्या प्रश्नांची realistic उत्तरे दे, चुकीची उत्तर देउ नको. वाटलं तर मोठा झाला की कळेल तुला असं समजून सांग.'
पण मी जास्त त्रास नको म्हणून , थातूरमातूर थुकपटटी करून वेळ मारून नेते. तर ती ही गोष्ट
नील : आई देवा चे घर कुठे आहे?
मी: स्वर्गात (promptly, answer in one word)
नील : स्वर्गात? ते कुठे आहे?
मी : (again promptly, answer in one word ) आकाशात
एक महिन्या ने विमान प्रवास -मुंबई कोल्हापूर (किंगफिशर चे छोटे flight कोल्हापूर करांनी भरलेले ) जसे विमान उडाले अणि ढग दिसू लागले नील सर्वांना ऐकू येईल अशा आवाजात म्हणाला राम, कृष्ण, शंकर, हनुमान कोणी च दिसत नाही. तू म्हणतेस ते आकाशात राहतात, असे कसे? ( कोल्हापूर कर पण शोधू लागले बिचारे आमच्या बरोबर देवाला.)
बर पण हार मानेल तर ती नीलची आई कसली. आता मी मात्र मनिषच ऐकायच ठरवले. मला कळलेली देवाची definition मी नीलला सांगू लागले. देव मानण्यावर आहे. देव आकाशात नाही तर माणसात भेटतो.
आपले डाॅकटर काका नाही का? आजार पणात आपल्याला मदत करतात, ते देव.
तुला भूक लागलीये आहे हे लक्षात घेऊन गरमागरम भात देणारी आजी पण देव.
आपल्याला मदत करणारे पोलीस, ज्ञान देणारे शिक्षक , तुला सांभाळणारी व मला घर कामात मदत करणारी मावशी, सगळे देवा चे अवतार.
पटलं माझ्या सोन्याला.
तेव्हां पासून मी आणि नील रोज माणसातला देव शोधतो आणि विश्वास ठेवा आम्हाला तो सापडतो सुद्धा. तुम्हाला ही माणसातला देव भेटो ही त्या ईश्वर चरणी प्रार्थना . . .
किस्सा क्रमांक 1
http://www.maayboli.com/node/58891
किस्सा क्रमांक 2
https://www.maayboli.com/node/58921
किस्सा क्रमांक ३
https://www.maayboli.com/node/76102
भारीच चौकस आहे हो लेक. सो
भारीच चौकस आहे हो लेक. सो क्युट
छान
छान किस्सा आहे
हा चौकसपणा मोठे होता होता आपण कुठे हरवून बसतो हे कळत नाही.
आमच्याकडेही जेव्हा मुलगी आईला देव दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा पवित्रा घेते तेव्हा मी पटकन बोलतो देव हा असा त्या चित्रात मुर्तीत दाखवतो तसा नसतोच मुळी.... बस्स मग पुढचे माणसात बघावा वगैरे डायलॉग मारायच्या आधी माझे तोंड दाबून मला बुक्क्यांचा मार मिळतो कारण मी ठरलो नास्तिक आणि पोरांनाही हा नास्तिक ब्नवेल अशी घरच्यांना भिती वाटते
छान किस्सा
छान किस्सा