किस्सा क्रमांक ३
Embarrassing moments
एक दिवस शेजारच्या आजी सांगत आल्या, "अग ऐकल का काय म्हणतोय तुझा लेक? "
मला वाटलं चिरंजीव आमच्या घरातील काही खाजगी गोष्ट बोलून गेले की काय आजी जवळ? पण मग मनात आल काही विशेष घडलच नाही तर हा बोलला तरी काय? माझ विचार चक्र चालू झाले.
तर त्या दिवशी झाले अस की नीलला घेऊन मी संध्याकाळी घरी आले. नील जरासा कंटाळला होता. टीव्ही बघण्याचा तो तसा शौकीन नाही. त्याला सारखी माणस लागतात आजूबाजूला. मी स्वयंपाक घरात बिझी होते. त्याने दार उघडून बघितले तर शेजारच्या आजी दारातच उभ्या होत्या. आमचा उंदीर शिरला त्यांच्या घरी. त्या दिवशी आजी एकट्याच घरी होत्या. मुलगा सून नातवंड बाहेर गेली होती. मग काय नीलने घराचा ताबा घेतला.
आजींवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. कोण कुठे बसत? कोणाच कपाट कोणत? भिंतीवर कोणते देव आहेत? वगैरे वगैरे. ..
तेवढ्यात त्याच लक्ष जवळच असलेल्या आजोबांच्या तसबीरकडे गेले. मग त्यांची विचारपूस सुरू झाली. हा फोटो कोणाचा? फोटोला फुल का वाहील आहेत? आजोबा कुठे आहेत?
आजीनं शक्य तितका संयम ठेवून आजोबा देवाघरी गेले अशी माहिती चिरंजीवांना दिली. आता पर्यंत आजीच घर, मावशीच घर नीलला माहीत होतं आणि तसचं काहीस देवाचे घर असावं असं त्या भाबड्या जीवाला वाटले व त्याने गुगली टाकला ......
"तुम्ही कधी जाणार देवाघरी?"
प्रश्न ऐकताच आजी मला सांगायला आल्या. मला कानकोंडेल्या सारख झाल. मी आजींची माफी मागितली पण माझा चेहरा पांढरा पडला होता आणि मनात आजींना कित्ती वाइट वाटले असेल ह्याचा विचार चालू होता. आजींना ह्याची कल्पना आली असावी.
पोराच्या निरागसतेची गंमत वाटली आणि म्हणून तुला कौतुकाने सांगायला आले. मला अजिबात राग आला नाही. तु पण वाईट वाटून घेऊ नकोस. आजींचे ते शब्द ऐकून खूप धीर आला.
नील वर प्रेम करणार्या व त्याच्या निरागस पणावर खळखळून दाद देणार्या समस्त आजी आजोबांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. . . .
किस्सा क्रमांक 1
http://www.maayboli.com/node/58891
किस्सा क्रमांक 2
https://www.maayboli.com/node/58921
मस्त किस्सा. आधीचेही दोन्ही
Dhanyawad
Dhanyawad
खूप छान किस्सा. वाचताना मजा
खूप छान किस्सा. वाचताना मजा येते. पण जो माणूस ती परिस्थिती अनुभवत असतो, त्याच्यावर काय ओढवते, इतर कुणी कल्पनाच करू शकत नाही.
मुलांची चौकस वृत्ती म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेचे द्योतक. पण त्या प्रश्नांना तोंड देताना आपली पुरेवाट होते. सतत अलर्ट राहावे लागते. या साऱ्यात आपण पण शिकत असतो, समृद्ध होत असतो.
आपल्या अनुभवांचा फायदा इतरांना व्हावा, या हेतूने मीही माझ्या पालकत्वाचे अनुभव शेअर करायला सुरुवात केली आहे -पालकत्वाचा काटेरी मुकुट या नावाने.