काय सांगू तुझ्या स्पर्शाचे

Submitted by भानुप्रिया on 24 August, 2020 - 04:09

काय सांगू तुझ्या स्पर्शाचे
हे कसले वणवे पेटलेले
गात्रांत जे गुंफलेले
अन् तनुवरी फुललेले

ही काय अशी मोहकता
जी गवसली तुझिया सवे
माझीच मला पटलेली
जणू ओळख ही नव्याने

होता स्पर्श तुझा,
हरपते भान सारे
क्षणात जग ही विरते
माझी न मी उरते

ग्रीष्मात इंद्रधनु ही
दिसते मला नव्याने
थवे अन् काजव्यांचे
चमकती उन्हाते

हा स्पर्श नसे सोवळा,
ही माया अद्भुत वेडी
तुझिया ठायी गुंतलेली
माझी, काया मंतरलेली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults