Submitted by संयोजक on 23 August, 2020 - 22:39
मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.
होऊन जाऊ दे तर ...
आजचा विषय-
३. नवरा ह्या प्राण्याची २१ संबोधने
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिसरा चौथीच्या मराठी
तिसरा चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकाच्या एका धड्यातल्या आजी यजमानांना 'इकडे' म्हणायच्या. यजमानांचे नाव शंकर होते म्हणुन शंकरपाळ्यांचा उल्लेख 'इकडचे पाळे' असा करायच्या.
हा हाहाहा, मस्त सही लिहीलय
हा हाहाहा, मस्त सही लिहीलय सगळ्यांनी,
मामे मग तू म्हणतेस तरी काय?
तुझी पण लिस्ट भारीच आहे,
म्हाळसा, इथे माबोवर तुझ्या अहोंना एक नाव मिळालय , म्हाळसाकांत
सगळ्यांच्याच आवडल्या.
मामे मग तू म्हणतेस तरी काय? -
मामे मग तू म्हणतेस तरी काय? -- मामा

मग चूक कुणाची का असेना माफी
मग चूक कुणाची का असेना माफी त्याने मागायची हे न सांगता चांगलेच कळलंय त्याला>>>>>> चांगले वळण लावलंयस.
नवीन नवीन असच असतं
नवीन नवीन असच असतं
११) निश्चयाचा महामेरु (माझं
११) निश्चयाचा महामेरु (माझं ऐकत नाही तेव्हा) >>
बेष्ट!
माझी एक रूममेट अशी निश्चयाचा महामेरू होती, अगदी हेकटपणाची बॉर्डर गाठायची. पण तिचा नवरा आणि ती अगदी 'मेड फॉर इच अदर' प्रकार.
तो सत्याग्रह, असहकार आंदोलन इ प्रकार करायचा. ती त्याला "महात्मा" म्हणताना ऐकले आहे!!
जगप्रसिद्ध "बेंबट्या" आलंय का
जगप्रसिद्ध "बेंबट्या" आलंय का वर..?
अगदीच लक्ष देत नसेल तर
अगदीच लक्ष देत नसेल तर त्याच्या एक्स च्या नावाने
>>> यापेक्षा तुमच्या एक्स च्या नावाने हाक मारा - बघा कसा लगेच लक्ष देईल...
अगदी
अगदी।
(No subject)
माझी आत्या 'आमचे साहेब' असा
माझी आत्या 'आमचे साहेब' असा उल्लेख करायची नवऱ्याचा. तिचे मिस्टर पोलीस निरीक्षक वगैरे होते...
'हे' असंही म्हणतात काही बायका
Normal mode: नाव, ए, अरे, अहो
Normal mode: नाव, ए, अरे, अहो
मस्का mode : पतीदेव, परमेश्वर
१. अहो ऐकले का
१. अहो ऐकले का
२. इकडून (येणे झाले वगैरे)
३. बरं का
४. ए
५. बबड्या
६. येडं (मनातल्या मनात)
७. आडनावाने हाक
८. ध्यान (मनातल्या मनात)
९. सोंग (मनातल्या मनात)
१०. डॅडी
१२. नावाने हाक
१३. बाबा
१४. मालक
१५. धनी
१६. बटाट्या (बटाट्याचे पदार्थ खूप आवडतात म्हणून)
१७. गोळ्या (काऊच पॉटॅटोचे मराठीकरण)
१८. बंड्या (सिंघममधली सचिन खेडेकरच्या रिंगटोन तालात)
१९. पुणेकर
२०. खादाड खाऊ
२१. साहेब
यातले मी १२ वं नाव म्हणते बाकीचे काल्पनिक !
मी वापरते ती :
मी वापरते ती :
)
-- ए
-- अरे
-- "....." ( नवर्याच्या नावाने )
-- तू
-- अहो मेटलर्जीस्ट (आदराने! )
-- अहो इंजीनीअर ( साध्या हातोडा मारायच्या किंवा स्क्रू पिळायच्या कामाला मुद्दाम उशीर लावल्यावर मी ते काम करुन टाकल्यानंतर )
-- अहो पीयच्डी ( हिशोबा-ठिशोबाच्या कामात घोळ घातल्यानंतर )
-- अहो शनवार पेठ ( कानांविषयी स्पेशल काही बोलताना! .... समजलं असेलच!
आजूबाजूला कानावर पडणारी:
-- स्वीटी
-- हनी
-- हन ( हनीचा शॉर्ट फॉर्म )
-- स्वीट हार्ट
-- डार्लिंग
बाकी मग वर आलेल्या सगळ्या नावांना "मम"
प्यांटवालं नाही का म्हणत कोणी
प्यांटवालं नाही का म्हणत कोणी?
मी कधीकधी लिफ्टवाला सुद्धा
मी कधीकधी लिफ्टवाला सुद्धा म्हणते.. OTIS मध्ये आहे ना तो..
"ओटी"स मदत करत असेल.
"ओटी"स मदत करत असेल.
<<<मग चूक कुणाची का असेना
<<<मग चूक कुणाची का असेना माफी त्याने मागायची हे न सांगता चांगलेच कळलंय त्याला>>>>>> चांगले वळण लावलंयस.>>> देवकी ताई मी सवय नाही लावली त्याला, त्याची त्यानेच लावून घेतलीये ☺️. तो बोलतो, मी प्रचंड बडबडी (निदान त्याच्याशी करते, नाहीतर मम्मा मला माणुसघाणी म्हणते) त्यामुळे शांत बसलेली सहन होत नाही, मग त्याने माफी मागून मी खुलणार असेल तर काय हरकत आहे.
हो प्यांटवालं लिहायचं राहिलं
हो प्यांटवालं लिहायचं राहिलं होतं. ते लिहायला म्हणून फोन उघडला पण वर पेरूनी लिहिलेलं दिसलं.
मानव मदत करतो करतो कधी कधी.
मानव मदत करतो करतो कधी कधी.
नवऱ्याला अनेक नावानी हाक
नवऱ्याला अनेक नावानी हाक मारते .
१. माऊ ( हे लग्न अगोदर ठेवलेले नाव १६ वारश्याने पण कायम आहे )
२. अति चिडले कि 'वैभव'
३. जाडया
४, जाडे काका
५ अजगर
६. बोका
७. नको तिथे मदतीला गेलयावर कर्ण
८ नको तिथे खरे बोलल्यावर हरीचंचद्र
९. बाबा (अरे/अहो )
१० वैभव बाळ ( मुदाम खवचट पाने, सासू अजूनही बाळ म्हणते )
११ गदाधारी भीम (सध्या WFH मुले हे पण पहायाला मिळते आहे)
१२ ए OCD अति नीट नेटके पण मुले
१३ नवरा
१४ अहो
छान लिहिले आहे सगळ्यांनी'
छान लिहिले आहे सगळ्यांनी'
मजेशीर वाटलं अगदी
नवर्याला सर्वांसमक्ष हाक
नवर्याला सर्वांसमक्ष हाक मारावयाचे शब्द आणि एकट्यात
वेगवेगळे असतात की खालील आपले सर्वसाधारण
बरे दिसावेत .....हसायला बंदी नाही
१)अहो
२) नवरा
३)नवरोजी
४)नवरोबा
५)मिशीवाले (रुबाबदार दिसतात मिशीमुळे अगदी
सेनाधिकारी)
६)श्रीयुत
७)राव
८).....चेबाबा
९) बाबा
१०)आजोबा
११)राया
१३) पतिदेव
१४) मिस्टर
१५)मिश्टर+अडनाव
१६) चहाप्रेमी
१७)गृहस्था
१८)रिजिड माणसा
१९)माणसा
२०)डाॅक्टर
२१)झोपाळू
पंखावाले.. फॅनचा आवाज येतो म्हणजे ते घरात आहेत असे समजले जायचे
आणि उखाण्यात भालचंद्रराव
What about आर्यपुत्र ?
What about
आर्यपुत्र ?
Pages