झब्बू- एक विसावा- नवरा या प्राण्याची २१ संबोधने

Submitted by संयोजक on 23 August, 2020 - 22:39

मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.

होऊन जाऊ दे तर ...
आजचा विषय-
३. नवरा ह्या प्राण्याची २१ संबोधने

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहस्रनाम घेतल्याशिवाय हा प्राणी सहसा प्रसन्न होत नाही. मात्र कुणाकुणाला ८३७व्या नामाला रिमोटवर ताबा मिळण्याची शक्यता असते.

सीमंतिनी, बरं झालं तुम्ही असं स्पष्ट लिहिलंय (स्मित) बाकी नवर्‍याला संबोधन करण्यासाठी व उल्लेख करण्यासाठी अनेक नावं आजवर योजिली आहेत. आणि इथे उपक्रम म्हणून लिहायचं असेल तर निंदाव्यंजक वगैरे असल्याची टोचणी लागायची नाही मनाला. Wink Wink Wink
बघूया आठवतात का.

नाय तर काय, २१ ने काय होणार. ती तर मी धडाधड लिहेल - श्रीमंत, पंत, धनी, कारभारी, राजे, अहो, हे, मिस्टर, बंडू/बबलीचे बाबा, आबा, यजमान व्यवसायानुरूप मास्तर, कोर्ट, साहेब, रावसाहेब, सर इ. शिवाय काही वाकप्रचार असायचे जसं 'चपला आहेत का बाहेर?' नव्यानुसार स्वीटू, बबू, ए नवरा, नवरोजी, इ....... ते सहस्रावर्तनासारखं असतंय बघा... यो साज्य समिध्भि यजति, सर्वं लभते स सर्वं लभते, यो मोदक सहस्रेण यजति, स वांछित फलं आप्नोति...

21 फक्त? स्थळ, काळ, मनस्थिती, परिस्थिती, प्रसंग, ऑडियन्स, लग्नाची वाढत जाणारी वर्ष या प्रमाणे 210 तरी वेगवेगळ्या नावांनी हाक मारली गेली आहे. Proud

Lol

१. खुंटीवरचं पागोटं
२. मुन्नी के पापा
३. इकडची स्वारी
४. अहो
५. प्राणनाथ
६. हब्बी डियर
७. अजि सुनते हो
८. ऐकलं का
९. गुंडुल्या पुंडुल्या
१०. अरे यार
११. येड्या
१२. आळशी प्राण्या
१३. वेंधळा कुठला
१४. चप्पडगंजू
१५. स्वीटहार्ट (हे जास्तकरून लग्नापूर्वी वापरतात. लग्नानंतर याची गरज संपते)
१६. आवं ( गावच्या भाषेत. ग्रामीण मराठी चित्रपटांमधून मिळवलेले ज्ञान)
१७. अरे नंदीबैला!
१८. मूर्खा बावळटा
१९. ओये (अमुकतमुक)!
२०. बबड्या
२१. ए!

डिस्क्लेमर : मी यातील एकही संबोधन वापरत नाही. ही संबोधने वापरण्यासाठी खुली आहेत. बिंधास वापरा पण आपापल्या जबाबदारीवर . यावरून संयमित चर्चा घडल्यास मी जबाबदार नाही. यातील काही संबोधने (शक्य तोवर) मनातल्या मनात वापरा आणि मग तोंडून बाहेर पडणार्‍या वाक्यात एक्स्ट्रा मध घोळवा - जास्त परिणाम साधेल.

मला नवऱयाला तशीही नावं ठेवायला आवडतात -
ही घ्या माझी लिस्ट - नवऱयाचं नाव प्रशांत
सासरच्यांसमोर - अहो,
कटकट,वटवट करतो तेव्हा -“प्रशांत तू कायको इतना परेशान”,
लाडाने - परशा
प्रेमाने - (इश्श्ं) बाळा, बेबी, बब्बुडी (ही लिस्ट फार मोठी आहे)
लेकींसाठी - डॅडा
मित्रपरिवारात - PK, मधलं नाव ही प ने च सुरू होत व आडनाव क ने म्हणून PPK(टाईट)
इतर - नवरोजी, नवरोपंत, नवरोबा, शेहेंशा-ए -नवरोजी , खंड्या,छत्रपती
पोळ्याच्या दिवशी - (नविन झूल साॅरी शर्ट घातल्यावर) नंदीबैल
दैनंदिन जीवनात - काय यार, ओए , अबे तेरी तो, अरे बाबा, मंदप्राणी

अरे मस्त लिहीतायेत सगळे Lol

आमचे मालक पण म्हणतात ना कुठे कुठे.

त्याआधी इथे आम्हाला सवय होती आमचे मालक म्हणजे घरमालक. लग्न होईपर्यंत भाड्याच्या घरात राहील्याने घरमालकांनाच मालक म्हणायचो आम्ही तिथे रहाणारे सर्वच जण .

चाळीतले काहीजण नव-याला सरळ आडनावाने हाक मारायचे, काहीजण अमक्याचे पप्पा किंवा बाबा. माझी आई अहोच म्हणायची, अजुनही अहोच म्हणते.

लाडाने डार्लिंग पण म्हणतात काहीजण, तेव्हा मला लहानपणी रेडीओवर लागायचं ते डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस हे आठवतं. एक स्वीटू नाव फेमस आहे सध्या.

मी सरळ पुर्ण नाव घेते सदानंद आणि सर्वांसमोरच अरे तुरे करते, पुर्वी सासरी गावी गेले की अहो म्हणायचे पण ते नंतर सोडून दिलं.

नावाने - रोहित, रोहितराव, रोहित शेठ
अहो
अरे ए
इकडून
धनी
बहिऱ्या
.... चे बाबा
स्वारी
नवरोबा
डोळे वटारून
अडनावाने
हिज हायनेस
लाडके जावईबापू
रामू - हे त्याने स्वतः घेतलय
ड्रायव्हर- गाडी निकालो
अगदीच लक्ष देत नसेल तर त्याच्या एक्स च्या नावाने
नावाच्या शॉर्टफॉर्म ने - रो, रोज

सीरियस नावे इतकीच सापडली
१) नवरा २) वर३) पती ४)यजमान५) नाथ ६) कांत ७) स्वामी
८) दादला ९) मालक १०) धनी ११) कारभारी१२) घोव १३) हे १४) अहो १५) इकडे १६) इकडची स्वारी १७) स्वतः: १८) घरधनी
१९) मिस्टर (मिश्टर)
राया, रमण ही थोडी वेगळी संबोधने.आजकाल हबी , darling वगैरे
बाकी विनोदी,प्रतिभेला चालना देणारी आणि लेजेंडरी अशी बरीच आहेत. बरं अर्ध किंवा बरा अर्धा, आमचं सोंग, आमचं ध्यान इ. वर अनेकांनी लिहिलीच आहेत.

माझ्या बाबांच्या मामी यजमानांना "स्वतः" असे संबोधायच्या.
"आता येतीलच स्वतः.
स्वतःला शेपू खूप आवडतो बरं का
तू जेवून घे, मी स्वतः जेवले की जेवेन".

माझी एक मैत्रीण तिच्या नवऱ्याला 'ए नवरा' अशी हाक मारते.
एक मावशी आडनावाने.. म्हणजे 'अहो ---(इथे आडनाव)'

मी शिस्तीत त्यांना नावानेच हाक मारते, tone प्रसंगानुसार वेगळा असतो, tones आणि facial exoressions ची यादी द्या असा धागा आला तर १०८नक्कीच देऊ शकते.
Biggrin

सीरियस नावे इतकीच सापडली
१) नवरा २) वर३) पती ४)यजमान५) नाथ ६) कांत ७) स्वामी
८) दादला ९) मालक १०) धनी ११) कारभारी१२) घोव १३) हे १४) अहो १५) इकडे १६) इकडची स्वारी १७) स्वतः: १८) घरधनी
१९) मिस्टर (मिश्टर) >>

२०) भ्रतार २१) अर्धांग Lol मला लक्षात आले ते लिहीलेय.

1.ओ जी
2.अ जी
3.सुनो ना
4.येवंडी (तेलुगु-अहो)
5.मै क्या कह रही हु।
6.बहरे हो क्या (जेव्हा नवरा मोबाईल/लैपटॉप मधे घुसून बसलेला असतो तेव्हा)
7.समद- नावाने
8.समु
9.सम mad
10.पार्टनर
11 हसबंड
12.लग्नाच्या आधी अगदी माय प्रिन्स,माय डायमंड वगैरे, आता नाही. Happy
13.ओ मिस्टर
14.सर जी
15.ओ बौस
16.राजा हरिश्चंद्राचे अवतार(अतिच खरं वागतो नवरा म्हणून) Proud
इतकेच आहेत.

ही पर्सनलाइज्ड यादी Proud

ए नवर्‍या
ऐक ना
ओये...
शुक्क
फुस्स (नागिण स्टाईल)
ओए केमिस्ट्री (नवरा केमिस्ट्री पीएचडी आहे)
अ ते ज्ञ पैकी कोणत्याही अक्षराने लिहून दाखवता न येणारा एक आवाज (हा मी त्याच्याकडूनच शिकले.)
आदित्य के बापू ऽऽ
(२१ वजा ८) इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या शिट्ट्या

आमचे लग्न अजून तसे नवीनच आहे, आताशी सहा महिने झाले म्हणून कदाचित जास्त सुचत नाहीये. त्याच्या नावाची जितकी वाट लागू शकते ती लावते, कधीतरी नवरोबा, हब्बी बोलते बास. रागाने काहीच बोलत नाही जरा जास्त शांत झाले की कळते त्याला की हिचे काहीतरी बिनसलेय. मग चूक कुणाची का असेना माफी त्याने मागायची हे न सांगता चांगलेच कळलंय त्याला

मस्त यादी! मजा आली वाचायला...
माणसा, माणूस एवढीच वेगळी भर ... आणि वेगळं सांगायला नको अशी हाक केव्हा हाक मारल्या जात असेल...
माझी एक वहिनी मारते आडनावाने हाक!

त्याला आहे ब्लूटूथ स्पीकर्सचं आणि जनरली सगळ्याच डिवायसेसचं वेड. त्यामुळे ‘नीलदंत महाराज’ असं त्याचं बारसं झालेलं आहे.
बाकी काय, आधी सासरच्यांसमोर नाव घेतलेलं आवडायचं नाही (सासूबाईंना) म्हणून, सुनो ना सुनो ना, सुन लो ना…
मग लेक आल्यावर सरळ ‘बाबा’ म्हणायला सुरुवात.
कधी कधी त्यानं आपली चूक कबूल न केल्यास (नेहेमीच), तुम्ही तर काय ब्वा ‘पुरुषोत्तम’!
आणि खूपच प्रेमात आल्यावर (क्वचित) जे तोंडात येईल ते .. राजा, बुबु, वगैरे..

१) नको नको
२) परोपकारी गंपू
३) मि. भिडे (भिडस्त)
४) ते मी बघतो (हे सरसकटपणे म्हणते)
५) ते मी करतो (हेही एका दमात म्हणते)
६) बघतो आणि बघून सांगतो
७) अहो
८) धनी
९) नाथ
१०) घुमेश
११) निश्चयाचा महामेरु (माझं ऐकत नाही तेव्हा)
१२) बहुतजनांसि आधारु (घरच्यांना जरा जास्तच मदत करणे)
१३) विषय संपला (एकतर्फी निर्णय घेतला तर हा माझ्या तोंडावर फेकायला डायलॉग असतो)
१४) घाई (सगळ्या गोष्टी पटपट करण्यात उत्साह, जो मला हतोत्साहित करतो)
१५) अच्छावाला बेटा
१६) मि. देखणेश (जर गुणी नवर्‍यासारखे वागणे असेल)
१७) मि. गोलू (जुनं आहे. आता मीही त्याच कॅटेगरीतली त्यामुळे जपूनच किंवा स्वर मधाळ वगैरे असण्याची खात्री)
१८) द आणि पुढे आडनाव खास जोर देऊन. (परिवारातील गुणवैशिष्ट्ये नमूद करण्यासाठी सोपा मार्ग)
१९) खोडरबर
२०) घोरासुर
२१) बिझी बी
सध्या एवढेच आठवत आहेत. प्रसंगानुरूप भर पडतेच.

Pages