- माझ्या लेखणीतून

Submitted by Santosh zond on 23 August, 2020 - 20:38

पाय असावे जमीनीवरती, कवेत अंबर घेतांना
हसु असावे ओठांवरती, काळीज काढुन देतांना
कवींनी त्यांच्या आयुष्याला द्यावे उत्तर या प्रेरणादायी कवीतेमधुन आयुष्य कस जगायल हव ते खुप सुंदर पणे सांगितलेल आहे
“पाय असावे जमीनीवरती, कवेत अंबर घेतांना ”
लेखक म्हणतात जरी तुम्ही शिकुन सवरुन खूप मोठे झालात,श्रीमंत झालात तरी आपल्या माणसांना कधीच विसरु नका ज्यांनी तुम्हाला नेहमी मदत केली त्यांच्याविषयी नेहमीच कृतद्य रहा शेवटी गरुडाची झेप कितीही उंच असली तरी त्याला पण खाली यावच लागत, उंच डोंगर चढायला सुद्धा तुम्हाला विनम्र व्हाव लागत झुकाव लागत तेव्हाच तुम्ही मोहीम फत्ते करु शकता...........
“हसु असावे ओठांवरती, काळीज काढुन देतांना ”
आयुष्यभर ज्याने जगाचे कडु बोल ऐकत सगळयांना जीवन कस जगाव,जगात दानाची, मैत्रीची,आणि जिद्दीने सतत जिंकण्याची परीभाषाच बदलून टाकली असा तो कर्ण स्वतःच्याच शोधात जन्मभर सूर्यासारखा जळत राहीलेला कर्ण आपल्याला कधी पुर्णपणे समजलाच नाही आणी आपण समजुन घ्यायचा कधी प्रयत्न पण केला नाही!
जगात अनेकांनी दान केलं असेल पण -
पण मरणाच्या दारातील एवढ चित्तथरारक दान,
तो एकटाच करू जाणत होता
असा तो कर्ण त्याने खरच कवींचे ते शब्द खरे करुन दाखवले आता वेळ आहे ती आपली ......
ओठांवरती हसु ठेवून आपल्याला नक्कीच काळीज तरी नाही काढुन द्याव लागणार पण तशी वेळ आलीच तर नक्की तुम्ही मागे येणार नाहीत पण आपण साधी आपली एखादी आवडीची वस्तु सुद्धा कुणाला द्यायला तयार नसतो तर जीवन तर खूपच दुरची गोष्ट आहे बघा जमलं तर....
शेवटी मला सगळयात जास्त आवडलेले शब्द
“करुण जावे असेही काही दुनियेतुनी या जातांना
गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देतांना ....”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या ओळी 'असे जगावे' ह्या कवी गुरु ठाकूर यांच्या कवितेतील आहेत. ही विंदांची कविता नव्हे.

हे वाचून पहा.
https://www.guruthakur.in/ayushyala-dyave-uttar/
https://www.guruthakur.in/gurus-poem-on-vinda-karandikars-name/