*
चेकलिस्टः
१) पाककृती स्वत: तयार केलेली असावी. : होय
२) नैवेद्याचे पदार्थ शाकाहारी असावेत. : होय
३) नैवेद्याच्या ताटातले पदार्थः
2 भाज्या: पालक मेथी पातळ भाजी , पंचकडधान्यांची उसळ
चटणी: कोथिंबीर, खोबरं, पुदीना
मेतकूट: ह्याचं प्रसादाच्या ताटात नक्की काय करतात माहीत नाही. त्यामुळे त्याऐवजी 'पंचामृत' केलं.
2 कोशिंबीरी:
काकडी टमॅटो आणि कोबी-गाजर
भात: वरण-भात आणि मसाले भात
पोळी/ पुरी: पोळी
तळणीचा पदार्थ: कोथिंबीरीची भजी
एखादे गोड पक्वान्न : बासुंदी
उकडीचे वा कोणत्याही प्रकारचे स्वत: केलेले मोदक: घरी केलेल खव्याचे मोदक
ह्या शिवाय : सुरळीच्या वड्या, खीर आणि पुरण केलं होतं.
४) नैवेद्याच्या पानात बाहेरून विकत आणलेला गोड ,तिखट,चटपटीत इत्यादींपैकी कोणताच पदार्थ नैवेद्यम च्या पानात नसावा. : होय
५) शक्यतो नैवेद्याचे पान हे केळीचे किंवा इतर पान असावे. : केळीचे पान
पदार्थांची माहिती:
१. पालक मेथीची पातळ भाजी : आळू आणि आंबट चुक्याची पातळ भाजी करतात त्या सारखीच पालक आणि मेथीची भाजी केली. दोन्ही भाज्या आणि डाळ, दाणे वाफवून घेतले. भाज्या एकत्र घोटून त्यात दही आणि डाळीच पीठ घातलं. फोडणीला घालून गुळ, मीठ आणि तिखट घातलं. मेथीच्या चवीप्रमाणे गुळ, तिखट घालावं.
२. पंचकडधान्यांची उसळ: मुग, मटकी, मसूर, छोले आणि चवळी धान्ये १:१ प्रमाणात घेऊन १ रात्र भिजत घालून, त्यांना मोड आणले. आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि जिरं ह्यांच वाटणा करून त्यात ही उसळ केली. चवीनुसार मिठ आणि चिमुटभर साखर घातली.
*
*
३. काकडी टमॅटो कोशिंबीरः नेहमीची कोशिंबीर
*
*
४. कोबी गाजर कोशिंबीर: कोबी आणि गाजर किसून त्याला वरून जिर्याची फोडणी घातली. ह्यात डाळींबाचे दाणेही घालायचे होते. पण ऐनवेळी डाळींब मिळालं नाही.
*
*
५. वरण-भात
६. मसाले भातः फ्लॉवर, मटार आणि तोंडली ह्या भाज्या आणि खडा मसाला भाजून घेऊन त्याची पावडर करून त्याचा इंस्टापॉट मध्ये मसाले भात केला. शिजवताना त्यात काजू घातले आणि खाताना खोबरं कोथिंबीर आणि तुप घेतलं.
*
*
*
७. चटणी: खोबरं, कोथिंबीर आणि पुदीना मिक्सरवर वाटून त्यात मिठ, लिंबू घालून चटणी केली.
८. पंचामृतः दाणे, सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, सिमला मिरच्या आणि तिळकुट अश्या पाच अमृतांमध्ये चिंच, गुळ घालून पंचामृत केलं. हे आम्ही पहिल्यांदाच केलं. आंबट, तिखट, गोड अश्या सगळ्या चवी मिळून एकदम चटकदार लागलं. एका पंचामृत एक्सपर्टांकडून हिरव्या मिरच्या घालण्याची टीप मिळाली होती, ती खूपच चांगली होती.
*
*
९. पोळी
१०. कोथिंबीरीची भजी: कोथिंबीर एकदम बारीक चिरून भज्यांच्या पिठात भिजवली. पिठाची कंसिस्टंन्सी नीट जमून आल्यावर हलकी आणि कोथिंबीरीच्या सुंदर स्वादाची भजी झाली.
१२. सुरळीच्या वड्या: ह्या ही पहिल्यांदाच केल्या. डाळीच पिठ, ताक आणि पाणी १:१:२ प्रमाणात एकत्र करून घ्यायचं. गुठळ्या पूर्ण मोडायच्या. त्यात मीठ, हळद, लाल तिखट घालून मंद गॅसवर ठेवायचं. उलतन्याने सतत हलवायचं. ते पटापट घट्ट व्हायला लागलं. उलतनं वर उचलल्यावर त्याला जीभ आली की (म्हणजे काय ते केल्यावरच कळतं!) स्टिलच्या ताटाच्या मागच्या बाजुला उलतन्याने भराभर पीठ फासायचं. वरून खाली फासायचं आणि जाड थर द्यायचा. खोवरं, कोथिंबीर, लिंबू ह्यांच मिश्रण त्यावर भुरभुरायचं. मोहरी, जिरं तीळ ह्यांची खमंग फोडणी द्यायची. सुरीने पट्ट्या पाडून वड्या वळायच्या. वरून पुन्हा थोडीशी फोडणी घालायची.
*
*
१३. बासुंदी: ८ कप फुल फॅट दुध. कंडेन्स्ड मिल्क, इव्हॅपोरेटेड मिल्क हे एकत्र करून इंस्टंट पॉटमध्ये बासुंदी केली. आधी सगळं मिश्रण 'सॉटे मोड' वर उकळून घेतलं आणि नंतर स्लो कुकींग मोड वर सुमार सहा तास ठेवलं. मधे मधे ढवळलं. चव बघून अगदी थोडी साखर घातली. बदामाचे काप, जायफळ आणि केशराच्या काड्या घातल्या.
१४. खव्याचे मोदकः यंदा उकडीचे मोदक आमचे एक शेजारी देणार होते. त्यामुळे नैवेद्यासाठी खव्याचे मोदक केले. खवा थोडा भाजून घेऊन त्यात साखर आणि वेलची पावडर घालून मोदक केले.
१५. नैवेद्याचं ताट होतं म्हणून खीर आणि पुरण केलं होतं. शास्त्र असतं ते!
इथे एका जपानी दुकानात केळीची पानं मिळाली. ती मोठ्या पानाची कापलेली होती. त्यातल्या त्यात चांगल्या आकाराची पानं वापरली. गेल्या काही दिवसांपासून एकदा थाळी बनवून बघायला हवी असा किडा वळवळत होता. मायबोलीच्या गणेशोत्सवाचं निमित्तं मिळालं. एकंदरीत आढावा घेता बरेच पदार्थ चांगले झाले. बासुंदी थोडी अजून दाट चालली असती आणि भजी अजून हलकी होऊ शकली असती. सुरळीच्या वड्या आणि पंचामृत हे सगळ्यात छान झालं होतं असं आम्हांला वाटलं. एकंदरीत आम्हांला सगळं करायला खूप मजा आली. यंदा गणपतीला कोणाचं येणं जाणं नसल्याने पुढचा आठवडाभर स्वंयपाक करायची गरज भासणार नाही.
तर आम्ही गणपतीला दाखवलेला हा नैवेद्य गणपतीबाप्पा गोड मानून घेईल अशी आशा आहे.
गणपती बाप्पा मोरया !!
(त.टी. काही काही फोटो ऑफ फोकस्ड आहेत की काय असं तुम्हांला वाटेल, पण ते तसं नसून इकडून तिकडून ब्लर करून 'कलात्मक' करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सुरेख आहे नैवेद्य. दंडवत .
सुरेख आहे नैवेद्य. दंडवत .
और ये लगा सिक्सर!
और ये लगा सिक्सर!
काय सुंदर आणि नीटनेटकं दिसतंय नैवेद्याचं पान!
अशक्य सुंदर दिसतंय पराग!
अशक्य सुंदर दिसतंय पराग!

पातळ भाजी, मसाले भात आणि तोंडी लावायला सुरळीची वडी आणि पंचामृत.. वर नारळाची चटणी!!! आत्ता बसुन खावंसं वाटतंय!
आणि फोटो मध्ये कलात्मकतेचा पार कडेलोट केलाय. कडधान्यांवर एकएक कढिलिंबाचं पान काय! क्लोजप धने आणि मिरी काय! मजा आहे
हे असं इवलुसं खीर पुरण वाढलेलं बघुन तर काळ लोटला! नॉस्टेल्जिआ नॉस्टेल्जिआ!!!
सुरेख दिसतय नैवेद्याचं पान.
सुरेख दिसतय नैवेद्याचं पान.
एव्हडी सगळी पूर्वतयारी , सुंदर स्वयंपाक, आणि तितकेच छान फोटोज पण, शिवाय लिहलंय पण छान !
उलतनं वर उचलल्यावर त्याला जीभ आली की (म्हणजे काय ते केल्यावरच कळतं!) >>> ह्याला जाम हसले. आता सु.व करून बघितल्या पाहिजेत.
इथे एका जपानी दुकानात केळीची पानं मिळाली.>> तुम्ही यु. एस मध्ये आहेत का? इथे इतकं साग्रसंगीत नैवेद्याचं पान म्हणजे खास कौतुक.
खूपच सुंदर. पदार्थ करणे, मधे
खूपच सुंदर. पदार्थ करणे, मधे इतके सुंदर फोटो काढणे आणि असे ताट सजवणे, तेही मण्यांच्या रांगोळीसकट. ग्रेट आहात!
बरं, पूर्वतयारी कशी केली होती तुम्ही सांगू शकाल का थोडे?
वाह!
वाह!
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.
जिन्नस नीट मांडून फोटो काढणं हेही एक मोठं कामच. >>> हो १५-२० मिनिटं त्यातच गेली.
फोटो मध्ये कलात्मकतेचा पार कडेलोट केलाय. >>>>
भारी !
तुम्ही यु. एस मध्ये आहेत का? इथे इतकं साग्रसंगीत नैवेद्याचं पान म्हणजे खास कौतुक. >>>> कॅनडात आहे. पहिल्यांदाच केलं. पुन्हा कधी करू माहीत नाही.
बरं, पूर्वतयारी कशी केली होती तुम्ही सांगू शकाल का थोडे? >>>> बासुंदीचं दुध आदल्या दिवशी आटवून ठेवलं होतं आणि कडधान्यांना मोड येण्यासाठी ती बांधून ठेवली होती. बाकी सगळं त्या दिवशी सकाळीच केलं. दोघांना मिळून ४ तास लागले.
मण्यांच्या रांगोळीसकट >>> मण्यांच्या रांगोळ्या तयारच होत्या. त्या नाही सकाळी केल्या.
भारी आहे ताट. इत्कं सगळं करुन
भारी आहे ताट. इत्कं सगळं करुन त्या जिन्नसांचे फोटो काढणं सोपं नाही.
पराग, नैवेद्याचं पान छानच
पराग, नैवेद्याचं पान छानच दिसतंय.
लिखाणही खुसखुशीत झालंय.
सु वड्यांच्या ताटातील कोथींबीर - खोबर्याची सजावट नावीन्यपूर्ण आहे.
भारी!! नॉट लिसनिंग!!
भारी!! नॉट लिसनिंग!!
धणे लवंग मिरी फॉटो फार मस्त
धणे लवंग मिरी फॉटो फार मस्त आलाय.
अप्रतिम
अप्रतिम
भन्नाट
भन्नाट
पान मस्त दिसतंय. सगळे फोटो
पान मस्त दिसतंय. सगळे फोटो छानच आले आहेत.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन पग्या
अभिनंदन पग्या
हार्दिक अभिनंदन .
हार्दिक अभिनंदन
.
सगळ्यांना प्रतिक्रीया आणि
सगळ्यांना प्रतिक्रीया आणि मतांसाठी मन:पूर्वक धन्यवाद
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
(No subject)
इथल्या नवीन प्रतिसादांबद्दल
इथल्या नवीन प्रतिसादांबद्दल तसच प्रशस्तीप्रत्रकाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अभिनंदन!
अभिनंदन!
Pages