घरकोपरा निवड आणि...

Submitted by हाडळीचा आशिक on 20 August, 2020 - 14:26

घरकोपरा निवड आणि…

हा धागा सुचण्यासाठीचं आमचं प्रेरणास्थान

कोविड आल्यापासून आपल्यापैकी बरेचजण घरकोंबडे बनून वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर या वफ्रॉहो दरम्यान आमच्यासारखे काही अतृप्त हावरट आत्मे शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करून ज्यादाचे पैसे मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. माझा प्रश्न हा आहे की हे करत असताना घराच्या कोणत्या दिशेच्या कोपऱ्यात बसल्याने ट्रेडींगमधून अमाप पैसा मिळू शकतो. तसेच समोर भिंतीवर कोणता/कोणाचा फोटू वगैरे लावावा, ऊद, धूप ,लोबान कोणते जाळावेत तसेच भजन, क्याशेट, मंत्र इ. इ. सुचवावेत.
तुम्हाला माहीती असलेल्या अशाच प्रकारच्या आणखी आयड्या, ऊपाय सांगितल्यास स्वागत!
धन्यवाद
चला येऊद्या! Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचे टेस्लाच्या शेअर्स चा २००० भाव बघून नवरा म्हणाला “ ३ महिन्यांपूर्वी जेव्हा ४५० भाव होता तेव्हाच १० शेअर्स घ्यायला हवे होते..म्हणजे त्यातले आज अर्धे विकून मस्त प्रॅाफिट मिळाला असता“ ..पण तोही अतृप्त हावरट आत्माच म्हणून त्याला म्हटलं “असे भाव वाढत असताना तू अर्धे शेअर्स विकणार? तोंड बघ आरशात” .. म्हणून तुम्ही जीथे ट्रेडींगसाठी बसत असाल त्याच्या समोरच्या भिंतीवर फोटोऐवजी एखादा आरसा लावावा Wink

आमच्यासारखे काही अतृप्त हावरट आत्मे शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करून ज्यादाचे पैसे मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.>>
Lol

म्हणून तुम्ही जीथे ट्रेडींगसाठी बसत असाल त्याच्या समोरच्या भिंतीवर फोटोऐवजी एखादा आरसा लावावा >>>>
आरसा लावल्यानं फायद्याऐवजी तोटाच जास्त होईल. Wink

बोकलत.. तुमचा कधीपासून देवावर विश्वास?>>>>
हायला! पुन्हा बोकलत..
अहो ते घोस्टहंटर आहेत, मी घोस्टलवर Happy

तुम्ही कधीपासून ट्रेडिंग करायला लागलात? काहीतरी लिहा ट्रेडिंगवर>>>>
अहो ट्रेडिंगवर लिहीण्याइतपत हुशार असतो तर हा धागा काढून उपाय विचारले नसते. Happy

उपाय मधला उ असतो.>>>>
धन्यवाद. दुरुस्त करतो.

हर्षद मेहताचा फोटो लावुन बघा एक दिवस.>>>>
हे कोण!