इतिहास छाटला होता

Submitted by तो मी नव्हेच on 20 August, 2020 - 08:15

हर एक कोपरा तिथला शोधून पाहीला होता
न जाणे कुठला कचरा काळजात भरला होता

किती उपसला तरीही तळ मला गवसेना
कसला हा डोही माझ्या गाळ साचला होता

कसा चालला श्वास, मी काय हुंगले होते
प्रत्येक भिताडावरती धूर साचला होता

लोक निंदती म्हणूनी कोणी स्वप्न मारले होते
पण हात कसा माझाही लाल माखला होता

ना दिसे मलाही काही जी झापड भाळी धरली
धरणारा हात ही माझा पण अंधार माजला होता

हे कुणी कायदे केले अन् ते कुणी वायदे केले
माझा कसा परस्पर त्यांनी निकाल लावला होता

किती सोसले तेव्हा, आता गजहब मी ना करतो
ओठांवर हसणे लेऊन तो इतिहास छाटला होता

-रोहन

Group content visibility: 
Public - accessible to all site users