अकल्पित

Submitted by प्रथमेश काटे on 20 August, 2020 - 06:28

     त्या अलिशान बंगल्यात ती एकटीच होती. संपूर्ण घरावर सुतकी वातावरण पसरले होते. ती पायऱ्या उतरून खाली आली. तिने एकदा भिंतीवरील नवऱ्याच्या फोटोकडे पाहिले. गतकाळातील त्या भयाण आठवणीने तिचं अंग शहारल. पण क्षणात तिने स्वत:ला सावरलं. तिथल्या एका पलंगावर बसली, आणि भूतकाळात हरवली.
         रति सबनीस. मुंबईतील प्रतिष्ठित व्यापारी जयसिंगराव सबनीस यांची मुलगी. लाडात वाढलेली. आपल्या मुलीचं लग्न आपल्या तोलामोलाच्या मुलाशी व्हाव अशी त्यांची इच्छा होती, पण तिला मात्र एखाद्या मध्यमवर्गीय घरातील मुलाशी लग्न करायचं होतं. ज्याची परिस्थिती सामान्य असते, त्याच्यात धमक असते, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते‌. अस तिचं प्रामाणिक मत होते. तिच्या वडिलांनी तिच्या इच्छेने एका गरीब कुटुंबातील मुलाबरोबर तिचं लग्न करू दिलं. सर्व सुरळीत चालू असताना ती घटना घडली.
      डोअरबेलच्या आवाजाने ती भानावर आली. दरवाजा उघडून तिचा नवरा अमेय आत आला. त्याने एकदा स्वतःच्या फोटो कडे पाहिले. त्या वरुन त्याची नजर रतिच्या हार घातलेल्या फोटोकडे गेलं. त्याच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य उमटले. किती हुशारीने तिचा खून करून तिची प्रॉपर्टी त्याने स्वत:च्या नावे करून घेतली होती. अचानक त्याच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. फोटोगफ्रेममध्ये त्याला त्याचा चेहरा दिसत होता. त्याच्या मागे ती उभी होती. त्याची बायको रति. हो रतीच ती. पण हे कसं शक्य आहे? रती तर..
तिने त्याच्या आवडीची सफेद रंगाची नक्षीदार साडी नेसली होती.त्याच्या हृदयातून तीव्र वेदना आली आणि त्याने जागीच प्राण सोडला.

- समाप्त
@ प्रथमेश काटे

कथा आवडल्यास कृपया माझ्या फेसबुक वरील Marathi stories या पेजला लाईक करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथाबीज छान आहे पण कथेला आणखीन फुलवा.>>>+१३
हेच कथाबीज घेऊन २५००-३००० शब्दांची सुरेख कथा लिहीता येईल. विचार करा. Happy

सर्वांना धन्यवाद. ही माझी पहिलीच कथा आहे. म्हणून सुरुवात लघुकथेपासून केली. पुढे हळूहळू जास्त मोठ्या लिहीन.