ईव्ह तुझी, तू माझा ऍडम ठरले होते ना ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 August, 2020 - 11:42

तू माझा मी तुझीच कायम, ठरले होते ना ?
परस्परांना म्हणायचे मम ठरले होते ना ?

फाउल झाला म्हणून कोणी खेळ उधळतो का ?
पाळायाचे कोणते नियम ठरले होते ना ?

हट्ट पुरवला गेला माझा, विभक्त पण झालो
ईव्ह तुझी, तू माझा ऍडम ठरले होते ना ?

आकलनशक्ति पल्याडसुद्धा उरते रे काही !
टाळायाचे होणारे भ्रम ठरले होते ना ?

जिथे पोचता अस्तित्वाचा दंभच विरघळतो
गाठायाची आपण ती सम ठरले होते ना ?

मने जिंकणे स्वत्व टिकवणे, काय करू नक्की
जगण्यासाठीचे अग्रक्रम ठरले होते ना ?

यमदूतांचा निरोप आल्या आल्या तो गेला
अंथरायचे मिळून जाजम ठरले होते ना ?

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users