Submitted by सुप्रिया जाधव. on 17 August, 2020 - 11:42
तू माझा मी तुझीच कायम, ठरले होते ना ?
परस्परांना म्हणायचे मम ठरले होते ना ?
फाउल झाला म्हणून कोणी खेळ उधळतो का ?
पाळायाचे कोणते नियम ठरले होते ना ?
हट्ट पुरवला गेला माझा, विभक्त पण झालो
ईव्ह तुझी, तू माझा ऍडम ठरले होते ना ?
आकलनशक्ति पल्याडसुद्धा उरते रे काही !
टाळायाचे होणारे भ्रम ठरले होते ना ?
जिथे पोचता अस्तित्वाचा दंभच विरघळतो
गाठायाची आपण ती सम ठरले होते ना ?
मने जिंकणे स्वत्व टिकवणे, काय करू नक्की
जगण्यासाठीचे अग्रक्रम ठरले होते ना ?
यमदूतांचा निरोप आल्या आल्या तो गेला
अंथरायचे मिळून जाजम ठरले होते ना ?
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
>जिथे पोचता अस्तित्वाचा दंभच
>जिथे पोचता अस्तित्वाचा दंभच विरघळतो
गाठायाची आपण ती सम ठरले होते ना ?
वा ! क्या बात है ! सुंदर.
धन्यवाद अजयजी धन्यवाद सोनाली
धन्यवाद अजयजी
धन्यवाद सोनाली
वाह कमाल
वाह
कमाल
छान
छान
सुंदर रचना..
सुंदर रचना..
वाह!
वाह!
मस्तच. एकदम झकास.
मस्तच. एकदम झकास.
मनापासुन आभारी आहे सगळ्यांची
मनापासुन आभारी आहे सगळ्यांची
नि: शब्द सुरेख !!!
नि: शब्द सुरेख !!!
मजा आ गया सुप्रियाजीं !
मजा आ गया सुप्रियाजीं !
जिथे पोचता अस्तित्वाचा दंभच विरघळतो.. अप्रतिम शेर !!
ईव्ह ऍडम वाचून "डार्क" ची
ईव्ह ऍडम वाचून "डार्क" ची आठवण आली...