मी वाट बघतीयं

Submitted by मोहिनी१२३ on 17 August, 2020 - 06:17

मी वाट बघतीयं
माणसं एकामेकांना मनसोक्त कडकडून भेटण्याची

मी वाट पाहातीयं
मुलांच्या खेळण्याचा आवाज गगनाला भिडण्याची

मी वाट शोधतीयं
माणसांमधल्या संशय, अविश्वास याच्या भिंतीचा चक्काचूर करायची

मी वाट काढतीयं
आभासी जगाला दुय्यम ठरवून वास्तवात हिरीरीने जगायची

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर...शेवटची ओळ मस्तच.