जाणार कुठे मुक्ता?

Submitted by मुक्ता.... on 17 August, 2020 - 06:13

जाणार कुठे,मुक्ता?
इथेच तर रहायचंय!!
मरणापूर्वी आधीचं
मरणानंतर नंतरचं...
जग कळत नाही नकळत पहायचंय!!

जाणार कुठे,
इथेच तर श्वास घ्यायचाय
विधात्याने निर्माण तर खूप करून ठेवलाय
प्राणवायू....
अनेक जन्म घेऊन तोच सगळा भिनवायचाय
कळत नकळत
अनेक शरीरांच्या अणु रेणूंतून फिरणारा प्राण
अनुभवायचाय....

जाणार कुठे?
हे पाणी, ही माती, हा वायू, ते तेज,
ते समग्र आकाश...
ज्यापासून लिंग आणि तू मी चा भेद न मानता बनलेलं शरीर एकतेचं प्रतीक वाटतं...
कितीही यातना मिळाल्या तरीही......

जाणार कुठे ?
आनंद हा मोक्ष आहे....
जिवंत शरीरात नाही जगला आत्मा...
तर मिळेल का कधी मुक्ती....

मुक्ता, जाणार कुठे?
इथली फुलं हुंगायची, मनमुराद श्वासात गंध भरायचा
इथले सुंदर रंग...पुन्हा पुन्हा त्यात रंगायचं
इथले सुंदर जगणे, सुंदर हसणे आणि सुंदर मरणे...
मुक्तता असणार इथेच!
ईश्वर आहे इथेच!!

जाणार कुठे?

मुक्ता

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आपण स्वतःच आपला एक आवडता रंग होऊन इथंच भुतलावरच राहिलो तर, सगळीकडे पसरता येईल, खुपच छान कल्पना आहे ही!!! सुंदर कविता!!!