लॉकडाउन इफेक्ट

Submitted by Mangesh Pandav on 16 August, 2020 - 11:41

नुकतीच सुचलेली एक कविता व्हाट्सअप स्टेटस ला ठेऊन (त्याच्याशिवाय तुम्ही कवी आहात असं लोक आता मानत नाहीत) मी माझ्या कामात व्यस्त झालो. थोड्या वेळाने मोबाइल स्क्रीन वर  माझी नजर गेली तेव्हा नोटीफीकेशन मधे मेसेज होता "मला माहित न्हवत तू इतकं छान लिहितोस" माणुस कौतुकाने हुरळून जातो(आणि त्यातली त्यात जर ते एखाद्या मुलीने केल असेल तर विचारायलाच नको). हातातलं काम खाली टाकुन मी मेसेज कुणाचा आहे ते पाहील तर ती माझी शाळेतली मैत्रीण होती आणि आज पहिल्यांदाच ईतक्या वर्षाने तिने मला मेसेज केला होता. मी तिला रिप्लाई मधे "काही खास नाही लिहित अगं हा 'लॉकडाउन इफेक्ट' ये" इतकच लिहुन पाठवलं, एकतर ईतक्या वर्षांनी मी तिला काय आणी कसं बोलाव हेच मला उमजत न्हवत. तसा मी लाजरा वगैरे मुळीच नाहीये पण कधी कधी काय बोलाव हेच सुचत नाही( विशेष करुन मुलींना हे वेगळ सांगायला नकोच). यावर तिचाच रिप्लाई आला "तरीच.. शाळेत असताना न्हवतास लिहित तू " मी फक्त "हो" ईतकाच रिप्लाई. पण आता मला बोलन भाग होत नाहीतर ते उगीच भाव खाल्यासारख वाटण्याचीच जास्त शक्यता होती. काय विचारायच म्हणून मीच आपल "कोरोना नी लाइफच बदलुन गेलय नाही?" असा मेसेज केला.(जेवलीस का? या व्हाट्सअप वरच्या राष्ट्रीय प्रश्नापेक्षा हा नक्कीच बरा प्रश्न होतो).
यावर ती बराच वेळ टाईप करत होती कदाचित तिला माझ्याशी बरच बोलायच होत बरच काही सांगायच होतं नकळत मी तिच्या भरत आलेल्या जखमेवरचीच खपली काढली होती पण मला याची कल्पना देखील न्हवती. बर्याच वेळानी तिचा रिप्लाई आला "अगदीच खरं ये" मग अश्याच ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर शाळेतल्या जुन्या आठवणीत रमून झाल्यावर काय विचारायच म्हणून मी सहज विचारलं की "काका कसे येत?" तिचा रिप्लाई आला "बाबा गेले" मला पुढे काय बोलावं तेच  सुचेना मी थंड पडलो कदाचित समोर नसुनही हे तिच्याच लक्षात आलं तिचा मेसेज आला "ईटस ओके" मला तिच कसं सांत्वन करावं तेच कळेना आणि आस्तिक असनार्या मी अगतिकपणे  मेसेज केला "Sometimes god is very cruel" आणि दुसर्याच क्षणी तिचा मेसेज आला  "Sometimes he also might be not having any option.. something else going in his mind..." मी निशब्द झालो. मी तिला मेसेज केला "your great" तिचा रिप्लाई होता "लॉकडाउन इफेक्ट".

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults