हो ना

Submitted by रोहितकुलकर्णी on 16 August, 2020 - 07:56

आषाढघनासम पाणी हो ना
तू भक्ताची वारी हो ना

कणाकणातुन जन्म मिळावा
आयुष्या तू माती हो ना

माझ्यासाठी माझ्यानंतर
पुन्हा एकदा माझी हो ना

मला किती कविता सुचलेल्या
सफेद कोरी पाटी हो ना

जाण्यापूर्वी वळून बघ तू
वळणावरची झाडी हो ना

नशा तुझ्या श्वासांची इतकी
जळणारी उदबत्ती हो ना

चालून चालून थकला आहे
अवघडलेली मांडी हो ना

किती पांढरे चांदण शिंपण
चंद्रकलांची व्याधी हो ना

मी बघताना चोरून तुजला
थोडी लाल गुलाबी हो ना

वादळ आहे नदीमध्ये जे
ते भिडताना होडी हो ना

कुलूप आहे दरवाज्याला
तडफडणारी चावी हो ना

रोज हरेन रम्मी पत्यांची
पत्यांमधली राणी हो ना

मला चेहरा बघवत नाही
सफेद काळी दाढी हो ना

- रोहित

Group content visibility: 
Public - accessible to all site users